AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठग्स ऑफ हिंदोस्तान ची HD प्रिंट लीक

मुंबई: आमीर खानसह दिग्गज अभिनेत्यांची फौज असलेला सिनेमा ठग्स ऑफ हिंदोस्तान (Thugs of Hindostan) दिवाळीच्या मुहूर्तावर काल 8 नोव्हेंबरला रिलीज झाला. मात्र रिलीजनंतर काही तासातच हा सिनेमा ऑनलाईन लीक झाला आहे. पायरसीसाठी फेमस असलेली वेबसाईट तमिळ रॉकर्सवर हा सिनेमा लीक करण्यात आला आहे. या वेबसाईटवर Thugs of Hindostan हा सिनेमा तीन भाषेत HD क्वालिटीमध्ये अपलोड […]

ठग्स ऑफ हिंदोस्तान ची HD प्रिंट लीक
| Updated on: Nov 09, 2018 | 1:58 PM
Share

मुंबई: आमीर खानसह दिग्गज अभिनेत्यांची फौज असलेला सिनेमा ठग्स ऑफ हिंदोस्तान (Thugs of Hindostan) दिवाळीच्या मुहूर्तावर काल 8 नोव्हेंबरला रिलीज झाला. मात्र रिलीजनंतर काही तासातच हा सिनेमा ऑनलाईन लीक झाला आहे. पायरसीसाठी फेमस असलेली वेबसाईट तमिळ रॉकर्सवर हा सिनेमा लीक करण्यात आला आहे. या वेबसाईटवर Thugs of Hindostan हा सिनेमा तीन भाषेत HD क्वालिटीमध्ये अपलोड करण्यात आला आहे. सिनेमा लीक झाल्यानंतर चिडलेल्या फॅन्सनी तामिळ फिल्म कौन्सिलकडे तक्रार करुन, सिनेमा लीक करण्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे.

एकीकडे ठग्स ऑफ हिंदोस्तान लीक झाला असताना, त्याआधीच दक्षिणेचा सुपरस्टार विजयचा सरकार हा सिनेमाही लीक करण्यात आला होता. त्यावेळी झालेल्या तक्रारीनंतर फिल्म कौन्सिलने थिएटर मालकांना थिएटरमध्ये लोकांना कॅमेरा आणि मोबाईल फोन आणण्यास बंदी घालण्यात आली होती.

दुसरीकडे ठग्स ऑफ हिंदोस्तान रिलीज झाल्यानंतर सोशल मीडियावर चांगलंच ट्रोलिंग सुरु आहे. समीक्षक आणि प्रेक्षकांनी हा सिनेमा अत्यंत वाह्यात आणि निराशाजनक असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. सोशल मीडियावर तर या सिनेमावरुन जोक सुरु असून अनेक मीम्स व्हायरल होत आहेत.

सिनेमा ऑनलाईन लीक आणि प्रेक्षकांच्या नकारात्मक प्रतिक्रियांमुळे सिनेमाच्या कमाईवर नक्कीच परिणाम होणार आहे.

सर्वात महागडा सिनेमा ठग्स ऑफ हिंदोस्तान

ठग्स ऑफ हिंदोस्तान हा हिंदीतील सर्वात महागडा सिनेमा आहे. या सिनेमाचं बजेट तब्बल 240 कोटी इतकं आहे. यशराज बॅनरने या सिनेमाची निर्मिती केली आहे. या सिनेमात आमीर खान, अमिताभ बच्चन, कतरिना कैफ, फातिमा सना शेख यासारखी तगडी स्टारकास्ट आहे.

यापूर्वी पद्मावत या सिनेमाचं बजेट 210 कोटी रुपये होतं.

संबंधित बातम्या

ठग्स ऑफ हिंदोस्तान बेकार, तरीही कमाईत रेकॉर्ड  

अनिल पाटील अजितदादांच्या भेटीला, गळ्यात क्रीडा मंत्रिपदाची माळ पडणार
अनिल पाटील अजितदादांच्या भेटीला, गळ्यात क्रीडा मंत्रिपदाची माळ पडणार.
मुनगंटीवारांच्या विधानानं चंद्रपूरवरून भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष उफाळला
मुनगंटीवारांच्या विधानानं चंद्रपूरवरून भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष उफाळला.
CCI केंद्रावरील कर्मचाऱ्याला खोतकरांनी झापलं, शेतकऱ्यांना इंग्रजीत msg
CCI केंद्रावरील कर्मचाऱ्याला खोतकरांनी झापलं, शेतकऱ्यांना इंग्रजीत msg.
ठाकरे बंधूंचं ठरलं! युतीची उद्या घोषणा, 'या' 7 पालिकांसाठी एकत्र लढणार
ठाकरे बंधूंचं ठरलं! युतीची उद्या घोषणा, 'या' 7 पालिकांसाठी एकत्र लढणार.
महायुतीचं जागावाटप अंतिम टप्प्यात, भाजप-शिवसेनेचं 180 जागांवर एकमत
महायुतीचं जागावाटप अंतिम टप्प्यात, भाजप-शिवसेनेचं 180 जागांवर एकमत.
अखेर ठरलं ! दोन्ही NCP एकत्र, निवडणुकीबाबत मोठी अपडेट; इतिहास घडणार?
अखेर ठरलं ! दोन्ही NCP एकत्र, निवडणुकीबाबत मोठी अपडेट; इतिहास घडणार?.
जगतापांच्या राजीनाम्याचा सस्पेन्स वाढला, सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
जगतापांच्या राजीनाम्याचा सस्पेन्स वाढला, सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?.
धमक अन् ताकद नाही... दानवेंनी थोपटले दंड, शिरसाटांना खुलं आव्हान
धमक अन् ताकद नाही... दानवेंनी थोपटले दंड, शिरसाटांना खुलं आव्हान.
ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार! संजय राऊत यांच्या ट्विटनं चर्चा
ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार! संजय राऊत यांच्या ट्विटनं चर्चा.
बिबट्यासाठी जंगलात बोकड सोडणार ही योजना...शेट्टींचा गणेश नाईकांचा टोला
बिबट्यासाठी जंगलात बोकड सोडणार ही योजना...शेट्टींचा गणेश नाईकांचा टोला.