अनिल गोटे भाजपची वाट लावणार, 7 पानी पत्र लिहून पैशाचा व्यवहार जाहीर

विशाल ठाकूर, टीव्ही9 मराठी, धुळे: धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपमध्ये अंतर्गत बंडाळीने टोक गाठलं आहे. धुळे शहराचे भाजप आमदार अनिल गोटे यांनी संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची सभा उधळल्यानंतर, स्वत:च महापौरपदाचे उमेदवार असल्याचं घोषित केलं. त्यानंतर त्यांनी भाजपलाही रामराम करणार असल्याचं जाहीर केलं आहे. आता तर अनिल गोटे […]

अनिल गोटे भाजपची वाट लावणार, 7 पानी पत्र लिहून पैशाचा व्यवहार जाहीर
Follow us
| Updated on: Nov 14, 2018 | 11:42 AM

विशाल ठाकूर, टीव्ही9 मराठी, धुळे: धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपमध्ये अंतर्गत बंडाळीने टोक गाठलं आहे. धुळे शहराचे भाजप आमदार अनिल गोटे यांनी संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची सभा उधळल्यानंतर, स्वत:च महापौरपदाचे उमेदवार असल्याचं घोषित केलं. त्यानंतर त्यांनी भाजपलाही रामराम करणार असल्याचं जाहीर केलं आहे. आता तर अनिल गोटे यांनी पत्रक काढून पक्षाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. गोटे यांनी भाजपच्या आमदारांना उद्देशून हे पत्र लिहिलं आहे.

सध्या पालिका निवडणुकीसंदर्भात डॉ सुभाष भामरे गटाकडून पक्षात गुंडांना खुलेआम प्रवेश दिला जात असल्याचा आरोप अनिल गोटे यांनी केला.

मी भाजपचा निष्ठावंत कार्यकर्ता असूनही मला दानवेंच्या सभेत डावलत, मला अपमानास्पद वागणूक दिली. विधानपरिषदेची निवडणुकीत मी मतदान केलं. त्यावेळी विनोद तावडे यांनी मला पैशांची ऑफर केली होती.  नाथाभाऊंच्या बंगल्यावरुन फोन आला. तावडेसो बोलत होते,

तुमचे पैसे कुठे पाठवू. त्यांना मी खाडकन उत्तर दिले, आपण भाजपच्या आमदारांना पैसे दिले का? मला असा प्रश्न विचारण्याचं धाडस तुम्ही कसे करता? माझ्या मतदारांनी एकही पैसा न घेता 3 वेळा मला निवडून दिलं आहे, माझ्या मतदारांशी मी गद्दारी करणार नाही. मी पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे, असं अनिल गोटे यांनी पत्रात म्हटलं आहे.

इतकंच नाही तर आपण 19 नोव्हेंबरला विधीमंडळाच्या पहिल्या दिवशी आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचं गोटे यांनी पत्रात नमूद केलं आहे.

धुळ्यात महापौरपदाचा उमेदवार मीच : गोटे

भाजपचे धुळ्याचे आमदार अनिल गोटे यांनी भाजपविरुद्धचं दंड थोपटले आहेत. धुळे महानगरपालिकेच्या प्रचारार्थ प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी घेतलेली सभा स्वत: अनिल गोटेंनी उधळल्यानंतर, आता त्यांनी नवी घोषणा केली आहे. आमदार अनिल गोटे हे स्वत:च महापौरपदाचा उमेदवार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. अनिल गोटे यांनी शनिवारी रावसाहेब दानवे, गिरीश महाजन यांची सभा उधळून लावली. त्यानंतर रविवारी त्यांनी धुळ्यात जाहीर सभा घेऊन,  महापौरपदाचा उमेदवार स्वतः असल्याचं जाहीर केलं.

गिरीश महाजनांच्या नेतृत्त्वावर गोटे नाराज

येत्या 9 डिसेंबरला धुळे महापालिकेची पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी सगळे राजकीय पक्ष कसून तयारीला लागले आहेत. जळगाव महापालिका निवडणुकीच्या यशानंतर भाजपला धुळे महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकवायचा आहे. या निवडणुकीची जबाबदारी भाजपने जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सोपवली आहे. मात्र, गिरीश महाजन यांच्या नियुक्तीवर आमदार अनिल गोटे नाराज आहेत. त्यांनी स्वतः इच्छुकांच्या मुलाखती घेऊन तिकीट वाटप केली आहेत.

धुळे भाजपमध्ये दोन गट

धुळे लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. सुभाष भामरे आणि आमदार अनिल गोटे यांच्यातला वाद हा नवीन राहिलेला नाही. त्यातच या निवडणुकीसाठी डॉ. सुभाष भामरे यांनी देखील भाजपच्या पदाधिकाऱ्यांना हाताशी धरुन महापालिका निवडणुकीची तयारी सुरु केली आहे.भाजपमध्ये डॉ. भामरे आणि आमदार गोटे यांच्यात 2 गट पडले असून कोणत्या प्रभागात कोणाला तिकीट मिळणार याबाबत सुरुवातीपासून संभ्रम निर्माण झाला आहे.

आ.अनिल_गोटे_यांचे पत्र

संबंधित बातम्या 

भाजप दुटप्पी, राजीनामा देतोय : आमदार अनिल गोटे 

महापौरपदाचा उमेदवार मीच: आमदार अनिल गोटे

Non Stop LIVE Update
संजय राऊत डोक्यावर पडलेले..., भाजपच्या नेत्याचा हल्लाबोल
संजय राऊत डोक्यावर पडलेले..., भाजपच्या नेत्याचा हल्लाबोल.
मनसे पक्ष महायुतीमध्ये सहभागी होणार का?संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
मनसे पक्ष महायुतीमध्ये सहभागी होणार का?संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया.
मी लंगोट घालून तयार, मला भाजपला... वसंत मोरे यांनी थोपडले दंड
मी लंगोट घालून तयार, मला भाजपला... वसंत मोरे यांनी थोपडले दंड.
दानवेंची मनसे नेत्यानं काढली अक्कल, पद मिळालं म्हणून...,कुणाचा पलटवार?
दानवेंची मनसे नेत्यानं काढली अक्कल, पद मिळालं म्हणून...,कुणाचा पलटवार?.
दानवे 8-10 दिवसांत आमच्यासोबत..., शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा
दानवे 8-10 दिवसांत आमच्यासोबत..., शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा.
भाजप सोडल्यानंतर तुम्हाला कुत्रंही…कुणी केला खडसेंवर जोरदार पलटवार?
भाजप सोडल्यानंतर तुम्हाला कुत्रंही…कुणी केला खडसेंवर जोरदार पलटवार?.
स्मशानभूमीत जाण्यास डॉक्टरकडूनच अडकाठी, कुठं घडला धक्कादायक प्रकार?
स्मशानभूमीत जाण्यास डॉक्टरकडूनच अडकाठी, कुठं घडला धक्कादायक प्रकार?.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही अजितदादांवर शिवतारेंची शाब्दिक फायरिंग
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही अजितदादांवर शिवतारेंची शाब्दिक फायरिंग.
'मविआ'चा फॉर्म्युला फायनल, ठाकरे गट, पवार गटाची उमेदवारांची नावं ठरली?
'मविआ'चा फॉर्म्युला फायनल, ठाकरे गट, पवार गटाची उमेदवारांची नावं ठरली?.
भाजप-मनसे युतीवर दिल्लीत शिक्कामोर्तब? राज दिल्लीला, महायुतीत येणार?
भाजप-मनसे युतीवर दिल्लीत शिक्कामोर्तब? राज दिल्लीला, महायुतीत येणार?.