Uma Maheshwari Suicide : टीडीपीचे संस्थापक एनटीआर यांच्या मुलीची आत्महत्या, आजारपणाला कंटाळून उचलले टोकाचे पाऊल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास कुटुंबीयांना त्यांचा मृतदेह खोलीत पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.

Uma Maheshwari Suicide : टीडीपीचे संस्थापक एनटीआर यांच्या मुलीची आत्महत्या, आजारपणाला कंटाळून उचलले टोकाचे पाऊल
टीडीपीचे संस्थापक एनटीआर यांच्या मुलीची आत्महत्याImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Aug 02, 2022 | 1:47 AM

हैदराबाद : तेलगू देसम पार्टीचे संस्थापक नंदामुरी तारका रामाराव (NTR) यांची धाकटी कन्या कंथामेनी उमा माहेश्वरी (Kanthameni Uma Maheshwari) यांनी आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली आहे. हैदराबाद येथील जुबली हिल्स येथील राहत्या घरी गळफास घेत उमा महेश्वरी यांनी आत्महत्या केली. उमा महेश्वरी या आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या वहिनीही होत्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास कुटुंबीयांना त्यांचा मृतदेह खोलीत पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. दरवाजा आतून बंद होता. प्राथमिक तपासानुसार प्रकृती अस्वस्थ्यामुळे त्या डिप्रेशन (Depression)मध्ये होत्या. सध्या पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी उस्मानिया हॉस्पिटलमध्ये पाठवला आहे.

सीआरपीसी कलमानुसार गुन्हा दाखल

पोलिसांनी सीआरपीसी कलम 174 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. उमा माहेश्वरी या एनटी रामाराव यांच्या चौथ्या कन्या होत्या. एनटी रामाराव यांनी त्यांच्या कारकिर्दीत कलाकार, दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून काम केले. यानंतर त्यांनी राजकारणातही हात आजमावला. त्यांनी टीडीपी (तेलुगु देसम पार्टी) स्थापन केली. ते आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्रीही राहिले आहेत. एनटी रामाराव हे फिल्म इंडस्ट्रीत दीर्घकाळ कार्यरत तेलगू अभिनेते म्हणून ओळखले जात होते. त्यांनी 1982 मध्ये पक्षाची स्थापना केली. पक्ष स्थापन केल्यानंतर केवळ 9 महिन्यांतच त्यांना यश मिळाले आणि आंध्र प्रदेशात त्यांचे सरकार स्थापन झाले. पुढे त्यांचेच जावई चंद्राबाबू नायडू यांनी पक्षात बंडखोरी करून मुख्यमंत्रिपदासह पक्ष काबीज केला. एनटी रामाराव यांचे काही दिवसांनी वयाच्या 72 व्या वर्षी निधन झाले. (TDP founder NTRs daughter Uma Bharti commits suicide in Hyderabad due to illness)

हे सुद्धा वाचा

मुख्यमंत्री फडणवीसांचं अनोखं स्वागत, थेट 'लाडकी बहीण'ची रांगोळी अन्..
मुख्यमंत्री फडणवीसांचं अनोखं स्वागत, थेट 'लाडकी बहीण'ची रांगोळी अन्...
'आता राम आठवतोय, उद्धव ठाकरे नौटंकी...', किरीट सोमय्यांचा हल्लाबोल
'आता राम आठवतोय, उद्धव ठाकरे नौटंकी...', किरीट सोमय्यांचा हल्लाबोल.
शिंदेंच्याच दोन बड्या नेत्यांची मंत्रिपदासाठी धडपड अन् भेट नाकारली
शिंदेंच्याच दोन बड्या नेत्यांची मंत्रिपदासाठी धडपड अन् भेट नाकारली.
आडवाणींची तब्येत बिघडली, गेल्या 4-5 महिन्यात चौथ्यांदा रूग्णालयात दाखल
आडवाणींची तब्येत बिघडली, गेल्या 4-5 महिन्यात चौथ्यांदा रूग्णालयात दाखल.
उद्याच महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, कोणता फॉर्म्युला झाला डन?
उद्याच महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, कोणता फॉर्म्युला झाला डन?.
कोल्हापूरच्या नृसिंहवाडीत दत्त जयंतीचा उत्साह, भक्तांची अलोट गर्दी
कोल्हापूरच्या नृसिंहवाडीत दत्त जयंतीचा उत्साह, भक्तांची अलोट गर्दी.
अखेर गृहखातं कोणाकडे जाणार? फडणवीस की शिंदे? कोणतं खातं कुणाकडे असणार?
अखेर गृहखातं कोणाकडे जाणार? फडणवीस की शिंदे? कोणतं खातं कुणाकडे असणार?.
उद्या लोकलने प्रवास करताय? कोणत्या मार्गावर मेगाब्लॉक? जाणून घ्या...
उद्या लोकलने प्रवास करताय? कोणत्या मार्गावर मेगाब्लॉक? जाणून घ्या....
'एकला चलो रे'... आगामी महापालिका निवडणुकीचे वारे अन् स्वबळाचे नारे?
'एकला चलो रे'... आगामी महापालिका निवडणुकीचे वारे अन् स्वबळाचे नारे?.
'दोन्ही पवारांनी भविष्य़ात एकत्रित...',रोहित पवारांच्या आईच मोठ वक्तव्य
'दोन्ही पवारांनी भविष्य़ात एकत्रित...',रोहित पवारांच्या आईच मोठ वक्तव्य.