बिग बींसमोर थेट शर्ट काढला, पत्नीला मिठी अन् बनियनवर स्टेजवर धावला; KBCच्या मंचावर स्पर्धकाचे हसू
KBC च्या मंचावर एका स्पर्धकाने, फक्त फास्टेस्ट फिंगर फर्स्ट जिंकल्यानंतर आनंदाने आपला शर्ट काढला अन् स्टेजवर धावू लागला. हे पाहून अमिताभ बच्चन थक्क झाले.एवढच नाही या स्पर्धकांच्या अतिआत्मविश्वासामुळे खेळातही त्याचे हसू झाल्याचे समोर आले.
अमिताभ बच्चन यांचा KBCचा 16 वा सिझन इतर सिझनप्रमाणे चांगलाच गाजतोय. KBC च्या प्रत्येक सिझनमध्ये काहीना काही किस्से घडतच असतात. आणि काही किस्से हे इतके व्हायरल होतात की ते आजही लक्षात राहण्यासारखे असतात. असाच एक किस्सा आहे ज्याची आजही चर्चा होते. हा किस्सा आहे KBC 14 मधला. या सिझनमध्ये असा एक स्पर्धक आलेला ज्याने आनंदाच्या भरात चक्क अमिताभ यांच्यासमोर शर्ट काढला होता.
KBC च्या मंचावरील मजेदार किस्सा
केबीसीच्या मंचावर पहिल्यांदाच एक स्पर्धक फास्टेस्ट फिंगर फर्स्टचा विजय साजरा करताना दिसला. गुजरातमधून आलेल्या या स्पर्धकाने त्याला त्याच्या विजयाचा इतका आनंद झाला की त्यांनी शोमध्ये सर्वांसमोर त्याचा शर्ट काढला.
या स्पर्धकाचे नाव होते विजय गुप्ता. बिग बींनी फास्टेस्ट फिंगर फर्स्ट विनर विजय गुप्ताचे नाव घेताच ते आनंदाने नाचू लागले. एवढच नाही तर त्यांनी चक्क आपला शर्ट काढून तो हाताने फिरवत अख्ख्या स्टेजवर धावू लागले, एवढच नाही तर त्यांनी ऑडिअन्समध्ये बसलेल्या त्यांच्या पत्नीला खेचत तिला मिठीही मारली. हे सर्व पाहून अमिताभ बच्चनही चांगलेच शॉक झाले.
त्यानंतर अमिताभ यांनी विजय यांना शर्ट घालण्याची विनंतही केली. अमिताभ यांनी म्हटलं “लवकर शर्ट घाला आम्हाला भीती वाटते की कपडे इतरत्र कुठेही उतरू नयेत.
“सोप्या प्रश्नाचे आत्मविश्वासाने चुकीचे उत्तर”
शर्ट काढून स्टेजवर फिरणाऱ्या विजय गुप्तांचा आनंद आणि उत्साह फार वेळ टीकू शकला नाही. ते मोठ्या उत्साहाने आणि आत्मविश्वासाने हॉट सीटवर बसले खरे पण 40 हजार रुपयांच्या साध्या प्रश्नाला डॉक्टरांनी अगदी आत्मविश्वासाने चुकीचे उत्तर दिले. त्यानंतर ते केवळ 10 हजार रुपये जिंकून तो घरी परतले.
विजय गुप्ता यांना 40 हजार रुपयांसाठी प्रश्न विचारण्यात आला होता तो असा, हिंदू पौराणिक कथेनुसार रावणाने जबरदस्तीने पुष्पक विमान कोणाकडून हडप केले? A- इंद्र, B- कुबेर, C- जटायू किंवा D- माया. बरोबर उत्तर B- कुबेर होते. विजय गुप्ता यांनी शोमधून जास्त पैसे जिंकले नव्हते पण प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले होते. या स्पर्धकाचा व्हिडीओ मात्र चांगलाच व्हायरल झाला होता.
View this post on Instagram
दरम्यान आता सुरु असलेल्या KBC 16 च्या मंचावरही बरेच किस्से घडत असतात किंवा बरेच असे स्पर्धक असतात ज्यांच्या हुशारीची चर्चा होताना दिसते. त्यातील म्हणजे KBC साठी पश्चिम बंगालमधील रायगंज येथून आलेला अन् 10 वी पास असलेला चहाविक्रेता मिंटू सरकार. याने त्याच्या बुद्धाच्या जोरावर चक्क 25 लाख जिंकले. त्याच्या खेळाचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.