उद्याच ‘नीट’ निकाल लावा; NEET प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा सर्वात मोठा आदेश

नीट परीक्षेचा झालेला गोंधळ निवळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. नीट पेपर लीक प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने 40 हून अधिक याचिकांवर सुनावणी केली आहे. यावेळी कोर्टाने उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत नीटचा निकाल लावण्याचे आदेश दिले. तसेच या प्रकरणाची सुनावणी येत्या सोमवारी करणार असल्याचंही स्पष्ट केलं आहे.

उद्याच 'नीट' निकाल लावा; NEET प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा सर्वात मोठा आदेश
supreme courtImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 18, 2024 | 6:38 PM

नीट पेपर लीक प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. यावेळी 40हून अधिक याचिकांवर सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, जस्टिस जेबी पारदीवाला आणि जस्टिस मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. या वेळी सरन्यायाधीशांनी मोठा निर्णय दिला आहे. जर कुणी पेपर लीक केला असेल तर त्याचा हेतू केवळ नीट परीक्षेला बदनाम करण्याचा नाहीये. तर पैसे कमावणे हा त्यामागचा हेतू होता, हे स्पष्ट होत आहे. संपूर्ण देश नीटच्या परीक्षेबाबतच्या निर्णयाची वाट पाहत आहे. त्यामुळे उद्या शनिवार दुपारी 12 वाजेपर्यंत ऑनलाईन निकाल जाहीर करा, असे आदेश सरन्यायाधीशांनी दिली आहे. याबाबतची पुढील सुनावणी सोमवारी सकाळी 10.30 वाजता होणार आहे.

NEET UG परीक्षा रद्द होणरा की नाही? सर्वोच्च न्यायालयात या प्रश्नावर आज चर्चा झाली. आता सोमवारी या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे. त्या दिवशी 23 लाख मेडिकल एस्पिरेंट्सच्या प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत. मात्र कोर्टाने एनटीएला नीट यूजीसी 2024च्या विद्यार्थ्यांचे मार्क्स ऑनलाईन जारी करण्याचे आदेश दिले आहेत. पण रोल नंबरला केंद्रवार क्रमाने डमी रोल नंबरच्या रुपाने प्रदर्शित करायला सांगितलं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची ओळख पटू नये, असं कोर्टाने म्हटलंय.

कोणतं सेंटर येणार माहीत नसतं

यावेळी कोर्टाने एनटीएला सवाल केले. 23.33 लाख विद्यार्थ्यांपैकी किती विद्यार्थ्यांनी त्यांचं परीक्षा केंद्र बदललं?, असा सवाल कोर्टाने केला. त्यावर करेक्शनच्या नावाखाली विद्यार्थ्यांनी सेंटर बदललं. 15,000 विद्यार्थ्यांनी करेक्शन विंडोचा वापर केला, असं एनटीएने स्पष्ट केलं. मात्र, विद्यार्थी केवळ शहर बदलू शकतात. कोणताही विद्यार्थी केंद्र निवडू शकत नाही. सेंटरची निवड अलॉटमेंट सिस्टिमद्वारे केली जाते. सेंटरचं वाटप परीक्षेच्या दोन दिवस आधी होतं. त्यामुळे कुणाला कोणतं सेंटर येईल हे कुणालाच माहीत नसतं, असं एनटीएने स्पष्ट केलं.

कोर्ट काय म्हणालं?

आम्ही पूर्णपणे सुनावणी करत आहोत. त्यात काहीच संदेह नाही. हजारीबाग आणि पटनामध्ये पेपर लीक झाला आहे. एनटीए सेंटरच्या हिशोबाने रिझल्ट डिक्लेअर करा. 24 जुलैपर्यंत कौन्सिल केली पाहिजे, असं सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी सांगितलं.

गोधरा प्रभारींकडे सोडवलेली उत्तर पत्रिका सापडली आहे का? सर्व काही सील केलेले होते आणि परत घेतले होते. असं वाटतंय की पटना आणि हाजारीबागमध्येच गडबड झालीय. त्यानंतर आपल्याकडे केवळ आकडे उरले आहेत. त्यामुळे आपण फक्त त्याच्या आधारेच परीक्षा रद्द करू शकतो का? असा सवाल सरन्यायाधीशींना विचारला.

पटना हाजारीबागशी संबंध कसा आला? संपूर्ण प्रश्नपत्रिका केवळ 45 मिनिटात सोडवली जाऊ शकते का? यावर माझा विश्वासच बसत नाहीये, असं सरन्यायाधीश म्हणाले. त्यावर वरिष्ठ वकील संजय हेगडे म्हणाले की, पटना पोलिसांच्या म्हणण्यानुसार हजारीबागमध्ये त्या लोकांकडून सूचना आली आहोत. त्यानंतर अटक केलेल्या व्यक्तीने ही संध्याकाळची घटना असल्याचं सांगितलं. तेव्हा पेपर सोडवलेला होता.

त्यावर एसजी म्हणाले की, मला एफआयआरमध्ये घुसायचे नाहीये. माझ्याकडे अंतिम प्रत आहे. आपण स्क्रीनवर नाही तर कोर्टात आहोत.

Non Stop LIVE Update
आम्हाला या राखीची आण आहे...काही झाले तरी फडणवीस यांची गर्जना...
आम्हाला या राखीची आण आहे...काही झाले तरी फडणवीस यांची गर्जना....
काही लोकांचा शौक असा की माझा...काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
काही लोकांचा शौक असा की माझा...काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
चिंचपोकळीच्या चिंतामणीचा विजय असो...पहिली झलक तर पहा...
चिंचपोकळीच्या चिंतामणीचा विजय असो...पहिली झलक तर पहा....
मोदी साहेबांनी मोठ्या मनांनी...शिंदे गटाच्या नेत्याचे खळबळजनक वक्तव्य
मोदी साहेबांनी मोठ्या मनांनी...शिंदे गटाच्या नेत्याचे खळबळजनक वक्तव्य.
इथून पुढे महापुरुषासंदर्भात असा प्रकार झाला...काय म्हणाले मनोज जरांगे
इथून पुढे महापुरुषासंदर्भात असा प्रकार झाला...काय म्हणाले मनोज जरांगे.
तानाजी सावंत यांनी मीडियाशी बोलणं टाळलं, आधी नको ते बोलून गेले अन् आता
तानाजी सावंत यांनी मीडियाशी बोलणं टाळलं, आधी नको ते बोलून गेले अन् आता.
'दोन महिन्यांनी ही वर्दी आम्हाला सलाम करेल अन् तुमची...', संजय राऊत या
'दोन महिन्यांनी ही वर्दी आम्हाला सलाम करेल अन् तुमची...', संजय राऊत या.
‘फडणवीस आमचं शत्रू नाहीत, पण विरोधात जाल तर...’, जरांगेंचा घणाघात
‘फडणवीस आमचं शत्रू नाहीत, पण विरोधात जाल तर...’, जरांगेंचा घणाघात.
मोदींची जाहीर माफी, शिवरायांचा पुतळा कोसळण्याच्या घटनेवर काय म्हणाले?
मोदींची जाहीर माफी, शिवरायांचा पुतळा कोसळण्याच्या घटनेवर काय म्हणाले?.
'त्यांच्या पायावर शंभरवेळा डोकं ठेवायला तयार', शिंदे असं का म्हणाले?
'त्यांच्या पायावर शंभरवेळा डोकं ठेवायला तयार', शिंदे असं का म्हणाले?.