‘दादा मी प्रेग्नंट आहे’ पोस्टरचा अर्थ समजला?

पुणे: मुंबईतल्या दादरप्रमाणेच पुण्यातही एक पोस्टर सध्या उत्सुकतेचा विषय ठरलं आहे. या पोस्टरवर ‘दादा मी प्रेग्नंट आहे’ असं लिहिण्यात आलं आहे. हे पोस्टर नक्की काय आहे आणि कशासाठी आहे, हे स्पष्ट झालेलं नाही. पण त्याबद्दल तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. ‘दादा मी प्रेग्नंट आहे, असे पोस्टर्स मुंबई आणि पुण्यात लावले आहेत. मुंबई-पुण्यासारख्या शहरांना चर्चेला कोणतंही कारण पुरतं. […]

‘दादा मी प्रेग्नंट आहे' पोस्टरचा अर्थ समजला?
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:55 PM

पुणे: मुंबईतल्या दादरप्रमाणेच पुण्यातही एक पोस्टर सध्या उत्सुकतेचा विषय ठरलं आहे. या पोस्टरवर ‘दादा मी प्रेग्नंट आहे’ असं लिहिण्यात आलं आहे. हे पोस्टर नक्की काय आहे आणि कशासाठी आहे, हे स्पष्ट झालेलं नाही. पण त्याबद्दल तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. ‘दादा मी प्रेग्नंट आहे, असे पोस्टर्स मुंबई आणि पुण्यात लावले आहेत.

मुंबई-पुण्यासारख्या शहरांना चर्चेला कोणतंही कारण पुरतं. पुण्यात सध्या या पोस्टरनं सर्वांच लक्ष वेधलंय. अन् त्यावर चर्चाही सुरू आहे. गजबजलेल्या ठिकाणी लागलेलं हे पोस्टर सध्या चर्चेचा विषय ठरलाय. ‘दादा मी प्रेग्नंट आहे’  असं या पोस्टरवर लिहिण्यात आलं आहे.

मुंबईतल्या दादरच्या प्रभादेवी भागातही हेच पोस्टर नागरिकांचं लक्ष्य वेधून घेतंय. आता पुण्यातील कर्वेरोड येथील डेक्कन टी पॉईंट येथे हे पोस्टर लागलंय. मात्र या होर्डिंगबाबत तर्कवितर्क व्यक्त करण्यात येत आहेत. ते कलाविश्वाशी संबंधित असल्याचं काही जणांचा तर्क आहे.

मुंबई-पुणे-मुंबई सिनेमाची जाहिरात?

या होर्डिंगबाबत अनेकजण तर्क लढवत आहेत, त्यापैकी एक तर्क म्हणजे ही मुंबई-पुणे-मुंबई सिनेमाची जाहिरात असू शकते. स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे यांची मुख्य भूमिका असलेला ‘मुंबई-पुणे-मुंबई3’ सिनेमाच्या दोन सिक्वेलनंतर आता तिसरा सिक्वेल येत आहे. हा सिनेमा येत्या 7 सात डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला होता. त्यनुसार अभिनेत्री मुक्ती बर्वे प्रेग्नंट आहे.

या सिनेमाच्या पहिल्या भागात स्वप्नील आणि मुक्ता यांच्यातील केमेस्ट्री दाखवली होती. त्यानंतर सिक्वेल आला. त्यामध्ये  दोघांच्या लग्नाची बोलणी, रुसवा-फुगवा, दोन्हीकडील नातेसंबंध इत्यादींवर कथानक बेतलं होतं. आता तिसरा भाग येत आहे. ट्रेलर पाहिल्यावर लक्षात येतं की, ‘मुंबई-पुणे-मुंबई 3’ सिनेमात स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे यांनी साकारलेल्या जोडप्याच्या आयुष्यात बाळ येणार असतं आणि त्यासाठी मग हॉस्पिटल, काय खावं-काय नाही वगैरे सगळी धावाधाव तिसऱ्या भागात असल्याचे दिसते आहे.  त्यामुळे मुंबई- पुण्यातील पोस्टर्स हे या सिनेमाची जाहिरात तर नाही ना असे तर्क लढवले जात आहेत?

‘मुंबई-पुणे-मुंबई 3’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज

पाहा ट्रेलर:

साधारणपणे दोन महिन्यांपूर्वी ‘शिवडे आय एम सॉरी’ असे जवळपास 400 होर्डिंग पुण्यात लागले होते. ते एका प्रेमवीरानं लावल्याचं नंतर उघड झालं. त्यानंतर आता ‘दादा मी प्रेग्नंट आहे’ हे होर्डिंग चांगलंच गाजत आहे. मात्र या होर्डिंग्सबाबची नागरिकांची उत्सुकता प्रचंड वाढल्याचं दिसून येत आहे.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.