IndvsAus : भारत विजयापासून 6 पावलं दूर

अॅडिलेड : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अॅडिलेड कसोटीत भारताला विजयासाठी सहा विकेट्सची गरज आहे. चौथ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा ऑस्ट्रेलियाची परिस्थिती चार बाद 104 अशी होती. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी आणखी 219 धावांची गरज आहे. शॉर्न मार्श (31) आणि ट्रेविस हेड (11) सध्या खेळपट्टीवर आहेत. भारताला पहिल्या डावात 15 धावांची आघाडी मिळाली होती आणि दुसर्या डावात 307 धांवांची मजल मारली. […]

IndvsAus : भारत विजयापासून 6 पावलं दूर
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:52 PM

अॅडिलेड : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अॅडिलेड कसोटीत भारताला विजयासाठी सहा विकेट्सची गरज आहे. चौथ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा ऑस्ट्रेलियाची परिस्थिती चार बाद 104 अशी होती. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी आणखी 219 धावांची गरज आहे. शॉर्न मार्श (31) आणि ट्रेविस हेड (11) सध्या खेळपट्टीवर आहेत.

भारताला पहिल्या डावात 15 धावांची आघाडी मिळाली होती आणि दुसर्या डावात 307 धांवांची मजल मारली. 322 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियाला अॅरॉन फिंच आणि हॅरिस यांच्या रुपाने सुरूवातीलाच दोन धक्के लागले. त्यानंतर ख्वाजा आणि हँड्सकॉम्ब यांना माघारी धाडण्यातही भारतीय गोलंदाजांना यश आलं. अश्विन आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.

खेळपट्टीची स्थिती पाहता ऑस्ट्रेलियन फलंदाजांना उद्या 219 धावा करण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. वेगवान गोलंदाजांचा प्रभावी मारा आणि अश्विनच्या फिरकीचा सामना करणं आस्ट्रेलियन फलंदाजांना जिकिरीचं होऊन बसलंय. त्यामुळे उभय संघ शेवटच्या दिवशी विजयासाठी कसरत करताना दिसणार आहेत.

भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करत असलेल्या ऑस्ट्रेलियाने सलामीची भागीदारी रचण्याचा प्रयत्न केला. फिंचने 11 धावांसाठी 35 तर मार्कस हॅरिसने 26 धावांसाठी 49 चेंडूंचा सामना केला. पण अश्विन आणि शमीने हा प्रयत्न फार काळ टिकू दिला नाही. फिंच आणि हॅरिसला स्वस्तात माघारी धाडण्यात भारताला यश आलं.

अॅडलेड कसोटीच्या तिसऱ्या दिवशी, भारताने 3 बाद 151 अशी मजल मारली होती. त्यामुळे भारताची आघाडी पहिल्या डावातील 15 धावांमुळे 166 पर्यंत वाढली. तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा चेतेश्वर पुजारा 40 आणि अजिंक्य रहाणे 1 धावांवर खेळत होते. रहाणेने चौथ्या दिवशी शानदार अर्धशतक साजरं केलं. भारताने ऑस्ट्रेलियाचा डाव 235 धावांवर गुंडाळल्यामुळे भारताला पहिल्या डावात 15 धावांची आघाडी मिळाली. त्यानंतर दुसऱ्या डावात भारतीय सलामीवीरांनी आश्वासक सुरुवात केली. मुरली विजय आणि के एल राहुल यांनी 63 धावांची सलामी दिली. ही जोडी टिकली असं वाटत असतानाच मिचेल स्टार्कने मुरली विजयला हॅण्डस्कोम्बकरवी झेलबाद केलं. मुरली विजयने 18 धावा केल्या.

Non Stop LIVE Update
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.