Ravindra Dhangekar Video : ‘तुमचा तमाशा करायला वेळ लागणार नाही’, रवींद्र धंगेकरांना कोणाचा इशारा?
अजितदादांबद्दल चुकीचं वक्तव्य कार्यकर्ता सहन करणार नाही असं म्हणत पुण्यातील अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने रवींद्र धंगेकर यांना इशारा दिला आहे.
पुण्यातील अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने काँग्रेसचे माजी आमदार आणि नुकताच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेल्या रवींद्र धंगेकर यांना टोकाचा इशारा दिला आहे. अजित पवार यांच्याबद्दल एकही चुकीचं वक्तव्य कार्यकर्ता सहन करणार नाही, असं म्हणत तुमचा तमाशा करायला वेळ लागणार नाही, दीपक मानकर यांनी रवींद्र धंगेकरांना इशारा दिला आहे. दीपक मानकर हे राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष आहे. दरम्यान, रवींद्र धंगेकर यांच्या पत्नीच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार होती, म्हणून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला असा आरोप ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यासह काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी केला होता. या आरोपावर धंगेकरांनी बोलताना आपली भूमिका मांडत असताना अजित पवारांचाही उल्लेख केला होता. अजितदादांना तर यांनी जेलच्या दारात बसवलं होते. ट्रकभर पुरावे सादर केले होते. पंतप्रधान मोदी यांनीदेखील अजित पवारांवर टीका केली होती. पण त्यांना पक्षासोबत घेऊन अर्थमंत्री करण्यात आलं, असं रवींद्र धंगेकर यांनी म्हटले होते. यावरून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी धंगेकरांना इशारा दिला आहे.

बुध-सूर्य संक्रमण होणार; येणारे १६ दिवस संकटांनी भरलेले असतील!

पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड

पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती

विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!
