एअरलाईन बुडाली, पण बिस्किटाने तारले या कंपनीला, कोट्यवधीचा झाला फायदा

| Updated on: Nov 02, 2023 | 5:45 PM

Biscuit Company | बेकरी उत्पादन करणाऱ्या या कंपनीने चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत जोरदार नफा कमावला. कंपनीने गेल्या आर्थिक वर्षात याच तिमाहीत 490.58 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता. या ग्रुपची एक एअरलाईन कंपनी मात्र जमिनीवर आली. त्यात त्यांचे हात पोळले. पण बिस्किट इंडस्ट्रीने त्यांना तारले.

एअरलाईन बुडाली, पण बिस्किटाने तारले या कंपनीला, कोट्यवधीचा झाला फायदा
Follow us on

नवी दिल्ली | 2 नोव्हेंबर 2023 : गो फर्स्ट एअरलाईन तुम्हाला आठवत असेलच. मे महिन्याच्या सुरुवातीला या एअरलाईनला घरघर लागली. त्यानंतर या एअरलाईनने दिवाळखोरीची प्रक्रिया सुरु केली. त्याकाळात प्रवाशीच नाही तर कर्मचाऱ्यांना मोठा फटका बसला. ही एअरलाईन कंपनी दिवाळीखोर झाली. आता या घटनेला 5 महिने झाले आहेत. परंतु, वाडिया ग्रुपचा दुसरा पारंपारिक व्यवसाय फायद्याचा ठरत आहे. ब्रेड-बिस्किटाच्या विक्रीतून कंपनीला जोरदार कमाई होत असल्याचे आकडेवारीवरुन समोर आले आहे.

ब्रिटानियाची जोरदार कमाई

वाडिया समूहाची ब्रिटानिया ही कंपनी सध्या दमदार कामगिरी करत आहे. कंपनीने दुसऱ्या तिमाहीत 586 कोटी रुपयांची कमाई केली. पहिल्या तिमाहीत या कंपनीला 457 कोटी रुपयांचा नफा झाला होता. परंतु मार्च तिमाहीच्या तुलनेत कंपनीला 18 टक्के नुकसान झाले होते. तिमाही निकालामुळे कंपनीच्या शेअरमध्ये अडीच टक्क्यांहून अधिकचा फायदा झाला.

हे सुद्धा वाचा

कंपनीला ब्रेड-बिस्किटने तारले

बेकरी प्रोडक्ट्स तयार करणाऱ्या ब्रिटानिया इंडस्ट्रीज लिमिटेडला चालू आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीत जोरदार कमाई करता आली. कंपनीला 586.50 कोटींचा फायदा झाला. कंपनीने गेल्या आर्थिक वर्षातील अशाच तिमाहीत 490.58 कोटींचा निव्वळ नफा कमावला होता. ब्रिटानिया कंपनीने सप्टेंबर, 2022 च्या तिमाहीत 4,337.59 कोटी रुपये, सप्टेंबर 2023 च्या तिमाहीत 4,432.88 कोटी रुपयांची विक्री केली. त्याचा परिणाम ब्रिटानियाच्या शेअरवर पण दिसून आला.

6 महिन्यात 1000 कोटींहून अधिकचा नफा

चालू आर्थिक वर्षातील पहिल्या 6 महिन्यात गो फर्स्ट बुडाल्याचा कुठलाही परिणाम ब्रिटानिया कंपनीवर झाला नाही. पहिल्या तिमाहीत कंपनीचा नफा 457.55 कोटी रुपये होता. गेल्या आर्थिक वर्षातील समान कालावधीतील नफ्यापेक्षा नक्कीच ही कामगिरी चांगली होती. पण मार्च तिमाहीच्या तुलनेत त्यात 18 टक्क्यांची घसरण आली. दोन तिमाहीत कंपनीने 1000 कोटींची कमाई केली आहे.

कंपनीच्या शेअरमध्ये तेजी

तिमाही निकालानंतर कंपनीच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली. बीएसईच्या आकडेवारीनुसार, सकाळी 11 वाजून 40 मिनिटांवर कंपनीचा शेअर 2.11 टक्क्यांनी वधारला होता. या तेजीमुळे कंपनीचा शेअर 4493.50 रुपयांवर व्यापार करत आहे. या कंपनीचा शेअर व्यापारी सत्रात 4569.05 रुपयांवर पोहचला. एक दिवसापूर्वी कंपनीचा शेअर 4400.80 रुपयांवर बंद झाला होता.