बोलणं आणि हावभाव हुबेहूब, रोबोट न्यूज अँकरची जगभर चर्चा

शांघाय: यापुढे रोबोट जर टीव्हीवर बातम्या सांगताना दिसला तर आश्चर्य वाटून घेऊ नका.चीनने चक्क बातम्या सांगणारा रोबोट तयार केला आहे. तो अगदी हुबेहूब माणसासारखा दिसत असून बातम्याही तसाच सांगतो. अगदी हुबेहूब अँकरप्रमाणे त्याच्या चेहऱ्यावर हावभाव दिसतात. हे पाहिल्यावर हा रोबोट आहे का यावर विश्वाच बसणार नाही. चीनच्या झिनुआ वृत्तसंस्थेने हा रोबोट तयार केला असून, बुधवारी […]

बोलणं आणि हावभाव हुबेहूब, रोबोट न्यूज अँकरची जगभर चर्चा
Follow us
| Updated on: Nov 09, 2018 | 4:19 PM

शांघाय: यापुढे रोबोट जर टीव्हीवर बातम्या सांगताना दिसला तर आश्चर्य वाटून घेऊ नका.चीनने चक्क बातम्या सांगणारा रोबोट तयार केला आहे. तो अगदी हुबेहूब माणसासारखा दिसत असून बातम्याही तसाच सांगतो. अगदी हुबेहूब अँकरप्रमाणे त्याच्या चेहऱ्यावर हावभाव दिसतात. हे पाहिल्यावर हा रोबोट आहे का यावर विश्वाच बसणार नाही. चीनच्या झिनुआ वृत्तसंस्थेने हा रोबोट तयार केला असून, बुधवारी या रोबोटने टीव्हीवर पदार्पण केलं. इंग्लिश भाषेत बातम्या सांगणाऱ्या रोबोटचं नाव झँग झाओ आहे.

झिनुआ न्यूज एजन्सी आणि चीनमधील सर्च इंजिन सोगोऊ डॉट कॉम यांनी संयुक्तरित्या या रोबोट अँकरची निर्मिती केली आहे. झिनुआच्या या रोबोटबद्दल सध्या चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही प्रतिक्रिया येत आहेत. माणसाप्रमाणे आवाज आणि हावभाव यामुळे हा रोबोट सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. हा जगातील पहिला कृत्रिम बुद्धिमत्तेचा अँकर आहे.

रोबोट अँकरची वैशिष्ट्ये

या रोबोट अँकरची अनेक वैशिष्ट्ये आहेत. महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे हा अँकर 24 तास काम करु शकतो. त्यामुळे साहजिकच हा मनुष्यबळ, पैसा या सर्वांची बचत करणार आहे.

महत्त्वाचं म्हणजे हा व्हर्चुअल न्यूज अँकर ब्रेकिंग न्यूजही त्याच ताकदीने देऊ शकतो.

शिवाय कृत्रिम बुद्धिमत्ता वापरुन चेहरा आणि माणसाचा आवाज यामुळे तो हुबेहूब जिवंत माणूस वाटतो.

या व्हर्चुअल न्यूज अँकरच्या ओठांच्या हालचालींसाठी मशिन लर्निंग प्रोग्रामचा वापर करण्यात आला आहे. मात्र थोडं लक्षपूर्वक पाहिल्यास लिप मूव्हमेंट जरा नकली असल्याचं जाणवतं.

हा न्यूज अँकर इंग्रजी आणि मेंडेरिन भाषेत बातम्या वाचू शकतो. झिनुआ वृत्तसंथा इंटरनेट आणि मोबाईलवर उपलब्ध आहे आणि या दोन्ही भाषांत आहे. त्यामुळे हा अँकर टीव्ही वेब पेजसाठी काम करेल.

ब्रेकिंग बातम्यांवेळी या अँकरची मदत होईल, असं या वृत्तसंस्थेचं म्हणणं आहे.

Non Stop LIVE Update
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.