उभ्या उभ्या गडकरींचे डोळे फिरले आणि भोवळ येऊन पडले!
राहुरी (अहमदनगर) : केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी हे चक्कर येऊन कोसळले. अहमदनगरमधील राहुरी इथं ही घटना घडली. नितीन गडकरी हे आज महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभासाठी आले होते. या कार्यक्रमादरम्यान नितीन गडकरी यांना चक्कर आल्याने ते कोसळले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. नेमकं काय घडलं? महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत […]
राहुरी (अहमदनगर) : केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी हे चक्कर येऊन कोसळले. अहमदनगरमधील राहुरी इथं ही घटना घडली. नितीन गडकरी हे आज महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभासाठी आले होते. या कार्यक्रमादरम्यान नितीन गडकरी यांना चक्कर आल्याने ते कोसळले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.
नेमकं काय घडलं?
महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला नितीन गडकरी उपस्थित होते. गडकरी यांनी समारंभात 30 ते 35 मिनिटं भाषण केलं. भाषण केल्यानंतर ते व्यासपीठावरील त्यांच्या खुर्चीकडे आले. थोड्याच वेळात राष्ट्रगीत सुरु होणार होते. त्यासाठी खुर्चीच्या येथे गडकरी उभे राहिले होते. तेव्हाच त्यांना अस्वस्थ वाटू लागलं आणि दोनवेळा भोवळ आली. त्यानंतर तातडीने ते खुर्चीवर बसले. सुरक्षारक्षक धावत गडकरींच्या जवळ आले आणि त्यांनी आधार देण्याचा प्रयत्न केला.
यावेळी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनीही नितीन गडकरी यांना बसण्यासाठी आधार दिला. त्यानंतर राज्यपालांची गडकरींना पिण्यासाठी पाणी दिलं. तातडीने कृषी विद्यापीठातच डॉक्टरांनी नितीन गडकरी यांची वैद्यकीय तपासणी केली. त्यांची प्रकृती ठीक असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यावर नितीन गडकरी कृषी विद्यापीठातून निघाले.
नितीन गडकरी हे कृषी विद्यापीठातून आपल्या गाड्यांच्या ताफ्यातून निघाले. यावेळी नितीन गडकरी यांच्या गाडीतच राज्यपालही बसले आणि ते पुढील प्रवासासाठी निघाले.
दरम्यान, नितीन गडकरी यांनी पुढील दौरा रद्द करुन हेलिकॉप्टरने नागपूरच्या दिशेने रवाना झाले आहेत. पुढील तीन दिवसांचे गडकरींचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. महत्त्वाचे नेते सोडून, इतर कार्यकर्त्यांनी भेटू नये, असेही सांगण्यात आले आहे.
गडकरींची प्रकृती स्थिर – गिरीश महाजन
“सतत फिरणं, जागणं यामुळे गडकरींना त्रास झाला असावा. मात्र, गंभीर काही नाहीय. त्यांची तब्येत ठणठणीत आहे. डॉक्टरांसाठी चर्चा केली आहे. कामाच्या ताणामुळे भोवळ आली. तब्येत अतिशय चांगली आहे.”, अशी माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ नेमकं कुठे आहे?
पाहा व्हिडीओ :
कोण आहेत नितीन गडकरी?
नितीन गडकरी हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. सध्या ते केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत घडलेले नितीन गडकरी हे पुढे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत सक्रीय झाले. नंतर भारतीय जनता पक्षात सक्रीयपणे काम करु लागले. सर्वसामान्य कार्यकर्ता ते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष, असा त्यांच्या राजकीय कारकीर्दीचा प्रवास आहे. महाराष्ट्रात युतीचं सरकार असताना नितीन गडकरी हे सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. या काळात गडकरींनी केलेल्या कामाचं आजही कौतुक होतं. सध्याच्या मोदी सरकारमध्ये सर्वात आश्वासक चेहरा म्हणून नितीन गडकरी परिचीत आहेत.