देशाच्या सर्वात मानाच्या संस्थेत बंपर भरती, तब्बल इतक्या जागा आणि…

| Updated on: Oct 14, 2024 | 12:42 PM

ISRO Jobs 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक अत्यंत मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरतीसाठी अर्ज करावीत. विशेष म्हणजे ही मेगा भरतीच म्हणावी लागेल.

देशाच्या सर्वात मानाच्या संस्थेत बंपर भरती, तब्बल इतक्या जागा आणि...
ISRO
Follow us on

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक अत्यंत मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. विशेष म्हणजे थेट ISRO मध्ये नोकरी करण्याची संधी आहे. ही एकप्रकारची बंपर भरतीच म्हणावी लागेल. 224 रिक्त पदांसाठी ही भरती सुरू आहे. विविध पदे या भरती प्रक्रियेतून भरली जातील. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची प्रक्रिया. 

इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) च्या Human Space Flight Center (HSFC) कडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. इच्छुक उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक असून उमेदवारांनी लगेचच अर्ज करावीत. 

23 ऑक्टोबर 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यापूर्वीच आपल्याला भरतीसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. hsfc.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन आपण ऑनलाइन पद्धतीने या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकता. तिथेच आपल्याला भरती प्रक्रियेसाठी माहिती ही मिळेल. 

या भरती प्रक्रियेसाठी वयाची आणि शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. डिप्लोमा इन इंजिनीअरिंग, बॅचलर, आयटीआय, B.Sc, ME, उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. दहावीमध्ये 60 टक्केपेक्षा अधिक गुण असलेले उमेदवार हे अर्ज करू शकतात. 60 पेक्षा कमी गुण दहावीमध्ये नसावेत ही मुख्य अट ठेवण्यात आलीये. 

भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर उमेदवारांनी अधिसूचना ही व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावीत. पदानुसार उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 28, 30 किंवा 35 वर्षे असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयाच्या अटीमध्ये थोडी सूट ही देण्यात आलीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच भरतीसाठी अर्ज करावीत.