Jeet Adani Marriage : अदानी कुटुंबात लवकरच शुभ मंगल सावधान, ‘या’ हीरा व्यापाऱ्याची मुलगी बनणार सून
Jeet Adani Marriage : लवकरच अदानी कुटुंबात मंगलाष्टक ऐकू येणार आहेत. प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांच्या लहान मुलाच लग्न होणार आहे. गौतम अदानींच्या लहान मुलाच नाव काय? तो कोणासोबत लग्न करणार? जाणून घ्या.
प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांचा धाकटा मुलगा जीत अदानीचे प्री-वेडिंगचे विधी उद्यापासून सुरु होणार आहेत. जीतच लग्न दीवा जैमिन शाहसोबत होणार आहे. या दोघांचा साखरपुडा मागच्यावर्षी 12 मार्चला झाला होता. आता दोघे विवाह बंधनात अडकणार आहेत. अदानी कुटुंबाची सूनबाई बनणारी दीवा जैमिन शाह कोण आहे? जाणून घेऊया. जीत अदानी आणि दीवाचा साखरपुडा प्रायवेट पद्धतीने झालेला. या साखरपुड्याला जास्त पाहुण्यांना बोलवण्यात आलं नव्हतं.
आता जीत अदानीच लग्न आणि प्री वेडिंगच्या कार्यक्रमांची चर्चा सुरु झाली आहे. दीवा सूरतचे मोठे हिरा व्यावसायिक जैमिन शाह यांची मुलगी आहे. जैमिन शाह सी दिनेश एंड कंपनी प्रायवेट लिमिटेडचे मालक आहेत. त्यांचा व्यवसाय सूरत ते मुंबईपर्यंत पसरलेला आहे. डायमंड कंपनी सूरत आणि मुंबईमध्ये आहे. दीवा सोशल मीडियावर जास्त सक्रीय नाहीय.
दीवाची कमाई किती?
रिपोर्ट्सनुसार दीवाला बिझनेस आणि फायनान्सची चांगली समज आहे. ती वडिलांना बिझनेस संभाळण्यासाठी मदत करते. दीवाची कमाई किती? याबद्दल अचूक आकडे नाहीयत. पण दीवा जैमिन सुद्धा कोट्यवधीची मालकीण आहे.
कुठे होणार हे डेस्टिनेशन वेडिंग?
राजस्थान हे डेस्टिनेशन वेडिंगसाठी प्रसिद्ध आहे. तिथे 10 आणि 11 डिसेंबरपासून प्री-वेडिंगचे विधी सुरु होणार आहेत. यासाठी तीन लग्जरी फाइव्ह स्टार हॉटेल्स बुक करण्यात आली आहेत. अनेक बिझनेसमॅन, राजकीय नेते, सेलिब्रिटी या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकतात.
तीन हॉटेल बुक
ताज लेक पॅलेस, लीला पॅलेस आणि उदय विलास हे तीन हॉटेल्स पूर्णपणे बुक करण्यात आले आहेत. सेरेमनीचा कार्यक्रम उदय विलास हॉटेलमध्ये होणार आहे. उदय विलास हॉटेलमध्ये 100 रुम्स आणि तळ्याच्या किनाऱ्यावर आहे.
प्रती दिवसाच भाडं 10 लाख रुपये
उदय विलास हॉटेलमध्ये लग्जरी कोहिनूर सूटच प्रती दिवसाच भाडं 10 लाख रुपये आहे. ताज लेक पॅलेस आणि लीला पॅलेस हॉटेलमध्ये पाहुण्यांच्या थांबण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रति दिवसाच या हॉटेल्सच भाडं 75 हजार ते साडेतीन लाख रुपये आहे.
गौतम अदानींच्या मोठ्या मुलाने कोणासोबत लग्न केलय?
जीत अदानी गौतम अदानींचा लहान मुलगा आहे. तो अदानींचा बिझनेस संभाळतो. जीतने वर्ष 2019 मध्ये अदानी ग्रुप जॉईंन केला. त्याने यूनिवर्सिटी ऑफ पेंसिलवेनियामधून ग्रॅज्युएशन केलय. सुरुवातीला त्याने फायनान्स, कॅपिटल मार्केट आणि रिस्क-पॉलिसीवर काम केलं. ग्रुपच्या वेबसाइटनुसार जीत अदानी एअरपोर्ट बिझनेस आणि अदानी डिजिटल लॅब्सचा व्यवसाय संभाळतो. गौतम अदानींचा मोठा मुलगा करण अदानीने परिधी श्रॉफ बरोबर लग्न केलय. ती अदानी समूहचे कायदेशीर विषय हाताळते.