पाच राज्यांच्या निकालावर मोदींची पहिली प्रतिक्रिया

नवी दिल्ली : 2014 च्या लोकसभा निवडणुकीनंतर पराभव काय असतो हे भाजपला क्वचितच पाहायला मिळालं. पण पराभव काय असतो हे भाजपला तेव्हा समजलं, जेव्हा हातातली अत्यंत महत्त्वाची तीन राज्य काँग्रेसने हिसकावून घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या राज्यातील पराभवानंतर जनतेचं कौल स्वीकारत जिंकलेल्या काँग्रेसचं अभिनंदन केलं आहे. पाचही राज्यातील जनतेचं मोदींनी अभिनंदन केलं. “विजयाबद्दल काँग्रेसचं […]

पाच राज्यांच्या निकालावर मोदींची पहिली प्रतिक्रिया
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:52 PM

नवी दिल्ली : 2014 च्या लोकसभा निवडणुकीनंतर पराभव काय असतो हे भाजपला क्वचितच पाहायला मिळालं. पण पराभव काय असतो हे भाजपला तेव्हा समजलं, जेव्हा हातातली अत्यंत महत्त्वाची तीन राज्य काँग्रेसने हिसकावून घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या राज्यातील पराभवानंतर जनतेचं कौल स्वीकारत जिंकलेल्या काँग्रेसचं अभिनंदन केलं आहे. पाचही राज्यातील जनतेचं मोदींनी अभिनंदन केलं.

“विजयाबद्दल काँग्रेसचं अभिनंदन. तेलंगणात केसीआर गारु (के. चंद्रशेखर राव) आणि मिझोराममध्ये मिझो नॅशनल फ्रंटला मिळालेल्या विजयाबद्दल शुभेच्छा”, असं ट्वीट मोदींनी केलं. पाच राज्यांच्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिक्रियेची प्रतीक्षा होती. अखेर त्यांनी काल रात्री उशिरा ट्वीट केलं.

मोदींनी आणखी एक ट्वीट केलं आहे. त्यामध्ये ते म्हणतात, “भाजपच्या कुटुंबातील कार्यकर्त्यांनी निवडणुकीसाठी रात्रंदिवस मेहनत केली. त्यांच्या या मेहनतीला मी सलाम करतो. जय आणि पराजय हा आयुष्यातील अविभाज्य भाग आहे. आजचा निकाल हा देशाच्या विकासासाठी आणखी चांगलं काम करण्यासाठी फायदेशीर ठरेल.”

राहुल गांधींची प्रतिक्रिया

“राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये त्या त्या मुख्यमंत्र्यांनी जे काम केले आहे, त्यासाठी त्यांचे आभार मानतो. मात्र आता बदल झाला आहे. आम्ही त्यांचे काम नव्याने पुढे नेत, या राज्यांना आणखी पुढे नेऊ. शेतकरी, युवा, लघुद्योजक इत्यादी सर्वांना जी आश्वासनं दिलीत, ती प्राधान्याने पूर्ण करु. “, असे राहुल गांधी म्हणाले. तसेच, रोजगार आणि शेतकऱ्यांच्या समस्या, हे आमच्या समोरील सर्वात महत्त्वाचे मुद्दे असतील, असंही राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं.

अंतिम निकाल (राज्यनिहाय आकडेवारी)

राजस्थान (199) :

काँग्रेस – 99 भाजप – 73 इतर – 27

मध्य प्रदेश (230) :

काँग्रेस – 114 भाजप -109 इतर – 07

छत्तीसगड (90) :

काँग्रेस – 68 भाजप – 15 इतर – 07

तेलंगणा (119) :

टीआरएस – 88 काँग्रेस-टीडीपी – 19 भाजप – 01 इतर – 11

मिझोराम (40) :

एमएनएफ – 26 काँग्रेस – 05 भाजप – 01 इतर – 08

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.