‘या’ महानगरपालिकेत नोकरी करण्याची थेट संधी, विविध पदांसाठी भरती सुरू, मुलाखतीमधूनच…

Thane Municipal Corporation Bharti : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी सुवर्णसंधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. या भरती प्रक्रियेची सर्वात खास बाब म्हणजे मुलाखतीमधूनच उमेदवाराची निवड केली जाईल.

'या' महानगरपालिकेत नोकरी करण्याची थेट संधी, विविध पदांसाठी भरती सुरू, मुलाखतीमधूनच...
Thane Municipal Corporation
Follow us
| Updated on: Sep 29, 2024 | 2:00 PM

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी सुवर्णसंधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरतीसाठी अर्ज करावा. या भरती प्रक्रियेची सर्वात खास बाब म्हणजे उमेदवारांना कोणत्याही प्रकारची लेखी परीक्षा वगैरे या भरतीसाठी द्यावी लागणार नाहीये. एका मोठ्या महानगरपालिकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी सुरू आहे. भरतीसाठी वयाची आणि शिक्षणाची अट देखील लागू करण्यात आलीये. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती.

थेट ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. ठाणे महानगरपालिकेकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. विविध पदांसाठी ही भरती सुरू आहे. या भरती प्रक्रियेतून न्हावी, ड्रेसर, वॉर्डबॉय, शस्त्रक्रिया सहाय्यक, दवाखाना आया पोस्टमार्टम अटेंडन्ट आणि मॉच्युरी अटेंडन्ट अशी पदे भरली जातील.

या भरती प्रक्रियेतून 63 जागा या भरल्या जातील. उमेदवारांची निवड ही थेट मुलाखतीमधूनच केली जाईल. 30 सप्टेंबर, 3 आणि 4 ऑक्टोबर 2024 दरम्यान होणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट ही लागू करण्यात आलीये. 70 वयोगटापर्यंतचे उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात.

https://thanecity.gov.in/ या साईटवर आपल्याला भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती मिळेल. मुलाखतीसाठी आपल्याला कै.अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे. येथे पोहोचावे लागेल. फक्त मुलाखतीतूनच उमेदवाराची निवड ही केली जाईल.

भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत असल्याने शिक्षणाची अट ही देखील पदानुसार असणार आहे. अधिसूचनेवर याबद्दलची सविस्तर माहिती ही उमेदवारांना आरामात मिळेल. नोकरीचे ठिकाण हे ठाणे असणार आहे. चला तर मग वेळ न घालता भरतीच्या तयारीला लागा.

मराठवाडा केसरी बैलगाडा शर्यत; सर्जा, सोन्या नामंकित बैल जोड्यांचा थरार
मराठवाडा केसरी बैलगाडा शर्यत; सर्जा, सोन्या नामंकित बैल जोड्यांचा थरार.
ठाकरेंनी भेंडीबाजारमध्ये दसरा मेळावा घ्यावा, कोणी लगावला खोचक टोला?
ठाकरेंनी भेंडीबाजारमध्ये दसरा मेळावा घ्यावा, कोणी लगावला खोचक टोला?.
'तर पोलीस काय शोपीस म्हणून बंदूक दाखवतील का?' शिंदे नेमकं काय म्हणाले?
'तर पोलीस काय शोपीस म्हणून बंदूक दाखवतील का?' शिंदे नेमकं काय म्हणाले?.
जंगलात टाका, नदीत फेका, अक्षयच्या दफनविधीस विरोध; खोदलेला खड्डा बुजवला
जंगलात टाका, नदीत फेका, अक्षयच्या दफनविधीस विरोध; खोदलेला खड्डा बुजवला.
'तेव्हा राणे आणि राज यांना जीवे मारण्याच्या धमक्या ठाकरेंनी दिलेल्या'
'तेव्हा राणे आणि राज यांना जीवे मारण्याच्या धमक्या ठाकरेंनी दिलेल्या'.
उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे? शिवाजी पार्कवर कोणाची तोफ धडाडणार?
उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे? शिवाजी पार्कवर कोणाची तोफ धडाडणार?.
'रोहित पवारांच्या मेंदूची तपासणी केली तर 50 % शेण...', मिटकरींची टीका
'रोहित पवारांच्या मेंदूची तपासणी केली तर 50 % शेण...', मिटकरींची टीका.
जरांगे पाटील अमित शहांवर संतापले, मराठ्यांच्या नादी लागू नका नाहीतर..
जरांगे पाटील अमित शहांवर संतापले, मराठ्यांच्या नादी लागू नका नाहीतर...
तर शाळांवर कडक कारवाई होणार, शिक्षण विभागाकडून मोठा शासन निर्णय जारी
तर शाळांवर कडक कारवाई होणार, शिक्षण विभागाकडून मोठा शासन निर्णय जारी.
सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार होणार नाही? 'लाडकी बहीण'वरून राऊतांची टीका
सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार होणार नाही? 'लाडकी बहीण'वरून राऊतांची टीका.