छिंदम कसा जिंकला? महाराष्ट्राला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं!

अहमदनगर : महापालिका निवडणुकीत अहमदनगरमध्ये कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही. शिवसेना 24, राष्ट्रवादी 18, भाजप 14, काँग्रेस 5, बसपा 4, समाजवादी पार्टी 1 आणि अपक्ष 2 असं महापालिकेचं पक्षीय बलाबल आहे. अनेक दिग्गजांना या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. पण एका निकालाचं सर्वांनाच आश्चर्य वाटलं. हा विजय मिळवणारा उमेदवार म्हणजे श्रीपाद छिंदम. शिवरायांबद्दल आक्षेपार्ह बरळणारा […]

छिंदम कसा जिंकला? महाराष्ट्राला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं!
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:52 PM

अहमदनगर : महापालिका निवडणुकीत अहमदनगरमध्ये कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही. शिवसेना 24, राष्ट्रवादी 18, भाजप 14, काँग्रेस 5, बसपा 4, समाजवादी पार्टी 1 आणि अपक्ष 2 असं महापालिकेचं पक्षीय बलाबल आहे. अनेक दिग्गजांना या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. पण एका निकालाचं सर्वांनाच आश्चर्य वाटलं. हा विजय मिळवणारा उमेदवार म्हणजे श्रीपाद छिंदम. शिवरायांबद्दल आक्षेपार्ह बरळणारा श्रीपाद छिंदम जिंकलाच कसा हा प्रश्न उभ्या महाराष्ट्राला पडला.

देशाच्या राजकारणात दुर्दैवाने जात हे समीकरण अत्यंत महत्त्वाचं ठरतं आणि यामुळेच वाट्टेल ते बरळूनही श्रीपाद छिंदमचा विजय सोपा झाला. छिंदम ज्या समाजाचा आहे, त्या पदमसाळी समाजाची निम्म्याहून जास्त लोकसंख्या छिंदमच्या वॉर्डात आहे. या वॉर्डात छिंदमला त्याच्या समाजात मोठा मान आहे.

छिंदमच्या वॉर्डातील नागरिक आम्ही त्याला मत दिलं नसल्याचं सांगतात. पण छिंदम निवडून कसा आला हा मोठा प्रश्न सर्वांनाच पडला. पण त्याच्या समाजाची संख्या वॉर्डात निम्म्याहून जास्त असल्यामुळे छिंदमचा विजय सोपा झाला, असं काहींचं म्हणणं आहे.

दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे छिंदमविरोधातील उमेदवारांचा गाफिलपणा सांगितला जातोय. छिंदमने शिवरायांचा अवमान केल्यामुळे नागरिक त्याला नाकारतील ही भावना त्याच्याविरोधातील उमेदवारांची होती. इतर समाजाने छिंदमला नाकारलं असलं तरी त्याच्या समाजाने मात्र छिंदमला मतदान केलं. त्यामुळेच छिंदमला फायदा झाला, असाही एक अंदाज सांगितला जात आहे.

अहमदनगर महापालिकेच्या निवडणुकीत अनेक उमेदवार 100 ते 200 मतांच्या फरकाने पडले. पण छिंदमचा विजय तब्बल 1970 मतांनी झाला. छिंदमला एकूण 4532 मतं मिळाली. तर त्याच्या विरोधातील भाजपचे उमेदवार प्रदीप परदेशी यांना 2562 मतं मिळाली.

मतदानाआधीच विजयाचा दावा

छिंदमने निकाल लागण्या अगोदरच विजयाचा दावा केला होता. कुणाला संपवायचं ते मतदारांच्या हातात असतं, मतदार हा राजा असून माझा विजय निश्चित आहे, असं श्रीपाद छिंदमने मतदानाच्या एक दिवस अगोदर म्हटलं होतं. त्याच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आलेली असली तरी त्याला मतदानाची परवानगी देण्यात आली होती. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीपाद छिंदमला तडीपार करण्यात आलं होतं. त्याने जिल्ह्याबाहेरुन प्रचार करुनही त्याचा विजय झाला.

संबंधित बातम्या :

नगरमध्ये वादग्रस्त श्रीपाद छिंदमचा तब्बल 1970 मतांनी विजय

विजयानंतर श्रीपाद छिंदम शिवरायांसमोर नतमस्तक

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.