कांदा उत्पादक शेतकऱ्याने मोदींना पाठवलेल्या मनीऑर्डरला PMO चं उत्तर

नाशिक : पंतप्रधान कार्यालयातून निफाड तालुक्यातील नैताळे येथील कांदा उत्पादक संजय साठे यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयातून पुरवठा विभागाचे उपजिल्हाधिकारी शशिकांत मंगरुळे यांनी फोनवरून रात्री 9 वाजता चौकशी केली. संजय साठे यांनी कांद्यातून मिळालेल्या 1064 रुपयांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मनीऑर्डर पाठवली होती. साडे सात क्विंटल कांद्याला प्रतिक्विंटल दीडशे रुपये बाजार […]

कांदा उत्पादक शेतकऱ्याने मोदींना पाठवलेल्या मनीऑर्डरला PMO चं उत्तर
नरेंद्र मोदी, पंतप्रधान
Follow us
| Updated on: Aug 17, 2021 | 9:36 PM

नाशिक : पंतप्रधान कार्यालयातून निफाड तालुक्यातील नैताळे येथील कांदा उत्पादक संजय साठे यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयातून पुरवठा विभागाचे उपजिल्हाधिकारी शशिकांत मंगरुळे यांनी फोनवरून रात्री 9 वाजता चौकशी केली. संजय साठे यांनी कांद्यातून मिळालेल्या 1064 रुपयांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मनीऑर्डर पाठवली होती. साडे सात क्विंटल कांद्याला प्रतिक्विंटल दीडशे रुपये बाजार भाव मिळाला होता. उत्पादन खर्च तर दूर, वाहतूक खर्चही वसूल होणार नसल्याने संतप्त होऊन त्यांनी मनीऑर्डर पाठवली होती. मोदींना पाठवलेल्या या मनीऑर्डरची पंतप्रधान कार्यालयाने दखल घेतली. त्यामुळे आता चौकशीनंतर संजय साठे यांना नेमका काही दिलासा मिळतो का, त्यांच्यासारख्याच हजारो शेतकऱ्यांनाही पंतप्रधान काही दिलासा देतील का आणि कांद्याच्या दरासाठी सरकारकडून काही केलं जाईल का, याकडे लक्ष लागलं आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कांद्याच्या भावात घसरण सुरु आहे. त्यामुळे उत्पादन खर्चही भरुन निघत नाही. कांद्याला मिळालेल्या तूटपुंज्या दराबाबत सरकारचा निषेध करण्यासाठी निफाडच्या नैताळे गावामधले शेतकर संजय साठे यांनी गांधीगिरी पद्धत अवलंबली. त्यांनी स्वत:च्या खिशातून 54 रुपये खर्च करत 1,064 रुपयांची सगळी रक्कम पंतप्रधान कार्यालयात मनीऑर्डरने पाठवून सरकारचा निषेध केला होता. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सध्या प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. शेतीचा खर्च तर वेगळाच, पण कांदा बाजारात आणण्याचा खर्चही निघत नाही. यामुळे शेतकरी प्रचंड संतापले आहेत.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.