या निवडणुकीतही ईव्हीएमवर आरोप होणार का?

मुंबई : गेल्या काही वर्षांपासून देशातील प्रत्येक निवडणुकीत भाजप वगळता इतर सर्व पक्षांनी ईव्हीएमशी छेडछाड झाल्याचे आरोप केलेत. निवडणूक आयोगाने या आरोपांचं वारंवार खंडन केलं, पण राजकीय पक्षांकडून आरोप हे सातत्याने करण्यात आले. आता पाच राज्यात होत असलेल्या निवडणुकीत तीन महत्त्वाच्या राज्यांमध्ये काँग्रेसचं सरकार येताना दिसतंय. त्यामुळे या निवडणुकीतही ईव्हीएमचे आरोप होणार का, असा प्रश्न […]

या निवडणुकीतही ईव्हीएमवर आरोप होणार का?
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:52 PM

मुंबई : गेल्या काही वर्षांपासून देशातील प्रत्येक निवडणुकीत भाजप वगळता इतर सर्व पक्षांनी ईव्हीएमशी छेडछाड झाल्याचे आरोप केलेत. निवडणूक आयोगाने या आरोपांचं वारंवार खंडन केलं, पण राजकीय पक्षांकडून आरोप हे सातत्याने करण्यात आले. आता पाच राज्यात होत असलेल्या निवडणुकीत तीन महत्त्वाच्या राज्यांमध्ये काँग्रेसचं सरकार येताना दिसतंय. त्यामुळे या निवडणुकीतही ईव्हीएमचे आरोप होणार का, असा प्रश्न सोशल मीडियातून उपस्थित केला जातोय.

राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम राज्यांच्या निवडणुकात अनेकदा ईव्हीएमबाबत तक्रारी आल्या. काँग्रेस कार्यकर्त्यांनी तर मतदान झाल्यापासून स्ट्राँग रुमबाहेर पहारा दिला होता. मतमोजणीच्या क्षणापर्यंत काँग्रेस कार्यकर्त्यांची यावर नजर होती.

काँग्रेसने या पाच राज्यांच्या निवडणुकांमधून जबरदस्त कमबॅक केलंय. पण नुकत्याच झालेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वीच्या सर्वपक्षीय बैठकीतही विरोधी पक्षांनी ईव्हीएमशी छेडछाडीचा आरोप केला होता. अनेक पक्षांनी मतपत्रिकांद्वारे निवडणुका घेण्याची मागणी केली आहे.

10 डिसेंबर रोजी काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांनी ईव्हीएमच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. भाजपकडून ईव्हीएमचा गैरवापर केला जातोय असं ते म्हणाले होते. एवढंच नाही, तर गुजरात आणि कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीनंतरही भाजपने ईव्हीएममध्ये घोळ करुन निवडणूक जिंकल्याचा दावा करण्यात आला होता.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत अगोदर भाजपने मोठी आघाडी घेतली होती. त्यानंतर तातडीने काँग्रेसकडून ईव्हीएमशी छेडछाड झाल्याचा आरोप करण्यात आला. पण नंतर भाजप पिछाडीवर गेल्यानंतर काँग्रेसनेच आघाडी घेतली होती.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.