कारमधून आला आणि त्याच्यावर गोळीबार करून गेला, टोलनाक्यावर थरारक प्रसंग

या घटनेमध्ये मोहम्मद रिजवान असामुद्दिन हा जखमी झाला असून त्याच्यावर जालना सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपणी यांनी घटनास्थळी धाव घेऊन या प्रकरणाचा आढावा घेतला

कारमधून आला आणि त्याच्यावर गोळीबार करून गेला, टोलनाक्यावर थरारक प्रसंग
टोलनाक्यावर गोळीबारात 1 जखमी, जालन्यातील थरार
Follow us
| Updated on: Dec 11, 2024 | 8:41 AM

जालन्यातून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. शहारीतल नागेवाडी टोलनाक्याजवळ एखाद्या चित्रपटात शोभेल असा थरारक प्रसंग घडला. कारमधून आलेल्या अज्ञात आरोपीने टोलनाक्याजवळ एका ट्रक ड्रायव्हरवर थेट गोळीबार केला. फायरिंगच्या आवाजाने सगळीकडे गोंधळ माजला, लोकांमध्ये दहशत पसरली. या गोळीबारानंतर अज्ञात आरोपी लागलीच तेथून पसार झाले. फायरिंगची ही संपूर्ण घटना टोलनाक्यावरील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून या थरारक प्रसंगामुळे आजूबाजूच्या नागरिकांमध्ये दहशत माजली आहे.

या घटनेमध्ये मोहम्मद रिजवान असामुद्दिन हा जखमी झाला असून त्याच्यावर जालना सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपणी यांनी घटनास्थळी धाव घेऊन या प्रकरणाचा आढावा घेतला असून याप्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहे.

जुन्या वैमनस्यातून गोळीबार केल्याचा संशय

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जालना सहरातील नागेवाडी टोलनाक्याजवळ काल रात्री 10 च्या सुमारास फायरिंगची घटना घडली. पीडित मोहम्मद याच्यावर तिघांनी फायरिंग केलं. प्राथमिक माहितीनुसार, मोहम्मद याच्या कंबरेजवळ गोळी चाटून गेल्याने तो जखमी झाला आहे. पण जीवे मारण्याच्या उद्देशानेच त्याच्यावर फायरिंग करण्यात आलं, हा हल्ला झाला असं पीडित इसमाचं म्हणणं आहे. पीडित आणि आरोपी हे सर्व मुंबईचे असून जखमी इसम हा एका गाडीवर ड्रायव्हर आहे.

गाडी पार्र करून तो चहा पिण्यासाठी बाहेर पडला होता, तेव्हाच संधी साधून आरोपी व त्याच्या साथीदारांनी त्याच्यावर फायरिंग केलं. पूर्व वैमनस्यातूनच हा हल्ला करण्यात आला आहे. आरोपींचा शोध घेऊन पुढील तपासाकरिता आम्ही एक पथक रवाना केलं आहे. याप्रकरणी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितलं. आरोपींनी जखमी मोहम्मदच्या दिशेने तीन गोळ्या फायर केल्या, त्यातील एक गोळी त्याच्या जांघेला घासून गेली. तेवढी एक जखम झाली असन त्याच्यावर सध्या जालना सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत अशी माहितीही पोलिसांनी दिली.

खातेवाटपाचा तिढा, दिल्लीत फडणवीस-दादा पण शिंदे जाणार की नाही? सस्पेन्स
खातेवाटपाचा तिढा, दिल्लीत फडणवीस-दादा पण शिंदे जाणार की नाही? सस्पेन्स.
'मला गद्दार म्हणत होते, यांना काय गद्दार 2.. ', गुलाबराव पाटलांचा टोला
'मला गद्दार म्हणत होते, यांना काय गद्दार 2.. ', गुलाबराव पाटलांचा टोला.
पवारांवर टीका करणाऱ्यावर बोलताना युगेंद्र पवारानी आपल्या काकाला फटकारल
पवारांवर टीका करणाऱ्यावर बोलताना युगेंद्र पवारानी आपल्या काकाला फटकारल.
शिंदे गटात मंत्रिपदावरून रस्सीखेच, 'या' 5 नेत्यांना पक्षातूनच विरोध?
शिंदे गटात मंत्रिपदावरून रस्सीखेच, 'या' 5 नेत्यांना पक्षातूनच विरोध?.
सिद्धिविनायक बाप्पाचं दर्शन भाविकांसाठी इतके दिवस बंद, कारण नेमकं काय?
सिद्धिविनायक बाप्पाचं दर्शन भाविकांसाठी इतके दिवस बंद, कारण नेमकं काय?.
तरूणाचा जाच संपेना... 11 वीत शिकणाऱ्या तरूणीनं उचललं टोकाचं पाऊल
तरूणाचा जाच संपेना... 11 वीत शिकणाऱ्या तरूणीनं उचललं टोकाचं पाऊल.
'लाडकी बहीण' संदर्भात नितेश राणेंची फडणवीसांकडे मोठी मागणी; म्हणाले...
'लाडकी बहीण' संदर्भात नितेश राणेंची फडणवीसांकडे मोठी मागणी; म्हणाले....
पुण्यात अर्जांची छाननी सुरू, 10 हजार 'लाडक्या बहिणी' अपात्र, कारण काय?
पुण्यात अर्जांची छाननी सुरू, 10 हजार 'लाडक्या बहिणी' अपात्र, कारण काय?.
समुद्रकिनारी मौज-मजा करण्याची आवड तुम्हालाही? जरा जपून...
समुद्रकिनारी मौज-मजा करण्याची आवड तुम्हालाही? जरा जपून....
'..म्हणून गोंधळ झाला', कुर्ला बेस्ट अपघातातील बस चालकचा जबाब अन् खळबळ
'..म्हणून गोंधळ झाला', कुर्ला बेस्ट अपघातातील बस चालकचा जबाब अन् खळबळ.