AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ कारणांमुळे अचानक वाढू शकतं तुमचं वजन, नियंत्रण ठेवणे गरजेचे

एखाद्या शारीरिक समस्येमुळेही वजन अचानक वाढू शकतं. काही अशी कारणं जाणून घेऊया जी अचानक वजन वाढण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात.

'या' कारणांमुळे अचानक वाढू शकतं तुमचं वजन, नियंत्रण ठेवणे गरजेचे
| Updated on: Nov 21, 2022 | 11:36 AM
Share

नवी दिल्ली – वाढत्या वयासोबत व्यक्तीचे वजन वाढणे (weight gain) पूर्णपणे सामान्य आहे. जसंजसं वय वाढतं तशा आपल्या शारीरिक हालचाली कमी होऊ लागतात. तुमची धावपळ, खेळणं आणि उड्या मारणंही जवळपास थांबतं. संथपणे काम करणं, नॅचरल लॉस ऑफ मसल मास, मेटाबॉलिजम (metabolism)संथ होणे, अशा अनेक कारणांमुळे आपलं वजन वाढू लागतं. पण जर तुमचं वजन अचानक वाढलं (sudden gain in weight) असेल तर ते शरीरासाठी सामान्य नाही. यामागे हार्मोनल असंतुलन, थायरॉईड किंवा इतरही अनेक कारणे असू शकतात.

या कारणांमुळे अचानक वाढू शकते वजन

हायपोथायरॉइडिजम

जेव्हा एखाद्या महिलेचे वजन अचानक वाढते, तेव्हा डॉक्टर त्यांना सर्वप्रथम थायरॉईडची चाचणी करण्यास सांगतात. आपल्या गळ्यात एक छोटी ग्रंथी असते, जी मेटाबॉलिजम नियंत्रित करणाऱ्या हार्मोनचे उत्पादन करण्यास कारणीभूत असते. जर तुमचा थायरॉईड कमी सक्रिय असेल (हायपोथायरॉईडीझम), तर मेटाबॉलिजम कमी होऊ शकतो व वजन वाढू शकतं. यामुळे थकवा येणे, ऊर्जेची पातळी कमी होणे, कोरडी त्वचा, केस गळणे किंवा आवाज बदलणे या गोष्टींचा त्रास महिलांना होऊ शकतो.

मेनोपॉज (रजोनिवृत्ती)

मुळात रजोनिवृत्ती सुरू होण्यापूर्वीच्या कालावधीला पेरीमेनोपॉज असे म्हणतात. हे सहसा स्त्रियांमध्ये वयाच्या 40 व्या वर्षानंतर सुरू होते. पेरीमेनोपेज फेजमध्ये विविध प्रकारचे बदल होतात. त्यामुळे, इस्ट्रोजेन हे हार्मोन अनियमित पद्धतीने वाढते किंवा कमी होते. यामुळे वजन तर वाढतेच, शिवाय हॉट फ्लॅशेस, लैंगिक इच्छा कमी होणे, पाळी अनियमित येणे इत्यादी बदलही होतात. यामुळे स्नायू सैल होऊ शकतात तसेच शरीरातील चरबी वाढू शकते.

पीसीओएस

एका अहवालानुसार 5 पैकी 1 महिलेला कधी ना कधी पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोमचा (PCOS) त्रास होतो. हे हार्मोनल असंतुलन असून त्यामुळे इस्ट्रोजेन आणि टेस्टोस्टेरॉन या पुनरुत्पादक हार्मोन्सचे संतुलन बिघडते. यामुळे महिलांची पाळी अनियमित होते, तसेच ब्लड शुगर लेव्हलवरही परिणाम होतो. तसेच शरीराचे वजन वाढू लागते.

स्ट्रेस

हा शब्द जितका छोटा आहे, त्याच्यामुळे होणारे नुकसान तेवढेच मोठे आहे. जेव्हा तुम्ही तणावात असता तेव्हा ॲड्रेनेलिन ग्रंथींवर परिणाम होतो. कॉर्टिसॉल हार्मोनचा स्राव जास्त होऊ लागतो. यामुळे शरीरातील ऊर्जा आणि चरबी दोन्ही साठून राहतात. आपल्यापैकी बहुतांश लोक हे ऑफिस किंवा घरगुती समस्यांमुळे तणावाखाली असतात. जेव्हा कॉर्टिसॉल हार्मोनची पातळी जास्त काळ राहते तेव्हा शरीरात चरबी जमा होण्यास सुरवात होते. यामुळे वजनही वाढू शकतं.

लहान आतड्यांमधील जीवाणू वाढणे

चांगले बॅक्टेरिया, हे आतड्याचे कार्य चांगले चालावे यासाठी जबाबदार अतात. पण पचनसंस्थेत वाईट जीवाणूही असतात. जेव्हा चांगले बॅक्टेरिया आणि वाईट बॅक्टेरिया यांचे संतुलन बिघडते, तेव्हा लहान आतड्यात जीवाणूंची वाढ होऊ शकते. यामुळे आतड्यांना सूज येणे, ओटीपोटात दुखणे, अतिसार यासह गॅसेसही निर्माण होऊ शकतात. यामुळेही तुमचं वजन अचानक वाढू शकतं.

झोप पूर्ण न होणे

चांगली झोप लागणे हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. त्याचा वजनावरही मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. जे लोक रात्री व्यवस्थित झोपत नाहीत किंवा रात्री उशिरापर्यंत जागे राहतात, ज्यांची झोप नीट पूर्ण होत नाही, त्यांनाही वजन वाढण्याच्या समस्येचा सामना करावा लागू शकतो. अपुऱ्या झोपेमुळेही वजनावर परिणाम होतो.

हायड्रेटेड न राहणे

मेटाबॉलिजम वाढवण्यासाठी शरीरातील पाण्याचे योग्य प्रमाण खूप महत्वाचे आहे. जर तुम्ही योग्य प्रमाणात पाणी प्यायले नाही, तर वजन वाढणे अपरिहार्य ठरते. यामुळे शरीरातून विषारी पदार्थ अथवा टॉक्सिन्स हे बाहेर टाकले जात नाहीत, त्यामुळे विविध आजार होतात.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.