Mukesh Ambani Car Collection : आलिशान गाड्यांची लाईन लागल्ये, पण मुकेश अंबानींची आवडती कार कोणती ?
आज (19 April) मुकेश अंबानी यांचा वाढदिवस आहे. सर्वांना माहित आहे की मुकेश अंबानी यांच्याकडे अनेक आलिशान वाहने आहेत, परंतु त्यांच्या कार कलेक्शनमध्ये कोणत्या गाड्या समाविष्ट आहेत, याबद्दल जाणून घेऊया.
मुंबई : आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा आज वाढदिवस (birthday)आहे. त्यांचा जन्म 19 एप्रिल 1957 रोजी झाला होता. अनेक जणांना माहिती नाही की, मुकेश अंबानी यांचा जन्म भारतात नव्हे तर येमेनमध्ये झाला होता. मुकेश अंबानी यांनी त्यांच्या अथक मेहनतीने यश मिळवले आहे. वडिलांनी लावलेल्या इवल्याशा रोपाचे आज त्यांनी डेरेदार झाड उभे केले आहे. मुकेश अंबानी यांची जीवनशैली कोणापासून लपलेली नाही. त्यांच्या कार कलेक्शनमध्ये अनेक अनेक आलिशान वाहनांचा (Car Collection)समावेश आहे.
मुकेश अंबानींकडे कोणती महागडी वाहने आहेत ते जाणून घेऊया.
Mercedes-Maybach Benz S660 Guard
मर्सिडीज बेंझच्या या कारचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ही कार अतिरिक्त संरक्षणासह येते. उदाहरणार्थ बुलेट्स म्हणजे बंदूकीतील गोळ्या वगैरेंचा या कारवर परिणाम होत नाही. या कारमध्ये 6 लिटर V8 पेट्रोल इंजिन देण्यात आले असून या कारची किंमत 10 कोटी 50 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.
Rolls Royce Phantom
मुकेश अंबानी यांच्याकडे ही भारतातील सर्वात महागडी SUV कार आहे. या कारमध्ये लक्झरी इंटीरियर, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि स्मूथ राईजसह अनेक उत्तम वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत. या कारमध्ये 6.75 लीटर V12 पेट्रोल इंजिन आहे, या कारची किंमत 13 कोटी 50 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.
Ferrari SF90 Stradale
ही एक स्पोर्ट्स हायब्रीड कार आहे. ही कंपनीची पहिली प्रोडक्शन कार होती ज्यामध्ये कंपनीने हायब्रीड तंत्रज्ञान वापरले होते. या कारमध्ये 4 लिटर V8 इंजिनसह तीन इलेक्ट्रिक मोटर्स देण्यात आल्या आहेत. जर या कारच्या किंमतीबद्दल बोलायचं झालं तर या कारची किंमत 7 कोटी 50 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.
BMW 760Li Security
ही BMW ची लक्झरी सेडान आहे जी हाय लेव्हल सेक्युरिटी देते. या कारच्या वैशिष्ट्याबद्दल बोलायचे तर, लक्झरी फीचर्ससह या कारमध्ये 6 लीटर V12 इंजिन देखील उपलब्ध आहे.
Bentley Continental Flying Spur
या कारमध्ये ॲडव्हान्स फीचर्स देण्यात आले आहेत. ही कार 6 लीटर डब्ल्यू12 इंजिनसह येते आणि यात एकापेक्षा एक लक्झरी फीचर्स आहेत. जर आपण किंमतीबद्दल बोललो तर या कारची किंमत 3 कोटी 69 लाख (एक्स-शोरूम) आहे. वर नमूद केलेली सर्व वाहने मुकेश अंबानी यांची आवडती वाहने आहेत.