34 केंद्रांपैकी 28 केंद्रावरून धान्य खरेदी सुरु, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी विकास महामंडळातर्फे चार तालुक्यांमध्ये धान्य खरेदी केंद्र सुरु झाले आहे. 34 केंद्रांपैकी 28 केंद्रावरून धान्य खरेदी सुरु आहे.
गोंदिया : गोंदिया जिल्हा (gondhiya) हा धान्याचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. शासनाने आदिवासी विकास महामंडळांतर्फे धान्य खरेदी करणाऱ्या संस्थांचे धान्य खरेदीचे कमिशन कमी केले. तसेच धान्यातील तुटीचे प्रमाण कमी केल्याने धान्य खरेदी करणाऱ्या संस्था संकटात आल्या होत्या. त्यामुळे या निर्णयाविरुद्ध संस्थांनी आक्रमक भूमिका घेत रब्बी हंगामातील (rubby season) धान्य खरेदीवर बहिष्कार टाकला होता. मागील पंधरा दिवसांपासून गोंदिया जिल्ह्यात धान्य खरेदी पूर्णपणे ठप्प होती. परंतु आदिवासी फेडरेशनच्या संस्थेने धान्य खरेदी सुरू करावी असा आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांवर शेतकऱ्यांचा (agricultural news in marathi) दबाव होता.
34 केंद्रांपैकी 28 केंद्रावरून धान्य खरेदी
शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून होणारी लूट थांबविण्यासाठी जिल्ह्यातील सर्व संस्थांनी रब्बी धान्य खरेदी सुरू करण्याचा निर्णय घेतला. रब्बी धान्य खरेदी सुरु झालेली आहे. आदिवासी विकास महामंडळ गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी, मोरगाव अर्जुनी, सालेकसा आणि देवरी या चार तालुक्यात धान्य खरेदी करते. एकूण केंद्र 34 आहेत. 34 केंद्रांपैकी 28 केंद्रावरून धान्य खरेदी सुरू झालेली आहे. आता खाजगी व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांचे लूट होणार नाही. शेतकऱ्यांमध्ये आनंदचे वातावरण पाहायला मिळत आहे. ज्या-ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे, लवकरात लवकर आपले धान्य खरेदी केंद्रावर धान्य आणावे असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे. या चार तालुक्यांमध्ये धान खरेदी सुरू झाल्याने आता तरी खाजगी व्यापाऱ्याकडून शेतकऱ्याची लूट होणार नाही.
राष्ट्रवादीत दोन गट पडले
परभणीच्या मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी उद्या 10 जुन रोजी शनिवारी मतदान आणि मतमोजणी पार पडणार आहे. एका उमेदवाराचं निधन झाल्यामुळे या ठिकाणी निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती. 18 संचालकांच्या निवडीसाठी होत असलेल्या निवडणुकीत तब्बल 59 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर 1 हजार 508 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीत दोन गट पडले, असून एका गटाला महाविकास आघाडीने तर दुसऱ्या गटाला भाजप नेत्यांनी समर्थन दिलं आहे, त्यामुळे मानवत कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असाच सामना रंगणार आहे.