Ambernath Accident : अंबरनाथच्या लोकनगरी बायपासवर अपघात, एर्टिगा गाडीची रिक्षा आणि दुचाकीला धडक
उल्हासनगरहून आलेल्या एका एर्टिगा कारचा टायर फुटल्याने कार चालकाचं नियंत्रण सुटलं आणि ही कार थेट एका रिक्षेला जाऊन धडकली. यानंतर एका ऍक्टिव्हा गाडीलाही या कारने धडक दिली.
अंबरनाथ : अंबरनाथच्या लोकनगरी बायपास रस्त्यावर एर्टिगा कार (Ertiga Car)ने एका रिक्षा आणि दुचाकीला धडक दिल्याची घटना रविवारी रात्री उशिरा घडली आहे. या अपघाता (Accident)त एक महिला जखमी (Injured) झाली असून, तिन्ही गाड्यांचं मोठं नुकसान झालं आहे. करमजीत राजपूत असे जखमी महिलेचे नाव आहे. एर्टिगा गाडीचा टायर फुटल्याने कार अनियंत्रित झाली आणि दोन गाड्यांना धडकली. जखमी महिलेवर उल्हासनगरमधील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघाताबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेतले आहे.
कारचा टायर फुटल्याने अपघात
अंबरनाथच्या गोविंद पूल ते लोकनगरी बायपास रोडवर उल्हानगर रविवारी रात्री उशिरा हा अपघात घडला. उल्हासनगरहून आलेल्या एका एर्टिगा कारचा टायर फुटल्याने कार चालकाचं नियंत्रण सुटलं आणि ही कार थेट एका रिक्षेला जाऊन धडकली. यानंतर एका ऍक्टिव्हा गाडीलाही या कारने धडक दिली. या अपघातात करमजीत राजपूत ही महिला जखमी झाली असून तिला उल्हासनगरच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. याबाबत शिवाजीनगर पोलीस पुढील कारवाई करत आहेत.
साताऱ्यात इर्टिका गाडीच्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू
सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील सुर्ली येथे काल रात्री 11 वाजता इर्टिका गाडी पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात झाला. या अपघातात आर्वी येथील 3 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तुकाराम आबाजी माने (65), तानाजी आनंद माने (62) आणि सुभाष गणपत माने (60) अपघातात मृत्यू झालेल्या तिघांची नावे आहेत. हे तिघेजण साताऱ्याहून आर्वीकडे येत असताना सुर्ली गावानजीक असलेल्या वळणावर इर्टिका गाडीचा ताबा सुटल्याने ही गाडी पलटी झाली. (Ertiga collides with a rickshaw and a two-wheeler on the bypass in Ambernath)