नगरमध्ये भाजप आमदाराच्या मुलीची राष्ट्रवादीकडे तिकिटाची मागणी

कुणाल जायकर, टीव्ही 9 मराठी, अहमदनगर : राज्यातील धुळे आणि अहमदनगर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर अनेक राजकीय समीकरणं समोर येत आहेत. अहमदनगरला भाजपचे आमदार शिवाजी कर्डीले यांच्या तिसर्‍या कन्येने राष्ट्रवादी काँग्रेसकडे उमेदवारीची मागणी केल्यामुळे राजकीय छेत्रात एकच खळबळ उडाली आहे. 9 डिसेंबर रोजी महापालिकेसाठी निवडणूक होणार असून त्यासाठी राष्ट्रवादीच्या मुलाखती सुरु आहेत. मुलाखती सुरु असताना भाजपचे […]

नगरमध्ये भाजप आमदाराच्या मुलीची राष्ट्रवादीकडे तिकिटाची मागणी
Follow us
| Updated on: Nov 15, 2018 | 8:22 AM

कुणाल जायकर, टीव्ही 9 मराठी, अहमदनगर : राज्यातील धुळे आणि अहमदनगर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर अनेक राजकीय समीकरणं समोर येत आहेत. अहमदनगरला भाजपचे आमदार शिवाजी कर्डीले यांच्या तिसर्‍या कन्येने राष्ट्रवादी काँग्रेसकडे उमेदवारीची मागणी केल्यामुळे राजकीय छेत्रात एकच खळबळ उडाली आहे. 9 डिसेंबर रोजी महापालिकेसाठी निवडणूक होणार असून त्यासाठी राष्ट्रवादीच्या मुलाखती सुरु आहेत.

मुलाखती सुरु असताना भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या कन्या ज्योती गाडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रभाग क्रमांक चारमधून उमेदवारी मागितली.  ज्योती अमोल गाडे यांनी प्रभाग क्रमांक चारमधून राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढण्याचा निर्णया या अगोदरच घेतला होता. त्यांनी आज अधिकृतरित्या पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली असल्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

आमदार कर्डीले यांची मोठी कन्या सुवर्णा कोतकर काँग्रेसच्या माजी उपमहापौर तर सध्या नगरसेविका आहेत. सुवर्णा कोतकर यांचे नाव केडगाव दुहेरी हत्याकांडात पुढे आले असल्यामुळे त्यांच्या उमेदवारीबाबत अजून कोणताच निर्णय झाला नाही.

कर्डीले यांची दुसरी कन्या राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या पत्नी शीतल जगताप देखील सध्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका आहेत. मात्र आता दुसरीकडे त्यांची तिसरी कन्या ज्योती गाडे यांनी राष्ट्रवादीकडे उमेदवारीची मागणी केल्याने पुन्हा एकदा शहरात सोयरे-धायर्‍यांच्या राजकारणाची चर्चा रंगत आहे.

कर्डीले यांच्या तीन मुली असून पहिली मुलगी सुवर्णा ही काँग्रेसचे माजी महापौर संदीप कोतकरांची पत्नी आहे, तर दुसरी कन्या शीतल ही राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांची पत्नी, तर तिसरी कन्या अमोल गाडे यांची पत्नी आहे. त्यामुळे या सोयरे-धायर्‍यांच्या राजकारणाची चर्चा सर्व राज्याला माहित आहे.

अहमदनगर महापालिकेसाठी 9 डिसेंबर रोजी मतदान होणार असून 10 डिसेंबर रोजी निकाल लागणार आहे. 17 प्रभागातील 68 जागांसाठी ही निवडणूक होत असून 13 नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत.

संबंधित बातम्या :

अहमदनगर महापालिका निवडणूक : कोण कुणावर भारी पडणार?

शिवरायांबद्दल आक्षेपार्ह बरळणारा छिंदम निवडणुकीच्या मैदानात

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.