महाराष्ट्र : अहमदनगरला (Ahmadnagar) शेवगाव (shevgaon) तालुक्याच्या पश्चिम भागातील भातकुडगावसह भायगाव, बक्तरपूर, देवटाकळी, गुंफा परिसरात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीने कांदा, गहू, फळबागांचे मोठे नुकसान झालय. अनेक ठिकाणी घराची छत उडून गेले आहे. तर माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांनी नुकसानग्रस्त (Damaged) भागात पाहणी करून अधिकाऱ्यांना त्वरित पंचनामे करण्याची सूचना दिल्या आहे. महाराष्ट्रात मागच्या दोन दिवसांपासून पुन्हा पावसाने सुरुवात केली आहे. त्यामुळे काढणीला आलेली पीक काढत असताना धांदल उडत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.
अकोला जिल्ह्यातल्या बाळापुर तालुक्यामध्ये सात तारखेला संध्याकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसात वाडेगाव परिसरातील लिंबू,आंबा, कांदा, गहू या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर नुकसानीची पाहणी करण्यासाठी बाळापूर तहसीलदार, ता. कृषी अधिकारी, महसुल विभागाचे मंडळ अधिकारी, तलाठी,व कोतवाल यांनी मानकर यांनी आज सकाळी शेतकऱ्यांच्या बांधावर जावून विजांसह व गारांसह वादळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील झालेला नुकसानाची पाहणी केली असून या अवकाळी पावसामुळे बाळापूर तालुक्यात 1 हजार 245 हेक्टर आर इतके शेतातील शेत पिकांचे नुकसान झाले आहे. हा प्राथमिक अहवाल शासनाला पाठविण्यात येणार आहे.
गेल्या दोन दिवसांपासून भंडारा जिल्ह्यात येत असलेल्या अवकाळी पावसाचा फटका काकडी,डांगरू पिकांना बसला असून अवकाळी पावसामुळे ढेमसच्या शेतीत पाणी साचल्यामुळे ढेमस उत्पादक शेतकऱ्यांना याचा फटका बसलेला आहे. अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील फळ बागायतदार उत्पादकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. ढेमसे, डांगरू, काकडी अशा फळायती शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरवला. तेव्हा शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करून त्वरीत नुकसान भरपाई देण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.