AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hit & Run : केंद्र सरकारचा मोठा निर्णय; हिट अँड रन प्रकरणातील बळींच्या कुटुंबियांना आठपट अधिक भरपाई

केंद्र सरकारच्या नव्या योजनेचे नाव 'हिट अँड रन मोटर अपघातातील बळींची भरपाई योजना, 2022' असे असणार असून ही योजना 1 एप्रिल 2022 पासून लागू होणार आहे. मंत्रालयाकडून 25 फेब्रुवारी 2022 रोजी 'हिट अँड रन' रस्ते अपघातातील पीडितांना भरपाई देण्याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

Hit & Run : केंद्र सरकारचा मोठा निर्णय; हिट अँड रन प्रकरणातील बळींच्या कुटुंबियांना आठपट अधिक भरपाई
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रो प्रकल्पाचे उदघाटन
| Updated on: Feb 28, 2022 | 12:00 AM
Share

नवी दिल्ली : देशभरात रस्ते अपघातांचे प्रमाण दिवसागणिक वाढतेच आहे. यातही जीवघेण्या अपघातांचे प्रमाण अधिक आहे. रस्त्यावर बेदरकारपणे गाडी चालवून पादचाऱ्याला धडक देऊन पळून जाण्याचे प्रकारही सातत्याने वाढत आहे. अशा अपघातात निरपराधी पादचाऱ्यांचे हकनाक बळी जात आहेत, मोठ्या प्रमाणावर लोक जखमी होत आहेत. अपघातातील मृत्यू पडणाऱ्या पादचाऱ्यांचे कुटुंबीय किंवा गंभीर जखमींना पुरेशी आर्थिक मदत मिळत नाही. या वस्तुस्थितीची गंभीर दखल घेत केंद्रातील मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता हिट अँड रन (Hit & Run) प्रकरणात मृत्युमुखी पडणाऱ्या रहिवाशांच्या कुटुंबियांना 8 पटीने अधिक भरपाई (Compensation) दिली जाणार आहे. अर्थात या भरपाईची रक्कम आता 2 लाख रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यासंदर्भात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने अधिसूचना जारी केली आहे. अपघातातील गंभीर जखमी झालेल्यांना 12,500 ऐवजी 50 हजार रुपये नुकसानभरपाई दिली जाणार आहे. (More compensation to the families of the victims of the hit and run case, A big decision of the central government)

भरपाईची नवी योजना 1 एप्रिलपासून लागू

केंद्र सरकारच्या नव्या योजनेचे नाव ‘हिट अँड रन मोटर अपघातातील बळींची भरपाई योजना, 2022’ असे असणार असून ही योजना 1 एप्रिल 2022 पासून लागू होणार आहे. मंत्रालयाकडून 25 फेब्रुवारी 2022 रोजी ‘हिट अँड रन’ रस्ते अपघातातील पीडितांना भरपाई देण्याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ज्यामध्ये नुकसानभरपाईची रक्कम वाढवण्यात आली आहे. गंभीर जखमींसाठी भरपाईची रक्कम वाढवून 50,000 रुपये करण्यात आली आहे, तर मृत्यूच्या बाबतीत सध्याच्या 25,000 रुपयांवरून 2,00,000 लाख रुपये अशी भरपाईची रक्कम वाढवण्यात आली आहे. 1 एप्रिल 2022 पासून ही नवी योजना जुन्या ‘भरपाई योजना, 1989 ची जागा घेईल. नुकसान भरपाईसाठी अर्ज करण्यासाठी व पीडितांना पैसे देण्यासाठीही मुदत निश्चित करण्यात आली आहे.

मोटार वाहन अपघात कायदा निधीशी संबंधित नियमही निश्चित

केंद्रीय मंत्रालयाने मोटार वाहन अपघात कायदा निधीशी संबंधित नियमही निश्चित केले आहेत. या निधीतून हिट अँड रन अपघातातील जखमींना उपचारासाठी तसेच इतर मदत केली जाणार आहे. या योजनेअंतर्गत रस्ते अपघातांची सखोल चौकशी करण्याची प्रक्रिया असणार आहे. अपघातांचा तपशीलवार अहवाल आणि दाव्यांचा जलद निपटारा यासाठीही तरतूद आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गेल्या वर्षी राज्यसभेत दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय राजधानी नवी दिल्लीमध्ये हिट अँड रन अपघातांमध्ये 536 लोकांचा मृत्यू झाला तर 1655 लोक गंभीर जखमी झाले. सरकारी आकडेवारीनुसार, 2020 मध्ये 3,66,138 रस्ते अपघात झाले. त्यात 1,31,714 लोकांचा मृत्यू झाला. (More compensation to the families of the victims of the hit and run case, A big decision of the central government)

इतर बातम्या

Video : युक्रेनच्या बॉर्डरवर भारतीयांना मारहाण, लाथा, बुक्क्या घालतानाचे व्हिडिओ व्हायरल

Russia Ukraine War : उत्तर प्रदेश दौरा अर्धवट सोडून पंतप्रधान मोदी दिल्लीकडे रवाना, रशिया-यूक्रेन युद्धावर उच्चस्तरीय बैठक

स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश
स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश.
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले...
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले....
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ.
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका.
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण...
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण....
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?.
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?.
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी...
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी....
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल.
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ.