AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रमेश म्हात्रेचा पाय आणखी खोलात; मुंबई हायकोर्टाकडून पुन्हा दणका, ‘आता तुरुंगातच…’

bombay high court on ramesh mhatre : मुंबई हायकोर्टाने रमेश म्हात्रेला पुन्हा दणका दिला आहे. त्याच्या जामिनीवरील स्थगिती कायम ठेवली आहे.

रमेश म्हात्रेचा पाय आणखी खोलात; मुंबई हायकोर्टाकडून पुन्हा दणका, 'आता तुरुंगातच...'
| Updated on: Jul 23, 2026 | 7:39 AM
Share

डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रेला मोठा दणका बसला आहे. शिंदेसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे याच्या जामिनीला आधीच कोर्टाने स्थगिती दिली आहे. याच प्रकरणात पुन्हा झालेल्या सुनावणीतही कोर्टाने रमेश म्हात्रेच्या जामिनीला स्थगिती कायम दिली आहे. रमेश म्हात्रेला आणखी काही काळी तुरुंगातच राहू द्या, अशी प्रतिक्रिया कोर्टाने सुनावणीदरम्यान दिली आहे. कोर्टाच्या टिप्पणीने रमेश म्हात्रे यांचं टेन्शन आणखी वाढलं आहे.

डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात शिंदेंसेनेचा नगरसेवक रमेश म्हात्रे याला वैद्यकीय कारणासाठी जामीन दिला होता. त्याच्यावर डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांत रमेश म्हात्रेला जामीन मिळाला होता. त्यामुळे डॉक्टरांनी नगरसेवक म्हात्रेच्या विरोधात काम बंद आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर डॉक्टरांच्या बंदची दखल घेत कोर्टाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठाने तातडीची विशेष सुनावणी घेतली होती. त्यावेळी कोर्टाने रमेश म्हात्रेच्या जामिनीला स्थगिती दिली होती. त्यानंतर पुन्हा जामिनीसाठी प्रयत्न करणाऱ्या रमेश म्हात्रेला पुन्हा दणका दिला आहे.

डॉक्टर मारहाण प्रकरणात मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. कोर्टाने रमेश म्हात्रेला आणखी काही काळ तुरुंगातच राहू द्या, अशी टिप्पणी जामिनावरील स्थगिती कायम ठेवताना दिली आहे. डोंबिवलीतील डॉक्टरांच्या मारहाण प्रकरणात मुंबई हायकोर्टाने नगरसेवक रमेश म्हात्रे याची जामिनीवरील स्थगिती कायम ठेवत त्याला आणखी काही काळ तुरुंगात राहण्याचे सुनावले आहे. डोंबिवलीतील महापालिका रुग्णालयात एक महिला डॉक्टरसह मारहाण केल्याप्रकरणी अटकेत असलेला नगरसेवक म्हात्रेला बुधवारी मुंबई हायकोर्टाकडे वाढते वय आणि मूत्रपिंडाच्या आजाराचा दाखला देऊन जामीन देण्याची मागणी केली. मात्र, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या मारहाणीच्या चित्रिकरणाचा दाखला कोर्टाने दिला होता. त्याचबरोबर हल्ला करताना म्हात्रे हा 25 वर्षांच्या तरुणापेक्षाही उत्साही दिसत होता, असा टोला देखील कोर्टाने लगावला. त्यानंतर त्याला आणखी काही काळ तुरुंगातच राहू देण्याचे न्यायालयाने सुनावले आहे. त्याचबरोबर त्याच्या जामिनावरील स्थगिती कायम ठेवली आहे.

Follow Us
अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात...
Ajit Pawar : अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात याचा अहवाल महिनाभरातच; AAIBचं आश्वासन
मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात...
Mumbai Bank Election : मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंची एन्ट्री; सहकार क्षेत्रात रंगणार चुरस
भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, अन्...
Bhandara : भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, धक्काबुक्की अन् थेट... VIDEO चर्चेत
आमचं चिन्ह चोरलंय, चोरलेला मुद्देमाल आधी...संजय राऊत थेटच बोलले
Sanjay Raut on Shivsena : आमचं चिन्ह चोरलंय, चोरलेला मुद्देमाल आधी...संजय राऊत थेटच बोलले
5.5 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यादीत घोळ! नावं, खाते क्रमांक अन्...
Farmer Loan : 5.5 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यादीत मोठा घोळ! नावं, खाते क्रमांक अन्...
मातंग समाजाचा आरक्षणासाठी एल्गार, तर कांदा दराने शेतकऱ्यांना झटका!
Nashik : मातंग समाजाचा आरक्षणासाठी एल्गार, तर कांदा दराने शेतकऱ्यांना झटका! नाशिकमध्ये दोन मोठे प्रश्न ऐरणीवर
दुष्काळ निवारण बैठकीत आमदार नारायण कुचे जेवण करताना, VIDEO व्हायरल
Nanded : दुष्काळ निवारण बैठकीत आमदार नारायण कुचे जेवण करताना दिसले, VIDEO व्हायरल; बैठकीच्या गांभीर्यावर प्रश्नचिन्ह
टीव्ही ९ मराठीच्या बाप्पाच्या दर्शनाला दोन्ही संजय एकत्र; या संजयचा...
Sanjay Raut on Sanjay Shirsat : टीव्ही ९ मराठीच्या बाप्पाच्या दर्शनाला दोन्ही संजय एकत्र; या संजयचा मला काही त्रास नाही राऊतांचा मिश्किल टोला
गणपती विसर्जनाबाबत महापौर तावडे यांचं मुंबईकरांना आवाहन; काय म्हणाल्या
Ritu Tawde : गणपती विसर्जनाबाबत महापौर रितू तावडे यांचं मुंबईकरांना आवाहन; काय म्हणाल्या?
ऑक्टोबरची वाट का पाहता? दुष्काळावर अंबादास दानवेंचा सरकारला थेट सवाल
Ambadas Danve : ऑक्टोबरची वाट का पाहता? दुष्काळावर अंबादास दानवेंचा सरकारला थेट सवाल; पुढे म्हणाले...