FD Interest Rate | ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘या चार’ बँकांची बंपर ऑफर, मुदत ठेवीवर देतायत जादा व्याज, वाचा सविस्तर
ज्येष्ठ नागरिक विशेष मुदत ठेव याोजनेमध्ये मुदत ठेव ठेवण्यासाठी 31 मार्च 2021 पर्यंतची मुदत आहे. Senior Citizens Fixed Deposit
![FD Interest Rate | ज्येष्ठ नागरिकांसाठी 'या चार' बँकांची बंपर ऑफर, मुदत ठेवीवर देतायत जादा व्याज, वाचा सविस्तर FD Interest Rate | ज्येष्ठ नागरिकांसाठी 'या चार' बँकांची बंपर ऑफर, मुदत ठेवीवर देतायत जादा व्याज, वाचा सविस्तर](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2021/02/16001250/Sbi-hdfc-icici-bob.jpg?w=1280)
नवी दिल्ली: भारतीय स्टेट बँक(SBI Bank), एचडीएफसी बँक (HDFC), आयसीआयसीआय बँक (ICICI Bank), बँक ऑफ बडोदा (Bank of Barora) या बँकांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष मुदत ठेव योजना (Senior Citizen Special FD Scheme) आणली आहे. याअतंर्गत मुदत ठेव ठेवल्यास इतर बँकांच्या तुलनेत जादा व्याज देण्यात येणार आहे. कोरोना आणि लॉकडाऊन काळात बँकांकडील ठेवी कमी झाल्यानं ठेवी वाढवण्यासाठी विविध योजना लाँच केल्या जात आहेत. ज्येष्ठ नागरिक विशेष मुदत ठेव याोजनेमध्ये मुदत ठेव ठेवण्यासाठी 31 मार्च 2021 पर्यंतची मुदत आहे.(Four Major Banks gave extra interest for Senior Citizens Fixed Deposit)
बँक ऑफ बडोदा स्पेशल एफडी स्कीम
बँक ऑफ बडोदा विशेष मुदत ठेव योजने अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांनी मुदत ठेव ठेवल्यास त्यांना इतरांपेक्षा 1 टक्के जादा व्याजदर देणार आहे. मात्र, यासाठी मुदत ठेवीचा कालावधी पाच वर्षांपासून ते 10 वर्षांपर्यंत असला पाहिजे. या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकानं बँक ऑफ बडोदामध्ये पैसे गुंतवल्यास त्याला 6.25 टक्के व्याजदर मिळणार आहे.
आयसीआयसीआय बँक स्पेशल एफडी स्कीम
आयसीआयसीआय बँकविशेष मुदत ठेव योजने अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांनी मुदत ठेव ठेवल्यास त्यांना इतरांपेक्षा 0.85 टक्के जादा व्याजदर देणार आहे. आयसीआयसीआय बँक गोल्डन इयर एफडी स्कीम ज्येष्ठ नागरिकांना 6.30 टक्के व्याजदर देणार आहे.
एचडीएफसी बँक स्पेशल एफडी स्कीम
एचडीएफसी बँक स्पेशल एफडी विशेष मुदत ठेव योजने अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांनी मुदत ठेव ठेवल्यास त्यांना इतरांपेक्षा 0.75 टक्के जादा व्याजदर देणार आहे.एचडीएफसी बँक सीनिअर सिटीझन स्पेशल एफडी या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकानं पैसे गुंतवल्यास त्याला 6.25 टक्के व्याजदर देणार आहे.
स्टेट बँक ऑफ इंडिया स्पेशल एफडी स्कीम
स्टेट बँक ऑफ इंडिया स्पेशल एफडी स्कीमअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांनी मुदत ठेव ठेवल्यास त्यांना इतरांपेक्षा 0.80 टक्के जादा व्याजदर देणार आहे. या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकानं एसबीआयमध्ये पैसे गुंतवल्यास त्याला 6.20 टक्के व्याजदर मिळणार आहे. सध्या एसबीआयकडून मुदत ठेवीवर 5.4 टक्के व्याजदर एफडीवर देण्यात येत आहे.
VIDEO : राज्यात लॉकडाऊनचे संकेत, उद्या कोरोनासंदर्भात मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री बैठक#Maharashtra #coronavirus @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks #baithak pic.twitter.com/qIFaIVL3OR
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 15, 2021
संबंधित बातम्या:
ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष योजनेत गुंतवणूक करण्याची शेवटची संधी; अन्यथा मोठा तोटा
देशाच्या बड्या 2 बँकांकडून ज्येष्ठ नागरिकांना खास गिफ्ट, आता 31 मार्चपर्यंत करू शकता गुंतवणूक
(Four Major Banks gave extra interest for Senior Citizens Fixed Deposit