वाघाच्या तोंडात युतीचे पाय, राज ठाकरेंचं नवं व्यंगचित्र

मुंबई : अवनी वाघिणीला ठार मारल्याच्या घटनेचा धागा पकडत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फडणवीस सरकारवर कुंचल्यातून वार केले आहेत. 2018 मध्ये अवनीची हत्या केली आणि 2019 मध्ये महाराष्ट्र नावाचा वाघ युती सरकारला खाईल, अशा आशयाचे व्यंगचित्र राज ठाकरे यांनी रेखाटले आहे. फेसबुक आणि ट्विटरवरुन राज ठाकरेंनी हे व्यंगचित्र शेअर केले असून, तुफान वेगाने हे […]

वाघाच्या तोंडात युतीचे पाय, राज ठाकरेंचं नवं व्यंगचित्र
Follow us
| Updated on: Nov 13, 2018 | 5:42 PM

मुंबई : अवनी वाघिणीला ठार मारल्याच्या घटनेचा धागा पकडत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फडणवीस सरकारवर कुंचल्यातून वार केले आहेत. 2018 मध्ये अवनीची हत्या केली आणि 2019 मध्ये महाराष्ट्र नावाचा वाघ युती सरकारला खाईल, अशा आशयाचे व्यंगचित्र राज ठाकरे यांनी रेखाटले आहे. फेसबुक आणि ट्विटरवरुन राज ठाकरेंनी हे व्यंगचित्र शेअर केले असून, तुफान वेगाने हे व्यंगचित्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

काय आहे व्यंगचित्रात?

राज ठाकरेंनी एकाच व्यंगचित्रात दोन घटना दाखवल्या आहेत. एक घटना 2018 ची असून, त्यात फडणवीसांच्या हातात बंदूक असून, त्यांनी अवनी वाघिणीवर गोळी झाडल्याचे चित्र आहे. अवनी रक्तबंबाळ होऊन जमिनीवर कोसळली आहे. फडणवीसांच्या एका बाजूला अवनीला मारा म्हणून आदेश देणारे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार दाखवण्यात आले असून, त्यांच्या मागे उद्धव ठाकरे आहेत. विशेष म्हणजे, फडणवीसांच्या हातातल्या बंदुकीला ‘माज’ असे लेबल आहे.

याच व्यंगचित्रातली दुसरी घटना 2019 ची आहे. यात ‘महाराष्ट्र’ नावाचा वाघ फडणवीस आणि उद्धव ठाकरेंवर झडप टाकून, युती सरकारचा चावा घेत असल्याचे दाखवले आहे. तर वनमंत्री सुधीर मुनगंटीवर हे झाडावर चढून आपला जीव वाचवू पाहत आहेत. फडणवीसांच्या हातातली ‘माज’ नावाची बंदुक बाजूला अस्ताव्यस्त पडल्याचे दाखवले आहे.

आता अवनी वाघिणीचा खात्मा करणाऱ्या युती सरकारला पुढल्या वर्षी महाराष्ट्र नावाचा वाघ खाऊन टाकणार असल्याचे राज ठाकरेंनी आपल्या व्यंगचित्रातून दाखवले आहे.

विशेष म्हणजे, संपूर्ण दिवाळीच्या दरम्यान राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी, भाजपाध्यक्ष अमित शाह आणि राज्य सरकारविरोधात आपल्या कुंचल्यातून जोरदार निशाणा साधला. जवळपास रोज एक व्यंगचित्र रेखाटून राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर वार केले.

Non Stop LIVE Update
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.