AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LIVE: वर्ध्यात मिलिट्री तळावर भीषण स्फोट, सहा जण ठार

वर्धा : वर्धा जिल्ह्यातील पुलगाव इथल्या भारतीय लष्कराच्या तळावर भीषण स्फोट झाला आहे. दारुगोळा तळावरील डिमॉलिशन सेंटरवर हा स्फोट झाला. या स्फोटात 6 जणांचा जागीच मृत्यू, तर 10 मजूर जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जाते आहे. जखमींवर सावंगी रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहेत.  बॉम्ब निकामी करताना पेटी हातातून पडल्याची माहिती […]

LIVE: वर्ध्यात मिलिट्री तळावर भीषण स्फोट, सहा जण ठार
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 5:00 PM
Share

वर्धा : वर्धा जिल्ह्यातील पुलगाव इथल्या भारतीय लष्कराच्या तळावर भीषण स्फोट झाला आहे. दारुगोळा तळावरील डिमॉलिशन सेंटरवर हा स्फोट झाला. या स्फोटात 6 जणांचा जागीच मृत्यू, तर 10 मजूर जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जाते आहे. जखमींवर सावंगी रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहेत.  बॉम्ब निकामी करताना पेटी हातातून पडल्याची माहिती मिळते आहे. त्यानंतर या ठिकाणी स्फोट झाला. स्फोटानंतर तिथे आगही लागली. त्यामुळे मोठी अफरातफर माजली आणि त्यात सहा जणांचा मृत्यू झाला.

पुलगाव लष्करी तळावर याआधीही स्फोट

पुलगावच्या शस्त्र भांडारला हा पाचवा मोठा स्फोट असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. यापूर्वी १९८०, १९८९, १९९२ आणि २००१ मध्ये मोठे स्फोट झाले होते. त्यावेळीदेखील लोकांना गाव खाली करावे लागले होते. या स्फोटांमध्ये सोनेगाव, पिपरी, आगरगाव, लोणी, नाचणगाव अशी काही गावे खाली करावी लागली होती.

तसेच, दोन वर्षापूर्वी मे 2016 मध्येही इथे स्फोट होऊन 2 अधिकाऱ्यांसह 20 जणांचा मृत्यू झाला होता.  त्यावेळी बंकर फुटल्याने आजूबाजूचे गार्डस मृत्यूमुखी पडले होते.

पुलगाव शस्त्र भांडार नेमकं काय?

  • वर्ध्यातील पुलगाव हे देशातील सर्वात मोठं तर आशियातील दुसऱ्या क्रमाकांचं शस्त्र भांडार आहे
  • पुलगावात दारुगोळा बनवला जातोच, शिवाय मोठा शस्त्रसाठाही ठेवला जातो.
  • बॉम्ब, दारुगोळा अशी मोठी युद्ध सामुग्री इथं साठवली जाते
  • देशाच्या विविध ठिकाणी तयार झालेली स्फोटकं पुलगाव लष्करी तळावर साठवली जातात
  • पुलगावात जवळपास 200 अधिकारी आणि सुमारे 5 हजार स्थानिक कामगार काम करतात
  • पुलगावचा शस्त्रसाठा परिसर किंवा दारुगोळा भांडार हा 28 किमीचा परिसर आहे. त्यामुळे या परिसराला मोठं सुरक्षा कवच असतं.
  • या परिसरात जवानांशिवाय अन्य कोणालाही प्रवेश दिला जात नाही.
  • इथे शस्त्रसाठ्यासाठी अनेक बंकर केले जातात, यातील प्रत्येक बंकरमध्ये जवळपास 5 हजार किलोपर्यंतचा शस्त्रसाठा असतो.

शस्त्रभांडारात नेमकं काय काय?

देशातील सर्वोच्च शस्त्रघर असलेल्या पुलगाव शस्त्रभांडारात सर्वोच्च लष्करी सामुग्री आहे. यामध्ये तोफा, तोफगोळे, बंदुका, गोळ्या, बॉम्ब, रणगाड्यातील तोफगोळे, रॉकेट लाँचर, रॉकेट

संरक्षण विभागाची माहिती

आज सकाळी 7 वाजून 10 मिनिटांच्या सुमारास जुनी स्फोटकं निकामी करण्यात येत होती. जबलपूरच्या खमरिया शस्त्र कारखान्यातील कर्मचरी स्फोटकं निकामी करण्याचं काम करत होती. त्यावेळी ही दुर्घटना घडली. जे कर्मचारी हे काम करत होते, त्यापैकी काही प्रशिक्षित होते तर काही कंत्राटी होते. कंत्राटी मजूर स्फोटकं निकामी झाल्यानंतर परिसरात वाळू पसरवण्याचं काम करतात. घटनेची अधिक चौकशी करण्यासाठी अधिकारी घटनास्थळी रवाना झाले आहेत. चंद्रपूर आणि जबलपूरचे अधिकारी वर्ध्याकडे रवाना झाले आहेत.

LIVE UPDATE – 

वर्धा – छिन्न-विछिन्न झालेल्या मृतदेहाचे घटनास्थळावरच शवविच्छेदन होणार, चार मृतदेहाचे घटनास्थळावर पोस्टमॉर्टम

वर्धा – स्फोटातील मृतांची नावे

नारायण शामराव पचारे 55, राहणार – सोनेगाव विलास लक्ष्मण पचारे 40,सोनेगाव उदय विरसिंग 37 जबलपूर (तंत्रज्ञान) प्रविण प्रकाश मुंजेवार,25,केळापूर राजकुमार राहुल भोहते,23,केळापूर प्रभाकर रामदास वानखेडे,40,सोनेगाव

संबंधित बातम्या 

भारतासाठी पुलगाव का महत्त्वाचं?   

पेटी पडली आणि स्फोट झाला, पुलगावात नेमकं काय घडलं? 

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.