अहमदनगर महापालिकेचा अंतिम निकाल

अहमदनगर : विविध कारणांमुळे चर्चेत असलेल्या अहमदनगर महापालिकेत अखेर त्रिशंकू परिस्थिती निर्माण झालेली आहे. शिवसेना 24 जागांसह पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी 18, तिसऱ्या क्रमांकावर भाजप 14 आणि काँग्रेस 5 चौथ्या क्रमांकावर फेकली आहे. सत्तेसाठी आता काय राजकीय समीकरणं जुळतात याकडे लक्ष लागलंय. 68 जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत बहुमतासाठी 35 जागांची […]

अहमदनगर महापालिकेचा अंतिम निकाल
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:52 PM

अहमदनगर : विविध कारणांमुळे चर्चेत असलेल्या अहमदनगर महापालिकेत अखेर त्रिशंकू परिस्थिती निर्माण झालेली आहे. शिवसेना 24 जागांसह पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी 18, तिसऱ्या क्रमांकावर भाजप 14 आणि काँग्रेस 5 चौथ्या क्रमांकावर फेकली आहे. सत्तेसाठी आता काय राजकीय समीकरणं जुळतात याकडे लक्ष लागलंय. 68 जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत बहुमतासाठी 35 जागांची आवश्यकता आहे.

शिवसेनेला सत्ता स्थापन करायची असेल तर भाजपची मदत घेणं आवश्यक असेल. खरं तर भाजपने या निवडणुकीत मोठं बळ लावलं होतं. पण म्हणावं तसं यश आलं नाही. धक्कादायक म्हणजे नगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांचे पुत्र सुवेंद्र गांधी आणि सून दीप्ती गांधी यांचाही पराभव झालाय.

