UGC NET परीक्षेसाठी अर्ज करण्याची आजची शेवटची तारीख, कसा कराल अर्ज? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

UGC NET December 2024 Application Form Last Date: UGC NET डिसेंबर 2024 अर्ज करण्याची आज शेवटची तारीख आहे. तुम्हालाही या परीक्षेसाठी अर्ज करायचा असेल तर ही बातमी नक्की वाचा

UGC NET परीक्षेसाठी अर्ज करण्याची आजची शेवटची तारीख, कसा कराल अर्ज? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
UGC NET Exam
Follow us
| Updated on: Dec 10, 2024 | 12:07 PM

UGC NET December 2024 Application : UGC NET परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे. तसेच तुम्ही प्राध्यापक होऊ इच्छित आहात का? तुम्हाला PhD करायची आहे का? असे दोन्ही कारणं असेल तर तुम्हाला आजच UGC NET परीक्षेसाठी अर्ज करावा लागेल. याविषयी खाली विस्ताराने जाणून घ्या.

UGC NET डिसेंबर परीक्षा 2024 साठी अर्ज करण्याची विंडो अद्याप खुली आहे परंतु लवकरच बंद होणार आहे, जर तुम्हालाही या परीक्षेसाठी अर्ज करायचा असेल तर आपण अधिकृत वेबसाईटवर जाऊन ugcnet.nta.ac.in अर्ज करू शकता.

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ही परीक्षा घेते. UGC NET डिसेंबर 2024 च्या अधिसूचनेनुसार, अर्जाची विंडो 10 डिसेंबर रोजी म्हणजे आज बंद होईल. उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. जे उमेदवार परीक्षेला बसू इच्छितात ते UGC NET डिसेंबर 2024 साठी आपले ऑनलाइन अर्ज ugcnet.nta.ac.in अधिकृत वेबसाइटवर सादर करू शकतात.

UGC NET डिसेंबर 2024 परीक्षेबद्दल 

UGC NET ही भारतीय विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये (1) ‘ज्युनिअर रिसर्च फेलोशिप आणि सहाय्यक प्राध्यापक म्हणून नियुक्ती’, (2) ‘सहाय्यक प्राध्यापक म्हणून नियुक्ती आणि PhD प्रवेश’ आणि (3) ‘केवळ PhD प्रवेश’ यासाठी भारतीय नागरिकांची पात्रता निश्चित करणारी परीक्षा आहे.

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) संगणक आधारित चाचणी (CBT) पद्धतीने 85 विषयांसाठी UGC NET डिसेंबर 2024 आयोजित करेल.

महत्त्वाच्या तारखा कोणत्या?

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 डिसेंबर शुल्क भरण्याची शेवटची तारीख: 11 डिसेंबर फॉर्म मध्ये दुरुस्ती करण्याची शेवटची तारीख: 13 डिसेंबर परीक्षेची तारीख: 1 जानेवारीपासून 19 जानेवारी 2025

UGC NET पात्रता काय?

सामान्य उमेदवाराकडे 55 टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. ओबीसी, एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांसाठी हा निकष 50 टक्के निश्चित करण्यात आला आहे.

PhD प्रवेश गुणवत्ता यादी

नेट परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या नेट पर्सेंटाइलला 70 टक्के, तर मुलाखतीला 30 टक्के वेटेज देण्यात येणार आहे. कॅटेगरी 2 आणि कॅटेगरी 3 या दोन्ही कॅटेगरीतील नेट स्कोअर केवळ एका वर्षासाठी वैध असेल.

हेल्पलाईन नंबर

UGC NET डिसेंबर परीक्षेसाठी अर्ज करताना तुम्हाला काही अडचण आल्यास तुम्ही एजन्सीच्या हेल्पलाईन नंबर- 011- 40759000 आणि 011-69227700 वर संपर्क साधू शकता किंवा ugcnet@nta.ac.in या ईमेल आयडीवर संपर्क करु शकता.

खातेवाटपाचा तिढा, दिल्लीत फडणवीस-दादा पण शिंदे जाणार की नाही? सस्पेन्स
खातेवाटपाचा तिढा, दिल्लीत फडणवीस-दादा पण शिंदे जाणार की नाही? सस्पेन्स.
'मला गद्दार म्हणत होते, यांना काय गद्दार 2.. ', गुलाबराव पाटलांचा टोला
'मला गद्दार म्हणत होते, यांना काय गद्दार 2.. ', गुलाबराव पाटलांचा टोला.
पवारांवर टीका करणाऱ्यावर बोलताना युगेंद्र पवारानी आपल्या काकाला फटकारल
पवारांवर टीका करणाऱ्यावर बोलताना युगेंद्र पवारानी आपल्या काकाला फटकारल.
शिंदे गटात मंत्रिपदावरून रस्सीखेच, 'या' 5 नेत्यांना पक्षातूनच विरोध?
शिंदे गटात मंत्रिपदावरून रस्सीखेच, 'या' 5 नेत्यांना पक्षातूनच विरोध?.
सिद्धिविनायक बाप्पाचं दर्शन भाविकांसाठी इतके दिवस बंद, कारण नेमकं काय?
सिद्धिविनायक बाप्पाचं दर्शन भाविकांसाठी इतके दिवस बंद, कारण नेमकं काय?.
तरूणाचा जाच संपेना... 11 वीत शिकणाऱ्या तरूणीनं उचललं टोकाचं पाऊल
तरूणाचा जाच संपेना... 11 वीत शिकणाऱ्या तरूणीनं उचललं टोकाचं पाऊल.
'लाडकी बहीण' संदर्भात नितेश राणेंची फडणवीसांकडे मोठी मागणी; म्हणाले...
'लाडकी बहीण' संदर्भात नितेश राणेंची फडणवीसांकडे मोठी मागणी; म्हणाले....
पुण्यात अर्जांची छाननी सुरू, 10 हजार 'लाडक्या बहिणी' अपात्र, कारण काय?
पुण्यात अर्जांची छाननी सुरू, 10 हजार 'लाडक्या बहिणी' अपात्र, कारण काय?.
समुद्रकिनारी मौज-मजा करण्याची आवड तुम्हालाही? जरा जपून...
समुद्रकिनारी मौज-मजा करण्याची आवड तुम्हालाही? जरा जपून....
'..म्हणून गोंधळ झाला', कुर्ला बेस्ट अपघातातील बस चालकचा जबाब अन् खळबळ
'..म्हणून गोंधळ झाला', कुर्ला बेस्ट अपघातातील बस चालकचा जबाब अन् खळबळ.