Mahalaxmi case : हो मी तिचे 59 तुकडे केले, सुसाईट नोटमध्ये धक्कादायक खुलासा

| Updated on: Sep 26, 2024 | 4:23 PM

दिल्लीत काही महिन्यांपूर्वी एक धक्कादायक घटना घडली होती. तशीच घटना आता बंगळुरुमध्ये घडली आहे. महालक्ष्मी खून प्रकरण हे 2022 मध्ये दिल्लीत तिच्या लिव्ह-इन पार्टनर आफताबने श्रद्धा हिच्या निर्घृण हत्येची आठवण करून देते. बंगळुरुमध्ये ही महालक्ष्मीची तशीच हत्या करण्यात आली आहे.

Mahalaxmi case : हो मी तिचे 59 तुकडे केले, सुसाईट नोटमध्ये धक्कादायक खुलासा
Follow us on

कर्नाटकातील महालक्ष्मी हत्या प्रकरणात आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. बंगळुरुतील महालक्ष्मीची हत्या करुन तिच्या मृतदेहाचे तुकडे करुन ते फ्रीजमध्ये ठेवण्यात आले होते. जेव्हा घरातून दुर्गंध येऊ लागला त्यानंतर शेजारच्या लोकांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. घर उघडताच जेव्हा पोलीस आत गेले तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसला. या प्रकरणात पोलिसांचा दोन लोकांवर संशय होता. महालक्ष्मीचा पती याने अश्रफ नावाच्या व्यक्तीवर खुनाचा आरोप केला होता. तर पोलिसांना तिचा मित्र मुक्ती रंजन रॉय याच्यावर संशय होता. पोलीस त्याच्या शोधात होती. पण मुक्तीचा मृतदेह झाडाला लटकलेल्या स्थितीत त्याचा गावी आढळला. आरोपी हा महालक्ष्मीचा प्रियकर असून त्याचे नाव मुक्ती रंजन रॉय असल्याचे सांगितले जात आहे.

महालक्ष्मीची हत्या का केली?

मुक्ती रंजन रॉय यांच्या मृत्यूनंतर पोलिसांना एक सुसाईड नोट सापडली आहे, ज्यामध्ये त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. आत्महत्येपूर्वी त्याने या गुन्ह्याची कबुली दिली असून आपण महालक्ष्मीची हत्या का केली याचा खुलासा केला आहे. आयएएनएस या वृत्तसंस्थेच्या बातमीनुसार, पोलिसांनी पीडित महालक्ष्मीचा मित्र मुक्ती रंजन रॉय याने लिहिलेली सुसाईड नोट जप्त केली आहे. या चिठ्ठीत त्याने बंगळुरू शहराला हादरवून सोडणाऱ्या भयानक गुन्ह्याची कबुली दिली आहे.

सुसाईड नोट ही त्याच्या डायरीत लिहिल्याचे सूत्रांनी सांगितले. आरोपीने त्याच्या डायरीत लिहिले होते की, ‘मी माझी मैत्रीण महालक्ष्मीचा 3 सप्टेंबर रोजी खून केला आहे. मी तिच्या वागण्याला कंटाळलो होतो. माझे तिच्याशी वैयक्तिक कारणावरून भांडण झाले आणि महालक्ष्मीने माझ्यावर हल्ला केला. त्याचा राग आल्याने मी तिची हत्या केली. त्याने आपल्या डायरीत लिहिले की, ‘तिची हत्या केल्यानंतर मी तिच्या मृतदेहाचे 59 तुकडे केले आणि फ्रीजमध्ये ठेवले.’

आरोपीची आत्महत्या

पोलीस आरोपी मुक्ती रंजन रॉयची माहिती गोळा करत असताना त्यांना ही सुसाईड नोट सापडली. रॉय याने बुधवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. ओडिशातील भद्रक जिल्ह्यातील एका गावात झाडाला लटकलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह सापडला होता. पोलीस सूत्रांनी सांगितले की, “संशयित मारेकरी बुधवारी पांडी गावात पोहोचला होता आणि घरीच थांबला होता. नंतर तो दुचाकीवरून घराबाहेर पडला होता. स्थानिक लोकांना त्याचा मृतदेह सापडला होता.”

खुनाच्या घटनेनंतर मुक्ती रंजन रॉय हा बेपत्ता होता. त्याचा शोध घेण्यासाठी कर्नाटक पोलिसांनी चार पथके ओडिशात पाठवली होती. संशयित मारेकऱ्याने १ सप्टेंबरपासून कामावर येणे बंद केले होते. महालक्ष्मीचा कामाचा शेवटचा दिवसही 1 सप्टेंबरला होता. पोलिसांनी सांगितले की, संशयित मारेकरी मुक्ती हा महालक्ष्मी काम करत असलेल्या टीमचा प्रमुख होता. दोन दिवसांपासून महालक्ष्मीच्या घरातून दुर्गंधी येत असल्याचे शेजाऱ्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी तिच्या कुटुंबीयांना याची माहिती दिली. शनिवारी ही घटना उघडकीस आली.