Job Alert | ग्रामीण विकास मंत्रालयात विविध पदांची भरती, अर्ज करण्यासाठी उरले काही तास

| Updated on: Mar 08, 2021 | 6:39 PM

नॅशनल इनस्टिट्यट ऑफ रूरल डेवलपमेंट अँड पंचायत राजमध्ये विविध पदांवर भरती सुरु आहे. Rural Development Ministry job alert

Job Alert | ग्रामीण विकास मंत्रालयात विविध पदांची भरती, अर्ज करण्यासाठी उरले काही तास
उत्तम करिअरसाठी पदवीनंतर करा एमसीए अभ्यासक्रम, मिळेल भरघोस पगार
Follow us on

नवी दिल्ली:सरकारी नोकरी (Government Job) मिळवण्यासाठी तयारी करणाऱ्या युवकांसाठी महत्वाची बातमी आहे. ग्रामीण विकास मंत्रालयामधील  नॅशनल इनस्टिट्यट ऑफ रूरल डेवलपमेंट अँड पंचायत राज मध्ये  (Rural Development Ministry) विविध पदांवर भरती प्रक्रिया सुरु आहे. याविभागात नोकरी मिळवण्यासाठी अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 9 मार्च आहे. ज्या इच्छुक उमेदवारांनी अद्याप अर्ज केला नसेल त्यांनी ऑफिशियल वेबसाईट career.nirdpr.in वर जाऊन अर्ज करावा. (Rural Development Ministry job alert know full details)

अर्ज करण्यास मुदतवाढ

ग्रामीण विकास मंत्रालयानं आर्थिक मागास प्रवर्ग (EWS) आणि दिव्यांग उमेदवारांसाठी अर्ज भरण्याचा दिनांक 9 मार्च 2021 पर्यंत वाढवला आहे. एकूण 72 पदांसाठी होणाऱ्या भरतीमध्ये नियमांनुसार निवड केली जाईल. या उमेदवारांची निवड एक वर्ष कालावधीसाठी केली जाईल. नॅशनल इनस्टिट्यट ऑफ रूरल डेवलपमेंट अँड पंचायत राज (NIRDPR) नं जारी केलेल्या नोटिफिकेशन नुसार मूळ जाहिरातीमध्ये 250 यंग फेलो, 250 क्लस्टर रिसोर्स पर्सन आणि 10 स्टेट प्रोग्राम कोऑर्डिनेटर्स च्या पदांसाठी भरती सुरु करण्यात आली होती. NIRDPR नं EWS आणि PDW प्रवर्गातील 72 जागांसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवून दिली होती. इतर पदासांठी अर्ज करण्याची मुदत 29 डिसेंबर 2020 ला संपली आहे.

अर्ज कसा करणार?

ग्रामीण विकास मंत्रालयाकडून या पदांसाठीची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन स्वरुपात करण्यात आली आहे. ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे त्यांनी NIRDPR ची ऑफिशियल वेबसाईट career.nirdpr.in वर जाऊन अर्ज करावेत. वेबसाईटवर Recruitment & Position Details या लिंकवर क्लिक करावं त्यानंतर Current Opening हा ऑप्शन निवडून अर्ज सादर करावा.

अर्ज कोण करु शकते

क्लस्टर रिसोर्स पदासाठी उमेदवार मान्यता प्राप्त बोर्डातून 12 वी उत्तीर्ण झालेला असणं आवश्यक आहे. संबंधित क्षेत्रातील कामाचा 5 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमदेवारांचं वय 1 नोव्हेंबर 2020 ला 25 वर्षांपेक्षा कमी आणि 40 वर्षांपेक्षा अधिक असू नये.

संबंधित बातम्या:

RBI recruitment 2021| शिक्षणाची अट 10 वी पास, 26 हजार रुपयांपर्यंत पगार, आरबीआयमध्ये ‘या’ पदावर भरती सुरु

International Women’s Day 2021| एनटीपीसी आणि ओएनजीसीकडून महिला दिनाचं गिफ्ट, विशेष भरती प्रक्रिया जाहीर

(Rural Development Ministry job alert know full details)