‘जशी त्यांनी आंबेडकरी गाणी गायली नाहीत तशी…’ लता मंगेशकर यांच्यावर आंबेडकरांची टिप्पणी

Prakash Ambedkar | शिवाजी पार्कवर केल्या जात असलेल्या अंत्यसंस्कारावरुनही प्रकाश आंबेडकर यांनी निशाणा साधलाय. मैदानावर खेळ खेळले जावे जावेत, स्मारकाकरता इतर अनेक जागा आहेत, खेळाच्या जागी अतिक्रमण करु नये, असं त्यांनी म्हटलंय.

'जशी त्यांनी आंबेडकरी गाणी गायली नाहीत तशी...' लता मंगेशकर यांच्यावर आंबेडकरांची टिप्पणी
प्रकाश आंबेडकरांची लता मंगेशकरांवर टिप्पणी
Follow us
| Updated on: Feb 09, 2022 | 12:45 PM

मुंबई : लता मंगेशकर यांच्या निधनावर प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar on Lata Mangeshkar) यांनी महत्त्वाची टिप्पणी केली. लता मंगेशकर यांनी आंबेडकरांची गाणी गायली नाही, याबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा ते बोलत होते. लता मंगेशकरांनी आंबेडकरांची गाणी गायली नाही, हे त्या जिवंत असताना विचारायला हवं होतं, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय. इतकंच काय तर जशी त्यांनी आंबेडकरांची गाणी गायली नाहीत, तशीच त्यांनी सरदार पटेल आणि नेहरुंचीही (Sardar Patel & Nehru) गाणी गायली नाही, असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय. एकेकाची प्रिन्सिमल् असतात, असं म्हणत त्यांनी लता मंगेशकरांनी आंबेडकरी गाणी का गायली नाहीत, या प्रश्नाला उत्तर दिलंय. रविवारी (6 फेब्रुवारी, 2022) लता मंगेशकर यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर दिग्गजांनी लता मंगेशकर यांच्या गाण्याचं (Lata Mangeshkar Songs), त्यांच्या संगीत क्षेत्रातील योगदाराचं भरभरुन कौतुक करत त्यांना आदरांजली वाहिली होती. दरम्यान, आता याबाबतच प्रकाश आंबेडकर यांनी प्रत्युत्तर दिलंय.

शाहरुख खानवरुन झालेल्या वादावर काय म्हणाले?

दरम्यान, शाहरुख खानच्या फुंकरवरुनही त्याला ट्रोल करणाऱ्यांना प्रकाश आंबेडकर यांनी प्रत्युत्तर दिलंय. त्यांनी म्हटलंय की, मी मुस्लिम व्यक्तींच्या प्रेतयात्रेला मी गेलोय. मी बघितलंय की अनेक ठिकाणी फुंकर घातली जाते.हे देशाचं वैविध्यपूर्ण कल्चर आहे. ते स्वीकारायलाच हवं! ज्यांना पटत नसेल त्यांनी शांत रहावं, असा सल्लाही प्रकाश आंबेडकर यांनी दिलाय.

प्रकाश आंबेडकर नेमकं काय म्हणाले? पाहा व्हिडीओ –

ट्वीटच्या माध्यमातून आदरांजली

शिवाजी पार्कची स्मशानभूमी करु नका

दरम्यान, शिवाजी पार्कवर केल्या जात असलेल्या अंत्यसंस्कारावरुनही प्रकाश आंबेडकर यांनी निशाणा साधलाय. मैदानावर खेळ खेळले जावे जावेत, स्मारकाकरता इतर अनेक जागा आहेत, खेळाच्या जागी अतिक्रमण करु नये, असं त्यांनी म्हटलंय. सोबतच शिवाजी पार्क हे शिवाजी पार्कच रहावं, त्याची स्मशानभूमी करु नये, असाही टोला प्रकाश आंबेडकर यांनी लगावला आहे. तसंच सोशल मीडियावर लोकांनी ट्रोल करण्याचं घाणेरडं काम करणाऱ्यांचाही प्रकाश आंबेडकर यांनी निषेध नोंदवलाय.

शिवाजी पार्कवरही सूचक विधान – पाहा व्हिडीओ

संबंधित बातम्या :

Fact Check : लतादीदींनी आंबेडकरी गाणी गायली नाहीत की त्यांच्याकडे कुणी गाणं घेऊन गेलं नाही? काय वास्तव?

लता मंगेशकर यांच्या अंत्यदर्शनाला मराठीतले मोठे तारे-सितारे कुठे गायब होते? दबक्या आवाजात कुजबूज सुरु!

रिजेक्ट झालेलं गाणं लतादीदींनी गायलं, ‘लग जा गले’ अजरामर ठरलं, 60 वर्षानंतरही रसिकांच्या ओठावरचं गाणं!

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.