AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Icc Womens World Cup 2025 चं वेळापत्रक जाहीर, टीम इंडिया-पाकिस्तान भिडणार

Icc Womens Cricket World Cup 2025 Schedule : आगामी आयसीसी वनडे वूमन्स वर्ल्ड कप 2025 स्पर्धेत टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान आमनेसामने असणार आहेत. हा सामना कधी आणि कुठे होणार? जाणून घ्या.

Icc Womens World Cup 2025 चं वेळापत्रक जाहीर, टीम इंडिया-पाकिस्तान भिडणार
India vs PakistanImage Credit source: PTI
| Updated on: Jun 16, 2025 | 10:32 AM
Share

क्रिकेट विश्वातून या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आगामी वूमन्स वर्ल्ड कप 2025 स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. आयसीसीने 2 जून रोजी या स्पर्धेचं आयोजन कोणत्या स्टेडियममध्ये होणार? या स्पर्धेत एकूण किती संघ सहभागी होणार? याबाबतची माहिती दिली होती. त्यानंतर आता बीसीसीआय सचिव देवजित सैकीया यांनी फेसबूकवरुन वूमन्स वर्ल्ड कप स्पर्धेचं वेळापत्रकाची माहिती दिली आहे.  बीसीसीआय सचिवांनी फेसबूक पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, वूमन्स वर्ल्ड कप स्पर्धेला 30 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. तर 2 नोव्हेंबरला अंतिम सामना पार पडणार आहे. तर 29 आणि 30 ऑक्टोबर रोजी उपांत्य फेरीतील सामने होणार आहेत.

या स्पर्धेच्या यजमानपदाचा मान हा भारताकडे आहे. तसेच श्रीलंकेची राजधानी कोलंबोतही काही सामने खेळवण्यात येणार आहेत. एकूण 5 स्टेडियममध्ये सामने होणार आहेत.बंगळुरु, इंदूर, वायझॅग, कोलंबो आणि गुवाहाटी इथे या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. ही स्पर्धा राउंड रॉबिन पद्धतीने खेळवण्यात येणार आहे. साखळी फेरीत एकूण 28 सामने होणार आहेत. 30 सप्टेंबर ते 26 ऑक्टोबर दरम्यान एकूण 8 संघांमध्ये साखळी फेरीतील 28 सामने पार पडणार आहेत. प्रत्येक संघ साखळी फेरीत प्रत्येकी 7-7 सामने खेळणार आहे. त्यानंतर सेमी फायनलमधील 2 सामने खेळवण्यात येतील. तर 2 नोव्हेंबरला वर्ल्ड चॅम्पियन टीम निश्चित होईल.

टीम इंडिया या स्पर्धेतील साखळी फेरीतील पहिला आणि शेवटचा सामना खेळणार आहे. टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात महामुकाबला होणार आहे. पहलगाम हल्ल्यानंतर दोन्ही देशातील संबंध फार ताणले गेले होते. त्यामुळे भारत पाकिस्तान विरुद्ध खेळणार नाही, असं म्हटलं जात होतं. मात्र बीसीसीआय सचिवांनी दिलेल्या माहितीनुसार भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. भारत यजमान असल्याने पाकिस्तानचे सर्व सामने हे कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये होणार आहेत.

