Assembly Election Voting 2022 : उत्तर प्रदेशमध्ये दुसऱ्या टप्प्यात 55 जांगासाठी मतदान, गोवा उत्तराखंडमध्ये मतदारांचा कौल मतपेटीत बंद होणार

उत्तर प्रदेश, गोवा आणि उत्तराखंड या तिन्ही राज्यात भाजप सत्तेत आहे. गोवा आण उत्तराखंडमध्ये भाजपला सत्ता टिकवण्याचं आव्हान आहे. तर, गोव्यात आणि उत्तराखंडमध्ये काँग्रेस किती करिष्मा दाखवणार हे पाहावं लागणार आहे.

Assembly Election Voting 2022 : उत्तर प्रदेशमध्ये दुसऱ्या टप्प्यात 55 जांगासाठी मतदान, गोवा उत्तराखंडमध्ये मतदारांचा कौल मतपेटीत बंद होणार
Assembly Elections 2022 (ANI)
Follow us
| Updated on: Feb 14, 2022 | 9:16 AM

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक (Uttar Pradesh Assembly Elections) एकूण 7 टप्प्यात होत आहे. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज म्हणजेच 14 फेब्रुवारीला होणार आहे. उत्तर प्रदेशातील ( Uttar Pradesh) 9 जिल्ह्यातील 55 जागांसाठी मतदान होणार आहे. या टप्प्यात एकूण 586 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. या निवडणुकीत मुख्य लढाई ही भाजप (BJP) विरुद्ध समाजवादी पार्टी (Samajwadi Party)अशीच असणार आहे. दुसरीकडे गोवा आणि उत्तराखंडमध्ये ही विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. गोव्यात 40 जागांसाठी मतदान होईल. उत्तराखंडमध्ये 70 जागांसाठी मतदान होणार आहे. उत्तर प्रदेश, गोवा आणि उत्तराखंड या तिन्ही राज्यात भाजप सत्तेत आहे. गोवा आण उत्तराखंडमध्ये भाजपला सत्ता टिकवण्याचं आव्हान आहे. तर, गोव्यात आणि उत्तराखंडमध्ये काँग्रेस किती करिष्मा दाखवणार हे पाहावं लागणार आहे.

उत्तर प्रदेशमध्ये दुसऱ्या टप्प्याचं मतदान

उत्तर प्रदेशातील निवडणूक 7 टप्प्यात पार पडत आहे. दुसऱ्या टप्प्यात सहारनपूर, बिजनौर, मुरादाबाद, संभल, रामपूर, बरेली, अमरोहा, शाहजहांपूर या जिल्ह्यातील 55 विधानसबा मतदारासंघाठी मतदान पार पडेल. यासाठी 586 उमदेवार मतदानाच्या रिंगणात आहेत. त्यापैकी 69 महिला उमेदवार आहेत. आज सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात होईल. 55 जागांसाठी 2.02 कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावतील.

12544 मतदान केंद्रावर मतदानाची पक्रिया पार पडेल, अशी माहिती निवडणूक आयोगानं दिली आहे. यामध्ये 252 आदर्श मतदान केंद्र बनवण्यात आली आहेत. निवडणूक प्रक्रियेसाठी 51 निरीक्षक , पोलिसांचे 9 निरीक्षक आहेत. याशिवाय मतदान केंद्रांचं निरीक्षण करण्यासाठी इतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशात ज्या जिल्ह्यात मतदान केंद्र आहेत त्या जिल्ह्यांच्या प्रवेशाच्या ठिकाणी केंद्रीय पोलीस दल, राज्याचं पोलीस दैल, होमगार्ड, निमलष्करी दल तैनात करण्यात आली आहेत. संवेदनशील मतदान केंद्रावर ड्रोन तैनात असेल. निवडणूक आयोगानं शांततापूर्ण वातावरणात निष्पक्ष मतादानासाठी कटीबद्ध राहण्याचं आवाहन केलं आहे.

उत्तराखंडमध्ये एकाच टप्प्यात मतदान

उत्तराखंड विधानसभेच्या 70 जागांसाठी निवडणूक होणार आहे. निवडणूक प्रचाराची मुदत शनिवारी संपली असून 14 फेब्रुवारीला 70 जागांसाठी निवडणूक होणार आहे. सध्या उत्तराखंडमध्ये भाजपची सत्ता असून त्यांच्यासमोर सत्ता टिकवण्याचं आव्हान आहे. काँग्रेसनं देखील जोरदार तयारी केलेली आहे. हिमवृष्टी होत असल्यानं निवडणूक आयोगापुढं देखील आव्हानात्मक स्थिती आहे.

गोव्यात 40 जागांसाठी मतदान

गोवा विधानसभा निवडणुकीत अनेक राजकीय पक्षांनी ताकद पणाला लावलीय. गोव्यात काँग्रेस, (Congress) मगोप, भाजप (BJP) यांच्यात लढत व्हायची. मात्र, यावर्षी ममता बॅनर्जी यांची तृणमूल काँग्रेस, आम आदमी पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादीनं ताकद लावली आहे. गोव्यात सध्या भाजपचं सरकार आहे. गेल्या दहावर्षांपासून गोव्यात भाजप सरकार असून यावेळी मतदार कुणाला कौल देतात हे पाहावं लागणार आहे.गोव्यातील 40 जागांसाठी 301 उमदेवार रिंगणात आहेत. गोव्यातील सत्ता मिळवण्यासाठी भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, आम आदमी पक्ष, तृणमूल काँग्रेस यांनी ताकद लावली आहे. आता गोव्यातील जनता कुणाला सत्ता देणार हे आज होणाऱ्या मतदानावरुन ठरणार आहे.

10 मार्चला निकाल

उत्तर प्रदेश, गोवा, मणिपूर, पंजाब आणि उत्तराखंड या राज्यांच्या विधानसभांचा निकाल 10 मार्चला जाहीर होईल. उत्तर प्रदेशातील 403 जागांसाठी सात टप्प्यात मतदान होत आहे.

इतर बातम्या

UP Goa Uttarakhand Election 2022 Voting LIVE updates : गोवा उत्तराखंडमध्ये सर्व जागांसाठी, उत्तर प्रदेशमध्ये 55 जागांसाठी मतदान

Maharashtra News Live Update : काँग्रेस आणि भाजप आज पुन्हा आमने सामने, देवेंद्र फडणवीसांच्या घराबाहेर काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा

Non Stop LIVE Update
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....