अंतिम निकाल

शिवसेना -24

भाजप – 14

काँग्रेस – 05

राष्ट्रवादी – 18

बसपा – 04

समाजवादी पक्ष – 01

अपक्ष – 02

LIVE UPDATE

  • अहमदनगर – भाजप खासदार दिलीप गांधी यांचे पुत्र सुवेंद्र गांधी पराभवाच्या छायेत, गांधी पाचशे मतांनी पिछाडीवर, तर पत्नी दीप्ती गांधीही पराभवाच्या छायेत
  • अहमदनगर – राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या पत्नी शितल जगताप आघाडीवर
  • अहमदनगर – प्रभाग 9 ड – सोळाव्या फेरीअखेर काँग्रेसच्या सुप्रिया जाधव यांची निर्णायक आघाडी, 3658 मतांनी आघाडीवर
  • भाजप 17, शिवसेना 18, काँग्रेस+राष्ट्रवादी 25, मनसे 01, इतर 04
  • अहमदनगर – शिवसेनेच्या महापौर सुरेखा कदम आणि विरोधी पक्षनेते बाळासाहेब बोराटे यांची विजयाच्या दिशेने वाटचाल, खासदार सून दीप्ती गांधी पिछाडीवर
  • अहमदनगर – वादग्रस्त श्रीपाद छिंदमची निर्णायक आघाडी, छिंदमला 1854 मते, तर विरोधक भाजप प्रदीप परदेशी पिछाडीवर, परदेशी 1441 मते, विरोधक मनसे पोपट पाथरे पिछाडीवर, पथारेंना 1300 मतं
  • अहमदनगर : केडगावला दोन जागांवर शिवसेना, तर दोन जागांवर भाजपची आघाडी, हत्याकांडातील मृत संजय कोतकर यांची पत्नी सुनिता कोतकर 300 मतांनी आघाडीवर
  • अहमदनगर : सातव्या फेरीत खासदार पुत्र आणि भाजपचे उमेदवार सुवेंद्र गांधी 400 मतांनी पिछाडीवर, खासदार सून दीप्ती गांधीही पिछाडीवर
  • भाजप 18, शिवसेना 17, काँग्रेस+राष्ट्रवादी 25, मनसे 01, इतर 03
  • अहमदनगर – भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांची मुलगी ज्योती गाडे आघाडीवर
  • अहमदनगर : खासदार दिलीप गांधी यांचे पुत्र सुवेंद्र गांधी आघाडीवर, तर सून दीप्ती गांधी पिछाडीवर, सूनेविरोधात शिवसेना उमेदवाराची आघाडी
  • अहमदनगर – प्रभाग क्रमांक 7 – राष्ट्रवादीचे कुमारसिंह वाकळे आघाडीवर, भाजप उमेदवार पिछाडीवर
  • अहमदनगर – प्रभाग 12 – चारही ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार आघाडीवर, महापौर सुरेखा कदम यांच्या विरोधात असलेल्या दीप्ती गांधी पिछाडीवर
  • अहमदनगर : प्रभाग एकमधून राष्ट्रवादीचे संपत बारस्कर आघाडीवर, तर प्रभाग 6 अ मधून शिवसेनेच्या सुरेखा भूतकर 404 मतांनी पुढे
  • भाजप 19, शिवसेना 19, काँग्रेस+राष्ट्रवादी 22, मनसे 01, इतर 03
  • भाजप 22, शिवसेना 19, काँग्रेस+राष्ट्रवादी 22, मनसे 01, इतर 03
  • अहमदनगरला सध्याचा कल पाहता राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीवर, आघाडीला 22 ठिकाणी आघाडी, आघाडी तुलनेत भाजप पिछाडीवर
  • भाजप 19, शिवसेना 19, काँग्रेस+राष्ट्रवादी 18, मनसे 01, इतर 03
  • भाजप 26, शिवसेना 12, काँग्रेस+राष्ट्रवादी 10, मनसे 01, इतर 03
  • अहमदनगर : वादग्रस्त उमेदवार श्रीपाद छिंदम प्रभाग 9 मध्ये 300 मतांनी पिछाडीवर, छिंदमविरोधात मनसेचे पोपट पाथरे आघाडीवर
  • अहमदनगर : प्रभाग 12 मध्ये भाजप उमेदवार सुवेंद्र गांधी 138 मतांनी आघाडीवर, तर 11 मध्ये दीप्ती गांधी 160 मतांनी पिछाडीवर
  • भाजप 23, शिवसेना 10, काँग्रेस+राष्ट्रवादी 10, एमआयएम 00, इतर 03
  • भाजप 16, शिवसेना 09, काँग्रेस+राष्ट्रवादी 10, एमआयएम 00, इतर 03
  • प्रभाग 14 मध्ये राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांची पत्नी शितल जगताप आघाडीवर
  • भाजप 15, शिवसेना 05, काँग्रेस+राष्ट्रवादी 08, एमआयएम 00, इतर 03
  • भाजप 13, शिवसेना 05, काँग्रेस+राष्ट्रवादी 08, एमआयएम 00, इतर 03
  • भाजप 08, शिवसेना 05, काँग्रेस+राष्ट्रवादी 04, एमआयएम 00, इतर 03
  • भाजप 06, शिवसेना 04, काँग्रेस+राष्ट्रवादी 03, एमआयएम 00, इतर 02
  • भाजप 4, शिवसेना 00, काँग्रेस+राष्ट्रवादी 02, एमआयएम, इतर 00
  • पोस्टल मतदानात भाजपला काहीशी आघाडी
  • अहमदनगर मनपाच्या मतमोजणीला दहा वाजता सुरुवात, काही क्षणात पहिले कल हाती येणार
  • अहमदनगर : ईव्हीएम स्ट्राँग रूममधून मतदान मतमोजणी कक्षात आणल्या
  • अहमदनगर : श्रीपाद छिंदमच्या भावाला अटक, ईव्हीएमची पूजा करणं महागात, सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी पोलिसांची कारवाई
नोकऱ्या करतोय, राजकारण नाही, वर्दीवर यायचं नाही, DYSP ने मुश्रीफांना सुनावलं

अहमदनगरची पालिका निवडणूक भाजपने प्रतिष्ठेची बनवली होती. कारण, सुरुवातीपासूनच भाजप प्रचारात आघाडीवर असल्याचं पाहायला मिळालं. भाजपने निवडणुकीच्या रणधुमाळीत मोठी स्टार प्रचारकांची फौज उभी केली होती. तर प्रचाराचा शुभारंभ प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या हस्ते पार पडला. समाजकल्याण मंत्री दिलीप कांबळे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, सहकारमंत्री सुभाष देशमुख, तर सांगता सभेला खुद्द राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. त्यामुळे ही निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली होती.

श्रीपाद छिंदमकडे लक्ष

छत्रपती शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारा अहमदनगर महापालिकेचा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदमने अखेर मतदान केलं. प्रभाग क्रमांक नऊमध्ये छिंदमने मतदानाचा हक्क बजावला. छिंदमला तडीपार करण्यात आलेलं आहे, पण त्याला मतदानाची मुभा देण्यात आली होती.

शिवरायाबददल बेताल वक्तव्य केल्याने छिंदमच्या विरोधात राज्यभरात निदर्शने झाली होती. त्यातच यंदा तो सपत्नीक निवडणूक रिंगणात उतरलाय. मात्र छिंदम या मतदारसंघात अपक्ष निवडणूक लढवतोय. छिंदमच्या विरोधात भाजप, शिवसेना आणि आघाडीचे उमेदवार आहेत.

महापालिकेतील सध्याचं पक्षीय बलाबल

राष्ट्रवादी :-18

शिवसेना :-18

काँग्रेस :-11

भाजप :-9

मनसे :-4

अपक्ष:-9

एकूण :-68

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.