Rohit Pawar : सरकार सत्ता टिकवण्यात जास्त मग्न, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष असा टोला रोहित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारला लगावला

कांद्याचा दर आज घसरला आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा खर्च पाहिला, तर 70 ते 80 हजाराच्या आसपास असून एकरी उत्पन्न 30 ते 40 हजार मिळतं. त्यामुळं शेतकऱ्यांना मोठं नुकसान सोसाव लागत आहे अशी खंत रोहित पवारांनी व्यक्त केली.

Rohit Pawar : सरकार सत्ता टिकवण्यात जास्त मग्न, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष असा टोला रोहित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारला लगावला
ROHIT PAWARImage Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Feb 16, 2023 | 10:50 AM

अहमदनगर : अहमदनगरला कर्जत (Ahmednagar karjat) तालुक्यात रब्बी हंगामात (Rabi season) यंदा विक्रमी कांदा लागवड झाल्याची माहिती मिळाली आहे. मात्र कांद्याच्या कोसळत्या दरावरून आमदार रोहित पवारांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. “सध्या सरकार सत्ता टिकवण्यात जास्त मग्न आहे, लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी नाही” असा टोला त्यांनी शिंदे फडणवीस सरकारला लगावला आहे. “त्याचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना होतोय, लवकरात लवकर राज्य सरकारने निर्णय घेण्याची गरज असल्याची भावना रोहित पवारांनी व्यक्त केली. त्याचबरोबर सरकार स्थापण झाल्यापासून सामान्य जनतेच्या प्रश्नाकडे शिंदे फडणवीस सरकार (shinde fadanvis government) दुर्लक्ष करीत आहे.

रब्बी हंगामात यंदा विक्रमी कांदा लागवड

विशेष म्हणजे यंदा कर्जत तालुक्यात रब्बी हंगामात विक्रमी कांद्या लागवड करण्यात आली आहे. 15 हजार हेक्टरच्या कांदा लागवड झाल्याने कांद्याचे उत्पादन सुध्दा वाढणार असल्याचे रोहित पवारांनी सांगितले. मात्र कांद्याचे दर दिवसेंदिवस कोसळत असल्याने शेतकरीवर्ग मोठा अडचणीत आला आहे. यावरून आमदार रोहित पवारांनी सरकारला चांगलेच धारेवर धरलंय. अतिवृष्टीमध्ये कर्जत तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. उर्वरित कांद्याला दर मिळत नाही, कांद्याचे दर यावर्षी दहा रुपयांच्या खाली आल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघेना, तर कांद्याला चांगला दर मिळेल, या आशेने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कांदा लागवड केली आहे.

शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा खर्च पाहिला…

कांद्याचा दर आज घसरला आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा खर्च पाहिला, तर 70 ते 80 हजाराच्या आसपास असून एकरी उत्पन्न 30 ते 40 हजार मिळतं. त्यामुळं शेतकऱ्यांना मोठं नुकसान सोसाव लागत आहे अशी खंत रोहित पवारांनी व्यक्त केली. या सगळ्या प्रकरणाची दखल राज्य सरकारने घ्यायला हवी होती. कांद्याचे दर घसरत असताना सुद्धा सरकार एकदम शांत आहे. अद्याप एकही बैठक घेतली नसून नाफेडला एक पत्र सुध्दा पाठवलेलं नाही अशी टीका रोहित पवारांनी केली.

हे सुद्धा वाचा

कापूस शेतकरी सुध्दा दर वाढवण्याची मागणी सरकारकडे करीत आहे.

शेतकऱ्यांच्या बाबतीतल्या रोज बातम्या कानावर पडत असतात, त्याचबरोबर शेतकऱ्यांना सरकारने हवी तशी मदत करीत नसल्याचे शेतकरी जाहीरपणे सांगत आहेत. कांद्यासह कापूसाचे दर सु्द्धा कोसलळे आहेत. कापूस शेतकरी सुध्दा दर वाढवण्याची मागणी सरकारकडे करीत आहे.

Non Stop LIVE Update
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.