महालक्ष्मीच्या मृतदेहाचे 59 तुकडे करणारा संपला, झाडाला लटकलेला मृतदेह, जाता-जाता खरं बोलून गेला

| Updated on: Sep 26, 2024 | 1:56 PM

Mahalakshmi Case : पोलीस महालक्ष्मीच्या मारेकऱ्यापर्यंत पोहोचले, तो पर्यंत त्याचा सुद्धा मृत्यू झालेला. मारेकऱ्याने अखेरच्या क्षणी हत्या का केली? त्यामागच कारण सांगितलं. त्यांनी फ्लॅटचा दरवाजा उघडला तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला. खोलीमध्ये सर्वत्र रक्ताचे डाग होते. छोटे-छोट मांसाचे तुकडे पडलेले. सामान विखुरलेलं. दुर्गंधी येत होती.

महालक्ष्मीच्या मृतदेहाचे 59 तुकडे करणारा संपला, झाडाला लटकलेला मृतदेह, जाता-जाता खरं बोलून गेला
mahalakshmi death case
Follow us on

काही दिवसांपूर्वी सेल्सवुमन महालक्ष्मीच हादरवून सोडणारं हत्या प्रकरण समोर आलं होतं. आरोपीने अत्यंत निदर्यतेने महालक्ष्मीची हत्या केली होती. 21 सप्टेंबरला महालक्ष्मीच्या फ्लॅटचा दरवाजा उघडल्यानंतर हे भयानक हत्याकांड उजेडात आलं. मुलीचा फोन बरेच दिवस बंद होता. म्हणून महालक्ष्मीची आई मीना राणा तिच्या घरी आली. आईसोबत महालक्ष्मीची जुळी बहिण सुद्धा आली होती. त्यांनी फ्लॅटचा दरवाजा उघडला तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला. खोलीमध्ये सर्वत्र रक्ताचे डाग होते. छोटे-छोट मांसाचे तुकडे पडलेले. सामान विखुरलेलं. दुर्गंधी येत होती. तिथे उभं राहण सुद्धा कठीण होतं. आई फ्रिजजवळ गेली. तिने फ्रीजचा दरवाजा उघडताच आतमध्ये मृतदेहाच 30 ते 40 तुकडे होते. ते दृश्य पाहून दोघी मोठ्याने किंचाळल्या. जमिनीवर महालक्ष्मीच शिर पडलेलं होतं. बंगळुरुमधील हे हत्या प्रकरण आहे.

महालक्ष्मीच हेमंत दाससोबत लग्न झालं होतं. हेमंतच मोबाइल रिपेयरिंगच दुकान होतं. महालक्ष्मीने एका मॉलच्या ब्युटी सेंटरमध्ये नोकरी सुरु केलेली. दोघांना एक मुलगी होती. वर्ष 2023 मध्ये महालक्ष्मी आणि हेमंतमध्ये दुरावा वाढला. दोघे वेगळे राहू लागले. महालक्ष्मीने वायलिकावल भागात फ्लॅट घेतला. आईने सांगितलं की, मी दर 15 ते 20 दिवसांनी महालक्ष्मीला भेटायला यायची. तिचा फोन बंद झाल्यानंतर मला टेन्शन आलं. मी माझ्या दुसरी मुलीसोबत तिला भेटायला म्हणून आली. त्यावेळी तिची हत्या झाल्याच समजलं.

महालक्ष्मीच अशरफ सोबत अफेयर

पोलिसांना आधी महालक्ष्मीचा पती हेमंतवर संशय होता. त्यांनी हेमंतला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर त्याने सांगितलं की, “महालक्ष्मीच अशरफ नावाच्या हेयर ड्रेसरसोबत अफेयर सुरु होतं. अशरफ तिला अनेकदा बाईकवरुन घरी सोडायचा” हेमंतने संशयाची सुई अशरफकडे वळवली. अशरफ बंगळुरुमध्येच होता. पोलिसांनी त्याला चौकशीसाठी बोलावलं. त्याची सखोल चौकशी केली. मागच्या 20 दिवसातील त्याचं लोकेशन, कॉल डिटेल रेकॉर्ड आणि प्रत्यक्ष दर्शींच्या जबानीनंतर पोलिसांचा त्याच्यावरचा संशय दूर झाला.

हत्याकांडात तिसऱ्या व्यक्तीचा हात

पोलिसांनी त्या भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासला. त्यावेळी 2 सप्टेंबरच्या रात्री दोन जण स्कुटीवरुन महालक्ष्मीच्या घरी आल्याच दिसलं. या फुटेजमध्ये दोघांचे चेहरे दिसले नाहीत. या दोन्ही व्यक्ती हेमंत किंवा अशरफ नव्हता. या हत्याकांडात तिसऱ्या व्यक्तीचा हात होता. ज्याने इतक्या निदर्यतेने महालक्ष्मीची हत्या केलेली.

कोण होता मुक्ती रंजन रॉय?

महालक्ष्मीच्या मारेकऱ्याच नाव होतं, मुक्ती रंजन रॉय. कोण होता मुक्ती रंजन रॉय? त्याने महालक्ष्मीची हत्या का केली? पोलिसांना समजलं की, मुक्ती रंजन ओदिशामध्ये आहे. पोलिसांची टीम अलर्ट झाली. त्याचवेळी 25 सप्टेंबरला भद्रक शहरात मुक्ति रंजन रॉयचा मृतदेह सापडल्याची बातमी आली. त्याने आत्महत्या केली. पोलिसांना आरोपीकडे एक डायरी आणि डेथ नोट मिळाली. मुक्ती रंजन फंडी गावचा होता. बंगळुरुमध्ये एका कपड्याच्या दुकानात तो नोकरी करायचा.

सुसाइड नोटमध्ये हत्येचं कारण काय सांगितलं?

“मी 3 सप्टेंबरला महालक्ष्मीची हत्या केली. मी त्या दिवशी महालक्ष्मीच्या घरी गेलेलो. आमचं कुठल्यातरी विषयावरुन भांडण झालं. त्यावेळी महालक्ष्मीने माझ्यावर हल्ला केला. मला हे आवडलं नाही. मी रागाच्या भरात तिची हत्या केली. मी तिच्या मृतदेहाचे 59 तुकडे केले ते फ्रिजमध्ये ठेवून तिथून पळून गेलो. मला महालक्ष्मीच वर्तन अजिबात पसंत नव्हतं. तिच्या हत्येचा मला पश्चाताप आहे. मी रागाच्या भरात जे केलं, ते चुकीचच होतं. मी घाबरलेलो, म्हणून तिथून पळून गेलो” असं रंजनने आपल्या डेथ नोटमध्ये लिहिलेलं.