फोर्ब्सने नुकतीच श्रीमंतांची यादी जाहीर केली. फोर्ब्स अब्जाधीशांची यादीत (Forbes World Billionaires List 2024) अनेक चमत्कार झाले आहेत. अनेक नवीन अब्जाधीश आले आहेत. पण सर्वात चर्चेत राहिली ती लिव्हिया व्होइग्ट (Livia Voigt) ही तरुणी. फोर्ब्सच्या यादीत 25 तरुण अब्जाधीश आहेत. त्यांचे वय 33 वर्षांच्य आतील आहे. पण यामध्ये सर्वात कमी वयाची, लिव्हिया व्होइग्ट आहे. ती ब्राझील या देशाची नागरिक आहे. ती सध्या मानसशास्त्राचे शिक्षण घेत आहे. WEG ही लॅटिन अमेरिकेतील सर्वात मोठी इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपनी आहे. लिव्हिया या कंपनीची शेअरधारक आहे.
जगात 2,781 अब्जाधीश
फोर्ब्सनुसार, जगात एकूण 2,781 अब्जाधीश आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या जास्त आहे. त्यात 141 अब्जाधीशांची भर पडली आहे. सर्वाधिक अब्जाधिश अमेरिकेत आहेत. अब्जाधीशांच्या दृष्टीने चीन हा दुसरा देश आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर भारत आहे. फोर्ब्सनुसार अमेरिकेत 813 अब्जाधीश, चीनमध्ये 473 अब्जाधीश तर भारतात 200 अब्जाधीश आहेत.
संचालक मंडळात नाही
लिव्हिया व्होइग्ट ही इलेक्ट्रिक कार कंपनीच्या संचालक मंडळाचा भाग नाही. ती कंपनीत कोणत्याही मोठ्या पदावर नाही. पण तिच्याकडे या कंपनीत 3.1 टक्के हिस्सा आहे. लिव्हियाची मोठी बहिण डोरा व्होइग्ट ही पण तरुण अब्जाधीश आहे. लिव्हिया प्रमाणेच डोराकडे पण
WEG मध्ये 3.1 टक्के इतका वाटा आहे. ती पण या कंपनीत कोणत्याही पदावर नाही.
किती आहे एकूण संपत्ती