महिला झोपलेली असताना तिकीट चेकरने तिच्या अंगावर केली लघुशंका, घृणास्पद प्रकारानंतर पुढे जे घडलं ते…

तिकीट चेकरने लोअर बर्थवर झोपलेल्या महिलेच्या अंगावर लघुशंका केल्याने एकच खळबळ उडाली. महिलेने आरडाओरड केल्यानंतर सहप्रवाशांनी त्याला पकडलं आणि...

महिला झोपलेली असताना तिकीट चेकरने तिच्या अंगावर केली लघुशंका, घृणास्पद प्रकारानंतर पुढे जे घडलं ते...
महिला झोपलेली असताना तिकीट चेकरने तिच्या अंगावर केली लघुशंका, घृणास्पद प्रकार आला समोरImage Credit source: प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Mar 14, 2023 | 7:34 PM

मुंबई : धावत्या एक्स्प्रेसमध्ये तिकीट चेकरच्या घृणास्पद प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. अकाल तख्त एक्स्प्रेसमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. रविवारी रात्री कोलकाता अमृतसर ट्रेन अकबरजंग येथील चारबाग रेल्वे स्टेशनजवळ आली असताना लोअर बर्थवर झोपलेल्या महिलेसोबत घटना घडली. तिच्या अंगावर तिकीट चेकरनं लघुशंका केली. त्यामुळे रेल्वे डब्ब्यात संतापाची लाट उसळली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन आरोपीला ताब्यात घेतलं.

“रविवारी रात्री मी आणि माझी पत्नी झोपलो असताना मुन्ना कुमार आला. त्याने माझ्या पत्नीच्या अंगावर लघुशंका केली. जेव्हा तिने आरडाओरड केला तेव्हा इतर प्रवाशी जागे झाले. त्या तिकीट चेकरला पकडलं. तसेच चांगलाच चोप दिला.”, असं राजेश कुमार यांनी गुन्हा नोंदवताना पोलिसांना माहिती दिली.

“आरोपीचं नाव मुन्ना कुमार असून बिहारच्या बेगुसरायचा राहणारा आहे. त्याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्याला आयपीसी 352, 354 आणि 509 अंतर्गत गुन्हा दाखल केला.”, असं पोलीस अधिकारी संजय कुमार सिन्हा यांनी सांगितलं. आरोपी मुन्ना कुमार सहारनपूर येथे पोस्टिंगवर आहे. जेव्हा हा प्रकार घडला तेव्हा तो ड्युटीवर नव्हता. तो सामन्य प्रवाशांप्रमाणे प्रवास करत होता.

“जीआरपीला रेल्वे कंट्रोल रुमकडून सदर घटनेची माहिती मिळाली. आम्ही चारबाघ स्टेशन जवळ पोहोचलो आणि त्याला अटक केली. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. तो दारुच्या नशेत होता की नाही हे अद्याप अस्पष्ट आहे आम्ही या प्रकरणाचा अधिक तपास करत आहोत.”, असं सिन्हा यांनी पुढे सांगितलं.

“महिलांचा अनादर करणारे गंभीर गैरवर्तन आहे.या घटनेमुळे केवळ तुमचीच नव्हे तर संपूर्ण रेल्वेची बदनामी होत आहे. न्यायालयीन कोठडीत असल्याचेही दिसून येत आहे. या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन, मी नियम 14(ii) मधील तरतूदीनुसार कारवाई करणे योग्य आहे. रेल्वे कर्मचाऱ्याच्या अशोभनीय वर्तनासाठी सेवेतून तत्काळ काढून टाकण्याची शिक्षा लागू करणे योग्य वाटते,” असे आदेश मंत्र्यांनी रेल्वेला दिले आहेत.

खातेवाटपाचा तिढा, दिल्लीत फडणवीस-दादा पण शिंदे जाणार की नाही? सस्पेन्स
खातेवाटपाचा तिढा, दिल्लीत फडणवीस-दादा पण शिंदे जाणार की नाही? सस्पेन्स.
'मला गद्दार म्हणत होते, यांना काय गद्दार 2.. ', गुलाबराव पाटलांचा टोला
'मला गद्दार म्हणत होते, यांना काय गद्दार 2.. ', गुलाबराव पाटलांचा टोला.
पवारांवर टीका करणाऱ्यावर बोलताना युगेंद्र पवारानी आपल्या काकाला फटकारल
पवारांवर टीका करणाऱ्यावर बोलताना युगेंद्र पवारानी आपल्या काकाला फटकारल.
शिंदे गटात मंत्रिपदावरून रस्सीखेच, 'या' 5 नेत्यांना पक्षातूनच विरोध?
शिंदे गटात मंत्रिपदावरून रस्सीखेच, 'या' 5 नेत्यांना पक्षातूनच विरोध?.
सिद्धिविनायक बाप्पाचं दर्शन भाविकांसाठी इतके दिवस बंद, कारण नेमकं काय?
सिद्धिविनायक बाप्पाचं दर्शन भाविकांसाठी इतके दिवस बंद, कारण नेमकं काय?.
तरूणाचा जाच संपेना... 11 वीत शिकणाऱ्या तरूणीनं उचललं टोकाचं पाऊल
तरूणाचा जाच संपेना... 11 वीत शिकणाऱ्या तरूणीनं उचललं टोकाचं पाऊल.
'लाडकी बहीण' संदर्भात नितेश राणेंची फडणवीसांकडे मोठी मागणी; म्हणाले...
'लाडकी बहीण' संदर्भात नितेश राणेंची फडणवीसांकडे मोठी मागणी; म्हणाले....
पुण्यात अर्जांची छाननी सुरू, 10 हजार 'लाडक्या बहिणी' अपात्र, कारण काय?
पुण्यात अर्जांची छाननी सुरू, 10 हजार 'लाडक्या बहिणी' अपात्र, कारण काय?.
समुद्रकिनारी मौज-मजा करण्याची आवड तुम्हालाही? जरा जपून...
समुद्रकिनारी मौज-मजा करण्याची आवड तुम्हालाही? जरा जपून....
'..म्हणून गोंधळ झाला', कुर्ला बेस्ट अपघातातील बस चालकचा जबाब अन् खळबळ
'..म्हणून गोंधळ झाला', कुर्ला बेस्ट अपघातातील बस चालकचा जबाब अन् खळबळ.