स्पर्धेचं वेळापत्रक

  1. मंगळवार, 30 सप्टेंबर, टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका, बंगळुरू, दुपारी 3 वाजता
  2. बुधवार, 1 ऑक्टोबर, ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड, इंदूर, दुपारी 3 वाजता
  3. गुरुवार, 2 ऑक्टोबर, बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान, कोलंबो, दुपारी 3 वाजता
  4. शुक्रवार, 3 ऑक्टोबर, इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका, बंगळुरू, दुपारी 3 वाजता
  5. शनिवार, 4 ऑक्टोबर, ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका, कोलंबो,दुपारी 3 वाजता
  6. रविवार, 5 ऑक्टोबर, भारत विरुद्ध पाकिस्तान, कोलंबो, दुपारी 3 वाजता
  7. सोमवार, 6 ऑक्टोबर, न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका, इंदूर, दुपारी 3 वाजता
  8. मंगळवार, 7 ऑक्टोबर, इंग्लंड विरुद्ध बांगलादेश, गुवाहाटी, दुपारी 3 वाजता
  9. बुधवार, 8 ऑक्टोबर, ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान, कोलंबो, दुपारी 3 वाजता
  10. गुरुवार, 9 ऑक्टोबर, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका,वायझॅग,दुपारी 3 वाजता
  11. शुक्रवार, 10 ऑक्टोबर, न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश, वायझॅग,दुपारी 3 वाजता
  12. शनिवार, 11 ऑक्टोबर, इंग्लंड विरुद्ध श्रीलंका, गुवाहाटी, दुपारी 3 वाजता
  13. रविवार, 12 ऑक्टोबर,भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, वायझॅग,दुपारी 3 वाजता
  14. सोमवार, 13 ऑक्टोबर, दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेश, वायझॅग,दुपारी 3 वाजता
  15. मंगळवार, 14 ऑक्टोबर, न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका, कोलंबो, दुपारी 3 वाजता
  16. बुधवार, 15 ऑक्टोबर, इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान, कोलंबो, दुपारी 3 वाजता
  17. गुरुवार, 16 ऑक्टोबर, ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश, वायझॅग,दुपारी 3 वाजता
  18. शुक्रवार, 17 ऑक्टोबर, दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका, कोलंबो, दुपारी 3 वाजता
  19. शनिवार, 18 ऑक्टोबर, न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान, कोलंबो, दुपारी 3 वाजता
  20. रविवार, 19 ऑक्टोबर, भारत विरुद्ध इंग्लंड, इंदूर, दुपारी 3 वाजता
  21. सोमवार, 20 ऑक्टोबर, श्रीलंका विरुद्ध बांगलादेश, कोलंबो, दुपारी 3 वाजता
  22. मंगळवार, 21 ऑक्टोबर, दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान, कोलंबो, दुपारी 3 वाजता
  23. बुधवार, 22 ऑक्टोबर, ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड, इंदूर, दुपारी 3 वाजता
  24. गुरुवार, 23 ऑक्टोबर, भारत विरुद्ध न्यूझीलंड, गुवाहाटी, दुपारी 3 वाजता
  25. शुक्रवार, 24 ऑक्टोबर, पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका, कोलंबो, दुपारी 3 वाजता
  26. शनिवार, 25 ऑक्टोबर, ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका, इंदूर, दुपारी 3 वाजता
  27. रविवार, 26 ऑक्टोबर, इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड, गुवाहाटी, सकाळी 11 वाजता
  28. रविवार, 26 ऑक्टोबर, भारत विरुद्ध बांगलादेश, बंगळुरू, दुपारी 3 वाजता
  29. बुधवार, 29 ऑक्टोबर, सेमी फायनल 1, गुवाहाटी किंवा कोलंबो, दुपारी 3 वाजता
  30. गुरुवार, 30 ऑक्टोबर, सेमी फायनल 2, बंगळुरू, दुपारी 3 वाजता
  31. रविवार, 2 नोव्हेंबर, महाअंतिम सामना, कोलंबो किंवा बंगळुरू, दुपारी 3 वाजता

दरम्यान इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात 26 ऑक्टोबर रोजी गुवाहाटीत होणाऱ्या सामन्याचा अपवाद वगळता उर्वरित सर्व सामन्यांना भारतीय वेळेनुसार एकाच वेळी सुरुवात होणार आहे. बीसीसीआय सचिवांनी दिलेल्या माहितीनुसार, या सामन्यांना दुपारी 3 वाजता सुरुवात होणार आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.