निकालाआधीच विकिपीडिया अपडेट, राजस्थानचा मुख्यमंत्रीही ठरवला!

मुंबई : राजस्थानमध्ये काँग्रेसने बहुमताकडे वाटचाल केली आहे. काँग्रेसच राजस्थानमध्ये सत्ता स्थापन करेल, हे एव्हाना निश्चित झाले आहे. त्यामुळे अर्थात राजस्थानात काँग्रेसच्या सरकारचं नेतृत्त्व कोण करेल, मुख्यमंत्रिपदी कुणाची निवड होईल, याची चर्चा आता सुरु झाली आहे. या चर्चेचं उत्तर काँग्रेसच्या हायकमांडकडून येण्याआधीच, विकिपीडियाने दिले आहे. विकिपीडियाच्या ‘List of Chief Mnisters of Rajsthan’ या पेजवर राजस्थानचे […]

निकालाआधीच विकिपीडिया अपडेट, राजस्थानचा मुख्यमंत्रीही ठरवला!
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:52 PM

मुंबई : राजस्थानमध्ये काँग्रेसने बहुमताकडे वाटचाल केली आहे. काँग्रेसच राजस्थानमध्ये सत्ता स्थापन करेल, हे एव्हाना निश्चित झाले आहे. त्यामुळे अर्थात राजस्थानात काँग्रेसच्या सरकारचं नेतृत्त्व कोण करेल, मुख्यमंत्रिपदी कुणाची निवड होईल, याची चर्चा आता सुरु झाली आहे. या चर्चेचं उत्तर काँग्रेसच्या हायकमांडकडून येण्याआधीच, विकिपीडियाने दिले आहे.

विकिपीडियाच्या ‘List of Chief Mnisters of Rajsthan’ या पेजवर राजस्थानचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे राजस्थानातील तरुण नेते सचिन पायलट यांचं नाव प्रकाशित केले. विशेष म्हणजे, ’13 डिसेंबर 2018′ पासून पायलट राजस्थानचे मुख्यमंत्री असतील, हेही या पेजवर प्रकाशित करण्यात आले होते.

दरम्यान, सोशल मीडियावर विकिपीडियाच्या पेजचा स्क्रीनशॉट फिरु लागल्यानंतर, विकिपीडियाने पेजवरुन सचिन पायलट यांचे नाव हटवले आणि राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदाची खुर्ची अद्याप रिकामी असल्याचे म्हटले आहे. मात्र, सोशल मीडियावरुन राजस्थानचे मुख्यमंत्री म्हणून सचिन पायलट यांच्या नावाचं स्वागत केले जाते आहे.

राजस्थानात काँग्रेसकडून मुख्यमंत्रिपदासाठी दोन दावेदार मुख्य मानले जात आहेत. त्यात पहिले अर्थात माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि दुसरे दावेदार आहेत राहुल गांधी यांचे निकटवर्तीय आणि तरुण नेते सचिन पायलट. आता दोघांमधील कुणाच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.