बेळगावः बेळगावमधील मराठा लाईफ इन्फंट्रीच्या (Belgaum Maratha Life Infantry) कॅम्प परिसरात (Camp Area) आज भरधाव ट्रकने शालेय विद्यार्थ्याला चिरडल्याची घटना आज दुपारी घडली आहे. या घटनेनंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी ट्रकचालकाला बेदम चोप दिला आहे. या अपघातात ठार (Truck Accident Student Death) झालेल्या विद्यार्थ्याचे अरहान बेपारी असं नाव असून याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल झाली असून पुढील तपास पोलीस करत आहेत. यावेळी संतप्त जमावानकडून कोणताही अनुचिच प्रकार घडू नये म्हणून घटनास्थळावरुन पोलिसांनी नागरिकांना हटवले आहे. संबंधित ट्रकचालकाला ताब्यात घेतले आहे. हा सारा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून अरहान बेपारी या विद्यार्थ्याबरोबर आणखी एक विद्यार्थीही गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आज दुपारी शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी घरी जात होते, त्यावेळी मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने रस्त्याने चालणाऱ्या विद्यार्थ्याच्या अंगावरच ट्रक घातला, यामध्ये एक विद्यार्थी जागीच ठार झाला असून आणखी एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. या दुर्घटनेत विद्यार्थ्यांच्या अंगावर ट्रक जाऊन एक विद्यार्थी ठार तर दुसरा गंभीर झाल्याने संतप्त नागरिकांनी ट्रकचालकाला चोप दिला आहे.
ज्यावेळी अपघात होऊन विद्यार्थी ठार झाला तो सगळा प्रसंग सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. कॅम्प परिसरातच विद्यार्थी ठार झाल्याने कॅम्प परिसरात फिरणाऱ्या वाहनांच्या वेगमर्यादेवर निर्बंध घालण्याची मागणी येथील जनसामान्य नागरिकांनी केली आहे. कॅम्प परिसरापुढे मोठ्या प्रमाणात लोकवस्ती असल्याने सकाळी आणि दुपारी या रस्त्यावर विद्यार्थ्यांची मोठी गर्दी असते त्यामुळे वाहनांच्या वेगावर मर्यादा घाला अशी मागणी आता पालकवर्गातून होऊ लागली आहे.