Rishabh Pant Health Update : ऋषभ पंतच्या गुडघ्यावर ऑपरेशन पूर्ण, आता कशी आहे तब्येत?

डॉक्टर दिनशॉ पारदीवाला (Dr Dinshaw Pardiwala) हे कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये स्पोर्ट्स मेडिसनचे अध्यक्ष आहेत. डॉ दिनशॉ यांनीच पंतवर शस्त्रक्रिया केली.

Rishabh Pant Health Update : ऋषभ पंतच्या गुडघ्यावर ऑपरेशन पूर्ण, आता कशी आहे तब्येत?
Follow us
| Updated on: Jan 07, 2023 | 5:49 PM

मंबई : टीम इंडियाचा विकेटकीपर बॅट्समन ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) गुडघ्यावर यशस्वीरित्या शस्त्रक्रिया (Ligament Surgery) पार पडलेली आहे. पंतच्या गुडघ्यावर तब्बल 3 तास ऑपरेशन सुरु होतं. मुंबईतील अंधेरीतील कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये (Kokilaben Hospital) ही शस्त्रक्रिया पार पडली. बीसीसीआयने (Bcci) याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. पंतला बुधवारी देहरादूनवरुन मुंबईत एअरलिफ्ट करण्यात आलं होतं. (indian cricketer rishabh pant underwent successful ligament surgery at kokilaben ambani hospital in mumbai)

पंतचा 30 डिसेंबरला कार अपघात झाला. पंत दिल्लीवरुन रुडकीला आपल्या राहत्या घरी आईला सरप्राईज द्यायला जात होता. या दरम्यान दिल्ली-देहरादून हायवेवर गाडी डिव्हायडरला धडकली. त्यानंतर गाडीने पेट घेतला. मात्र त्याआधीच पंत गाडीबाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला. या अपघातानंतर पंतवर देहरादूनमध्ये 6 दिवस रुग्णालयात ठेवण्यात आलं. त्यानंतर पंतला पुढील उपचारांसाठी मुंबईत शिफ्ट करण्यात आलं.

मिड डेच्या रिपोर्टनुसार, पंतवर शुक्रवारी शस्त्रक्रिया पार पडली. पंतच्या उजव्या पायाचा लिगामेंट अपघातात फाटला. डॉक्टर दिनशॉ पारदीवाला हे कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये स्पोर्ट्स मेडिसनचे अध्यक्ष आहेत. डॉ दिनशॉ यांनीच पंतवर शस्त्रक्रिया केली.

हे सुद्धा वाचा

रिपोर्टनुसार, शुक्रवारी 10 वाजून 30 मिनिटांनी शस्त्रक्रियेला सुरुवात झाली जी एकूण 3 तास चालली. बीसीसीआयने दिलेल्या आदेशांमुळे पंतच्या शस्त्रक्रियेबाबत कोणतीही माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली नाही. पंतवर शस्त्रक्रियेच्या आधी 3 दिवस अनेक चाचण्या करण्यात आल्या.

पंतला आता पूर्णपणे बरं होण्यासाठी काही महिन्यांचा वेळ लागेल. पंतवर आता उपचारानंतर बीसीसीआयचं वैद्यकीय पथक लक्ष ठेवणार आहे. पंतच्या उपचारांचा सर्व खर्च हा बीसीसीआय करणार आहे.

पंत आणखी किती दिवस हॉस्पिटलमध्ये?

पंतला ऑपरेशननंतर नियमितपणे गुडघ्याच्या एक्सरसाईज आणि फिजियोथेरेपीची गरज आहे, अशी माहिती डॉक्टर अखिलेश यांनी टीव्ही9 ला दिली. डॉ अखिलेश यांनी दिलेल्या माहितीनुसार, लिगामेंट ऑपरेशननंतर कुणालाही उठायला आणि बसून काम करायला किमान 6-8 आठवड्यांचा वेळ लागतो. अनेकदा ऑपरेशननंतरही गुडघ्याचा त्रास होतो. तसे इंफेक्शन होण्याचाही धोकाही असतो. त्यामुळे पंतला आणखी काही दिवस रुग्णालयात थांबायला लागणार असल्याचं डॉ अखिलेश यांनी सांगितलं.

Non Stop LIVE Update
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.