नवी दिल्ली : देशातील शिक्षण तंत्रज्ञान क्षेत्राला चांगलीच उभारी मिळाली आहे. त्यामुळे सर्वच क्षेत्रांना कोरोना महामारीचा फटका बसला असतानाही या क्षेत्रातील कंपन्या रोजगार पुरवण्याचे काम करीत आहे. याच क्षेत्रात आघाडीवर असलेल्या वेदांतू कंपनीने आपले साम्राज्य वाढवण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. याच अनुषंगाने कंपनीमार्फत पुढील तीन महिन्यांत म्हणजेच एप्रिल ते जून यादरम्यान 2500 लोकांना नोकरी दिली जाणार आहे. (Vedantu will give jobs to 2,500 people in next three months)
वेदांतू कंपनीला छोट्या शहरांपासून मोठया शहरांपर्यंत आपल्या नेटवर्कचा विस्तार करायचा आहे. याच दिशेने कंपनी सध्या काम करीत आहे. कंपनीने उत्पादन, तंत्रज्ञान, शिक्षण आणि व्यवसायात 2500 नवीन लोकांना नोकरी देण्याचे ठरविले आहे. सध्या ही कंपनी 6 हजार लोकांना रोजगार पुरवित आहे. नवीन कामगारांच्या नियुक्तीनंतर कंपनीचे मनुष्यबळ साडेआठ हजारांपर्यंत वाढणार आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, नवीन भरती ही प्रिमियम बी-स्कूल आणि अभियांत्रिकी संस्थांमधून प्रवेश स्तरावरील आणि मध्यम स्तरावरील असेल. कोरोना विषाणूच्या साथीच्या पार्श्वभूमीवर, लाखो लोकांसह विद्यार्थीही घरून अभ्यासोबत काम करीत आहेत. यामुळे यादरम्यान प्लॅटफॉर्ममध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.
वेदांतूचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी वामसी कृष्ण यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, आम्ही टियर-2 आणि टियर-3 बाजारात आपला सहभाग आणखी वाढवत आहोत. गेल्या महिन्यात ई-लर्निंग प्लॅटफॉर्मने इंस्टासोल्व्ह अॅप आपल्या ताब्यात घेतले. हे अॅप इयत्ता सहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना विज्ञान, गणित, आयआयटी-जेईई आणि नीटच्या परीक्षांमध्ये शंका निरसन करणारे आहे. कंपनीने कर्मचार्यांना देण्यात येणार्या पगाराबाबत अजून कोणतीही घोषणा केलेली नाही.
इन्टासोल्व्ह अॅपच्या अधिग्रहणामुळे शंका-निरसनचे प्रमाण वाढेल. तसेच टियर-2 आणि टीयर-3 बाजारात कंपनीचे स्थान आणखी भक्कम होईल, असा दावा वेदांतू कंपनीने केला आहे. शंका निरसन करण्याच्या बाबतीत आपले स्थान बळकट करण्यासाठी एज्युकेशन-टेक कंपनी वेदांतूने ‘इन्स्टासोल्व्ह’च्या रुपात पहिले अधिग्रहण केले आहे. कंपनीने मागील वर्षी ‘इन्स्टासोल्व्ह’मध्ये प्री-सिरीज ए फंडिंगच्या हिश्श्याच्या स्वरुपात 20 लाख डॉलर्सची गुंतवणूक केली होती. वेदांतूने गेल्या वर्षी आपल्या प्लॅटफॉर्मवर साडेसात कोटी तासांच्या वर्गवारीसह सहा ते सात पट वृद्धी नोंदविली आहे. कोरोना महामारीत अनेक लोक घरातून काम करू लागले. तसेच विद्यार्थ्यांनाही ऑनलाईन शिक्षण घ्यावे लागले. त्यामुळे कोरोना काळात ‘इन्स्टासोल्व्ह’ अॅपचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला. (Vedantu will give jobs to 2,500 people in next three months)
मोठी बातमी! 1 एप्रिलपासून 50 कोटींहून अधिक व्यावसायिक कंपन्यांसाठी E-invoice अनिवार्य#ModiGovernment #Einvoicehttps://t.co/5VMCOVsSak
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 9, 2021
इतर बातम्या
UPSC IES, ISS 2020 interview : युपीएससी आयईएस, आयएसएस परीक्षेच्या मुलाखतीचे वेळापत्रक प्रसिद्ध
मनसेच्या रुपाली पाटलांकडून कोरोनाचा वाढदिवस, खास शैलीत राज्य सरकारचा समाचार