उस्मानाबाद नव्हे, तुकाराम मुंढेंची ‘या’ ठिकाणी बदली!

सुनील काळे, टीव्ही 9 मराठी, मुंबई : कर्तव्यदक्ष आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची नाशिक महापालिका आयुक्तपदावरुन बदली करण्यात आली आहे. मंत्रालयात नियोजन विभागाच्या सहसचिवपदी तुकाराम मुंढे यांची बदली करण्यात आली आहे. याआधी उस्मानाबादचे जिल्हाधिकारी म्हणून मुंढेंची बदली करण्यात आल्याची चर्चा होती. मात्र, मुंढेंची बदली मंत्रालयात करण्यात आल्याची खात्रीशीर माहिती आता समोर आली आहे. तुकाराम मुंढे […]

उस्मानाबाद नव्हे, तुकाराम मुंढेंची 'या' ठिकाणी बदली!
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 5:00 PM

सुनील काळे, टीव्ही 9 मराठी, मुंबई : कर्तव्यदक्ष आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची नाशिक महापालिका आयुक्तपदावरुन बदली करण्यात आली आहे. मंत्रालयात नियोजन विभागाच्या सहसचिवपदी तुकाराम मुंढे यांची बदली करण्यात आली आहे. याआधी उस्मानाबादचे जिल्हाधिकारी म्हणून मुंढेंची बदली करण्यात आल्याची चर्चा होती. मात्र, मुंढेंची बदली मंत्रालयात करण्यात आल्याची खात्रीशीर माहिती आता समोर आली आहे.

तुकाराम मुंढे यांना सरकारकडून बदलीचे आदेश प्राप्त झाले असून, नाशिक महापालिका आयुक्तपदाचा कार्यभार नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नवीन पदाचा म्हणेच नियोजन विभागाच्या सहसचिवपदाचा कार्यभार त्वरित स्वीकारण्याचे आदेशही मुंढेंना देण्यात आले आहेत.

भाजप नगरसेवकांच्या नाराजीमुळे तुकाराम मुंढेंची बदली केल्याचं बोललं जात आहे.

तुकाराम मुंढे यांची कारकीर्द

नागपूर जिल्हा परिषदेवर 2008 साली तुकाराम मुंढे यांची सीईओ म्हणून नियुक्ती झाली. त्याच दिवशी त्यांनी शाळेला भेटी दिल्या आणि गैहजर शिक्षकांचं निलंबन केलं. वैद्यकीय कारभारात अनियमितता दिसल्याने काही डॉक्टरांनाही निलंबित केलं.

सोलापूरचे जिल्हाधिकारी असताना वाळू माफियांविरोधात कारवाईचा बडगा उगारला. त्यांना वाळू माफियांच्या रोषाचाही सामना करावा लागला. पंढरपूर मंदिर समितीच्या चेअरमनपदी नियुक्ती झाल्यानंतर मुख्यमंत्री सोडून इतरांचं व्हीआयपी दर्शन बंद केलं.

नवी मुंबईत महापालिका आयुक्तपदी बदली झाली. नवी मुंबईत आल्यानंतर अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरु केली आणि तिथेच तुकाराम मुंढे सत्ताधाऱ्यांच्या निशाण्यावर आले. नवी मुंबईतही त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणण्यात आला.

नवी मुंबईतून पुण्यात पीएमपीएमएल अध्यक्षपदी बदली झाली. पुण्यात गेल्यानंतर त्यांनी तोट्यात असलेल्या पीएमपीएमएलचा महसूल वाढवण्यासाठी अनेक पाऊलं उचलली, नियम बदलले आणि नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून सुविधा दिल्या. पण पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या निलंबनामुळे त्यांची कारकीर्द पुन्हा एकदा चर्चेत आली.

पुण्यातून तुकाराम मुंढे यांची बदली नाशिकला करण्यात आली. तिथे ते किमान एक वर्ष पूर्ण करतील, अशी अपेक्षा होती. पण एका वर्षाच्या आतच त्यांची बदली आता मंत्रालयात करण्यात आलीय.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.