AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manoj Jarange Patil : परवानगी नाकारल्यानंतर मनोज जरांगेंनी उपचार सोडले, पाणी बंद; आज दुपारी 12 वाजता कुठली घोषणा करणार?

पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर मनोज जरांगेंनी उपचार सोडले आहेत. त्यानंतर त्यांनी पाणी बंद केलं आहे. त्यानंतर आज दुपारी 12 वाजता मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे.

Manoj Jarange Patil : परवानगी नाकारल्यानंतर मनोज जरांगेंनी उपचार सोडले, पाणी बंद; आज दुपारी 12 वाजता कुठली घोषणा करणार?
manoj jarange patil newsImage Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 14, 2026 | 7:36 AM
Share

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला रविवारी आझाद पोलीस स्टेशनने परवानगी नाकारली. पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही मनोज जरांगे पाटील आंदोलनावर ठाम आहेत. त्यांनी कालपासून सलाईन देखील घेण्यास बंद केली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी कोर्टात जाण्याची देखील तयारी दर्शवली आहे. परवानगी नाकारल्याने मनोज जरांगे पाटील यांनी आणखी आक्रमक भूमिका घेतली आहे. जरांगेंनी मध्यरात्री उपचार देखील नाकारले. त्यानंतर आज सोमवारी मनोज जरांगे पाटील मोठी घोषणा करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज सोमवारी सतरावा दिवस आहे. आझाद मैदानावरील आंदोलनाची परवानगी नाकारल्यानंतर त्यांनी उपचार, पाणी बंद केलं आहे. त्यानंतर जरांगे पाटील हे दुपारी बारा वाजता माध्यमांशी संवाद साधणार आहेत. अंतरवारी सराटीत रात्री दोन वेळा वैद्यकीय पथक तपासणी करून परत गेले. परंतु त्यांनी उपचार घेण्यास नकार दिल्याची आरोग्य विभागाची माहिती आहे. मनोज जरांगे पाटील यांच्याकडून दुसऱ्यांदा आझाद मैदान पोलिसांना नव्याने परवानगीसाठी अर्ज करण्यात आलाय. परवानगी नाकारल्यास पुन्हा कोर्टात जाण्याची तयारी दर्शवली आहे. तर आज सोमवारी दुपारी बारा वाजता महत्त्वाची पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यांच्या आजच्या घोषणेमुळे सरकारसमोर नवा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.

पाटोदामध्ये जरांगे पाटलांचा पहिला मुक्काम

मनोज जरांगे पाटील हे मुंबईकडे जाताना 15 तारखेचा पहिला मुक्काम बीडच्या पाटोदा शहरात असणार आहे. काल पाटोदा शहरात पूर्व नियोजन बैठक पार पडली, यानंतर 80 एकरवर वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था केली जात आहे, तर 25 ठिकाणी पार्किंगसह अन्नछत्र उभारण्याचे काम सुरू आहे. परवानगी नाकारल्यानंतर देखील जरांगे पाटलांसह मराठा बांधव मुंबईत जाण्यावर ठाम असून जोरदार तयारी सुरू आहे.

मनोज जरांगे-पाटलांनी थोडं थांबून आंदोलन – मंत्री हसन मुश्रीफ

मनोज जरांगे-पाटील यांनी सण-उत्सव लक्षात घेऊन थोडं थांबून आंदोलन केलं,असतं तर बरं झालं असतं,असं विधान मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं आहे. सध्या गणेशोत्सव सुरू झाला असून त्यानंतर नवरात्र असे सणवार आहेत. यामध्ये कायदा- सुव्यवस्थेच्या समस्या पोलिसांच्या समोर असतात. त्यामुळे या गोष्टी म्हणून जरांगे पाटलांनी लक्षात घेऊन आंदोलन थोडे थांबून केलं असतं, तर बरं झालं असतं, असं मत मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच