ऑस्ट्रेलियन चाहत्यांनी कोहलीला चिडवलं, रिकी पाँटिंगचीही नाराजी

अॅडिलेड : ऑस्ट्रेलियन संघ आणि स्लेजिंग हे समीकरण आहे. यात ऑस्ट्रेलियन चाहतेही मागे नाहीत, हे भारत वि. ऑस्ट्रेलिया यांच्यातील अॅडिलेड कसोटीत समोर आलं. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली मैदानात उतरताच ऑस्ट्रेलियन चाहत्यांनी हूटिंग (खेळाडू चिडेल असा आवाज करणे) करणं सुरु केलं. विराट कोहलीचं लक्ष विचलित करणं हा यामागचा उद्देश असावा. पण ऑस्ट्रेलियन खेळाडूंनीही या प्रकारावर […]

ऑस्ट्रेलियन चाहत्यांनी कोहलीला चिडवलं, रिकी पाँटिंगचीही नाराजी
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:52 PM

अॅडिलेड : ऑस्ट्रेलियन संघ आणि स्लेजिंग हे समीकरण आहे. यात ऑस्ट्रेलियन चाहतेही मागे नाहीत, हे भारत वि. ऑस्ट्रेलिया यांच्यातील अॅडिलेड कसोटीत समोर आलं. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली मैदानात उतरताच ऑस्ट्रेलियन चाहत्यांनी हूटिंग (खेळाडू चिडेल असा आवाज करणे) करणं सुरु केलं. विराट कोहलीचं लक्ष विचलित करणं हा यामागचा उद्देश असावा. पण ऑस्ट्रेलियन खेळाडूंनीही या प्रकारावर नाराजी व्यक्त केली आहे.

दुसऱ्या डावात लोकेश राहुल बाद झाल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी विराट कोहली मैदानात उतरला. पहिल्या डावातही कोहलीला या परिस्थितीचा सामना करावा लागला होता. या हूटिंगनंतर ऑस्ट्रेलियाचा फलंदाज ट्रेविस हेड आणि माजी कर्णधार रिकी पाँटिंग यांनीही चाहत्यांच्या या कृत्यावर नाराजी व्यक्त केली.

विराट एक चांगला खेळाडू आहे आणि असा खेळाडू आहे, ज्याची हूटिंग केली जाऊ शकत नाही. याची गरज नव्हती, पण ते चाहते आहेत, असं हेड म्हणाला. पण भारतीय संघ अशा गोष्टींकडे लक्ष देत नाही, असं उत्तर जसप्रीत बुमराने या प्रश्नावर दिलं.

आमच्यासाठी अशा गोष्टी महत्त्वाच्या नाहीत. मैदानात जे होतं, ते आमच्यासाठी गरजेचं आहे. याशिवाय कोणत्याही गोष्टींवर आमचं नियंत्रण नसतं. वाट्टेल तसं ते वागू शकतात. आम्ही चांगलं खेळतोय तोपर्यंत खुश आहोत, असं स्पष्टीकरण जसप्रीत बुमराने दिलं.

रिकी पाँटिंगनेही प्रेक्षकांच्या या कृत्यावर नाराजी व्यक्त केली. हा प्रकार पाहून मला बिलकुल चांगलं वाटलं नाही, असं रिकी पाँटिंग म्हणाला. एक खेळाडू म्हणून इंग्लंड दौऱ्यात मलाही या प्रकाराचा सामना करावा लागला होता. पण मी त्याकडे दुर्लक्ष केलं, असं पाँटिंगने सांगितलं.

दरम्यान, कोहलीला हूटिंगचा सामना करावा लागल्याची ही पहिली वेळ नाही. 2011-12 साली ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सिडनीतील सामन्यातही कोहलीसोबत हा प्रकार घडला होता. शिवाय इंग्लंड दौऱ्यातही कोहलीसाबत हा प्रकार घडला होता. पण कोहली अशा गोष्टींकडे नेहमी दुर्लक्ष करतो आणि त्याचं खेळावरील लक्ष विचलित होऊ देत नाही.

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.