तुम्ही प्रवासामध्ये असताना मध्येच कारच इंधन संपलं, तर मोठी अडचण होते. रस्त्यावर फार कमी लोक मदतीसाठी पुढे येतात. विना इंधन कार चालत नाही. तुमच्यावर असा प्रसंग ओढवला, तर तुम्ही गाडीसाठी इंधनाची व्यवस्था कशी कराल? त्या बद्दल सांगणार आहोत. तुम्ही तुमच्या कारसाठी ऑनलाइन इंधन मागवू शकता. फक्त त्यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.
जर तुम्हाला ऑनलाइन फ्यूल ऑर्डर करायचं असेल, तर त्यासाठी जास्त काही करण्याची आवश्यकता नाहीय. त्यासाठी तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनमधून प्लेस्टोर ओपन करावं लागेल. प्ले स्टोरच्या सर्चबारमध्ये fuel@call लिहून सर्च मारा. इथे तुम्हाला इंडियन ऑइलच App दिसेल. या App वर क्लिक करा आणि फोनमध्ये इन्स्टॉल करा. हे App ओपन झाल्यानंतर तुम्हाला लॉगइन करावं लागेल.
कसं मिळणार इंधन?
आधीपासूनच हे APP तुमच्याकडे असेल तर साइनअप करा. पुढे प्रोसेस केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल. त्या पेजवर तुम्ही तुमचं राज्य सिलेक्ट करा. राज्य सिलेक्ट केल्यानंतर सबमिट करा. त्यानंतर तुम्ही जिथे असाल, तिथल लोकेशन डिटेक्ट म्हणजे शोधलं जाईल. त्यानंतर तुमच्याकडे इंधन पोहोचेल.
सध्या ही सुविधा कोणाला मिळतेय?
सध्या ही सुविधा मोठ्या इंजिन असलेल्या वाहनांना मिळतेय. यात जेसीबी, क्रेन आणि मोठ्या ट्रकना ही सुविधा मिळेल. लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हा नवीन App फोनमध्ये इन्स्टॉल कराल, तेव्हा त्याची सर्व माहिती जरुर मिळवा. गुगलवर लोक APPS चे रिव्यू टाकतात, ते वाचा. प्लॅटफॉर्मवर दिलेला रिव्यू आणि रेटिंग नीट वाचा. इंडियन ऑईल ऑनलाइन ऑर्डर वेबसाइटवरुनही तुम्ही इंधन मागवू शकता.