राज ठाकरेंबाबत आमचेच नेते गैरसमज पसरवतात : दुबे

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबाबत गैरसमज पसरवण्यासाठी आमचे अनेक नेते कारणीभूत असल्याचा आरोप उत्तर भारतीय पंचायत महासभेचे अध्यक्ष विनय दुबे यांनी केला. तसेच, राज ठाकरेंनी उत्तर भारतीय मंचावर येण्याचं आमंत्रण स्वीकारल्याबद्दल दुबे यांनी आनंद व्यक्त केला. गैरसमज पसरवण्यासाठी आमचेच नेते कारणीभूत : विनय दुबे “अनेक उत्तर भारतीय हे ग्राऊंड लेव्हलचे आहेत. मनसेची बाजू […]

राज ठाकरेंबाबत आमचेच नेते गैरसमज पसरवतात : दुबे
Follow us
| Updated on: Nov 13, 2018 | 2:15 PM

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबाबत गैरसमज पसरवण्यासाठी आमचे अनेक नेते कारणीभूत असल्याचा आरोप उत्तर भारतीय पंचायत महासभेचे अध्यक्ष विनय दुबे यांनी केला. तसेच, राज ठाकरेंनी उत्तर भारतीय मंचावर येण्याचं आमंत्रण स्वीकारल्याबद्दल दुबे यांनी आनंद व्यक्त केला.

गैरसमज पसरवण्यासाठी आमचेच नेते कारणीभूत : विनय दुबे

“अनेक उत्तर भारतीय हे ग्राऊंड लेव्हलचे आहेत. मनसेची बाजू त्यांच्यापर्यंत नीट पोहोचत नाही. त्यामुळे राज ठाकरे आमच्या मंचावर आल्याने अनेक उत्तर भारतीयांना त्यांची उत्तरं मिळतील. अनेक गोष्टी ग्राऊंडच्या उत्तर भारतीयांपर्यंत गाळून येते, त्यामुळे अनेक गैरसमाज निर्माण होतात. हे गैरसमज पसरवण्यासाठी आमचे अनेक नेतेही कारणीभूत आहेत. राज ठाकरे यांच्याशी सरळ संवाद साधल्याने उत्तर भारतीयांच्या मनातील अनेक शंका दूर होतील.”, असा विश्वास विनय दुबे यांनी व्यक्त केला.

संजय निरुपम यांना उत्तर भारतीयांचा ठेका दिला नाहीय : विनय दुबे

“संजय निरुपम यांना कोणी उत्तर भारतीयांचा ठेका दिला नाही. उत्तर भारतीय आणि मनसे हे मुद्दे सोडले, तर निरुपम यांच्याकडे कोणतेच मुद्दे नाहीत. जर हे मुद्दे सोडले तर निरुपम यांच्या राजकारणावर परिणाम होईल. हा अतिशय संवेदनशील मुद्दा आहे. गैरसमज पसरल्याने ग्राऊंड लेव्हलच्या टॅक्सि ड्रायव्हर आणि इतरांना याचा त्रास होतो.”, असे विनय दुबे म्हणाले.

तसेच, उत्तर भारतीय आणि मनसे यांच्यातील लढाई बंद होण्यासाठी संवाद होत असेल, तर स्थिती खराब करु नये, अशी विनंती विनय दुबे यांनी केली. तसेच, मनसे नंतर करेल, आधी उत्तर भारतीय महासंघाचे कार्यकर्ते निरुपम यांच्याविरुद्ध रस्त्यावर उतरतील, असा इशाराही दुबे यांनी निरुपम यांना दिला.

उत्तर भारतीयांच्या मंचावर राज ठाकरे जाणार

मुंबईतील कांदिवली इथे येत्या 2 डिसेंबर रोजी बुराभाई हॉलमध्ये उत्तर भारतीय महापंचायत संघाचा कार्यक्रम होणार आहे. त्यासाठी उत्तर भारतीय महापंचायत संघाने राज ठाकरे यांना 12 ऑक्टोबर रोजी आमंत्रण दिलं होतं, जे त्यांनी स्वीकारलं. या कार्यक्रमात राज ठाकरे उत्तर भारतीयांशी संवाद साधणार आहेत. तसंच उत्तर भारतीयांसदर्भातील मत व्यक्त करणार आहेत.

आधी माफी मागा, मग उत्तर भारतीयांच्या मंचावर जा : निरुपम

ज्यांनी उत्तर भारतीयांना त्रास दिला, ज्यांना मारहाण केली, ते आता उत्तर भारतीयांच्या मंचावर जायचा प्रयत्न करत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी  त्यानंतर मंचावर जावं, अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली. राज ठाकरे उत्तर भारतीय महापंचायत संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विटरवर याबाबत माहिती दिली. राज ठाकरे यांनी हे निमंत्रण स्वीकारलं आहे. परप्रांतियांच्या मुंबईत येणाऱ्या लोंढ्यांवर नेहमीच आक्रमक भूमिका घेणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे उत्तर भारतीय मंचावर दिसणार असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यातूनच संजय निरुपम यांनी आता राज ठाकरे यांनी मंचावर जाण्यापूर्वी उत्तर भारतीयांची माफी मागावी अशी मागणी केली आहे.

राज ठाकरेंच्या भाषणाकडे सर्वांचंच लक्ष

परप्रांतातून मुंबईत येणारे लोंढे असो किंवा फेरीवाल्यांचा प्रश्न असो, मनसेने याविरोधात नेहमीच आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे राज ठाकरे या कार्यक्रमाचं निमंत्रण स्वीकारणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. उत्तर भारतीयांवर नेहमीच सडकून टीका करणाऱ्या राज ठाकरेंनी हे निमंत्रण स्वीकारल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

दरम्यान, यापूर्वीही राज ठाकरे यांनी जैन, गुजराती समाजाशी संवाद साधलेला आहे. उत्तर भारतीयांची मतं हा मुंबईत नेहमीच महत्त्वाचा मुद्दा राहिलेला आहे. त्यामुळेच आता निवडणूक तोंडावर असताना राज ठाकरे आपली प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत का, असा प्रश्न उभा राहिला आहे.

Non Stop LIVE Update
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.